हितगुज दिवाळी अंक २०११ वर दिलेल्या अभिप्रायांसाठी सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद.
यंदाचा हितगुजचा हा बारावा अंक. संपादक आयडीने एक धन्यवादाची पोस्ट टाकून दिवाळी अंक हे प्रकरण माझ्यापुरतं संपवता आलं असतं . पण मायबोलीशी असणारं नातं हे त्यातून असं सहज बाहेर पडू देत नाही. म्हणून हा पोस्ट प्रपंच.
आमच्याकडे आलेलं उत्तम साहित्य बघून आपण (मायबोलीकर) अजून चांगला अंक देऊ शकतो असं जाणवल. त्यासाठी जुन्या जाणत्यांच मार्गदर्शन आवश्यक आहेच, हे ही जाणवलं. नवीन मंडळींच्या नव्या कल्पनांना जुन्या जाणत्यांच्या सूचना, सल्ले याची साथ असेल तर पुढे येणारे अंक अजून चांगले होतील यात शंका नाही.
दिवाळी आली की उत्साह, सजावट, चकली-करंज्यांसोबतच आणखी एक आठवण येते.... लुटुपुटीच्या किल्ल्याची !
यंदाची दिवाळी भारताबाहेर मालदीवमध्ये साजरी करताना अर्थातच ह्या सगळ्याचीच उणीव चुटपुट लावत होती.
लेकाला दिवाळीच्या आठवणी सांगताना किल्ल्याबद्दल सांगत होते.
पण कधीच न पाहिलेल्या गोष्टीची कल्पना करायला त्याला काही जमेना.
मनात आलं , इथेच किल्ला बनवायचा प्रयत्न केला तर !
त्याच इच्छेतून साकार झाला आमचा किल्ला.
१. किल्लेबांधणीसाठी कच्चा माल.
नावः सानिका नवरे
वयः ८ वर्ष
मायबोली आयडी (पालक): कविता नवरे
पालकांची मदतः काहीही नाही
माझं आवडतं घर - जलमहाल आणि आवडतं कॅरेक्टरः जलपरी (ह्यातली गुलाबी आहे ती सानु जलपरी आणि दुसरी * आहे ती आई जलपरी असं तिचं म्हणणं आहे :P) (*च्या इथे आधी जाडी असा शब्द लिहिलेला, पण "माझ्या आईला कोणी जाडी नाही म्हणायचं, आईनेही नाही ह्या मागणीमुळे तो गाळला आहे. आईचं शेपूट असण्याचा काळ आहे सध्या म्हणुन नो बॅड रिमार्क्स फॉर आई :P)
ही आमची सुरवात
नाव - श्रेयान
वय - ६.५
श्रेयान ला मिकीमाउस खूप आवडतो. आणि बाप्पांचा पण माउस असतो म्हणून त्याने हे चित्र काढ्लेय.
मन लाउन काम चालू आहे
आता रंगकाम
आणि हे झालं चित्र पूर्ण
स्वेटर विणताना शेजारी जोरात आवाज करत खेळण्यातील गाडी चालवत असलेल्या आपल्या नातवाला म्हणजे अमेयला आजींनी आवाज कमी करण्याचा सल्ला दिला आणि नेहमीप्रमाणेच तो न ऐकता अमेय उलट अधिक आवाज करू लागला. समोरच्या फोटोतील पतीच्या चेहर्याकडे सहज नजर गेली आणि आजींचा श्वास रोखला गेला. मनातील विचारांना व्यक्ततेचे अमूर्त स्वरूप मिळाले तसे विचार सैरावैरा डोळ्यातून वाहू लागले.
अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातंय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.
"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...
मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीशी आपल्या कितीतरी छान आठवणी निगडीत असतात ना? मे महिन्याची सुट्टी म्हणजे आंबे, पत्ते, पापड-कुरडया, पाहुणे, गाव असे छानसे समिकरण असते. यातले काही घटक बदललेही असतील. तर मग, आपापल्या अनुभवातील, मनातील मे महिना इथे मांडूयात का?