आज जग प्रचंड वेगानं बदलतंय. एका कोपर्यात घडलेल्या घटनेचे पडसाद क्षणार्धात जगभर उमटत आहेत. सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून अनेक ओळखी वाढत आहेत आणि जुन्या ओळखी दृढ होत आहेत. नवनवीन संशोधनं रोजच्या रोज प्रकाशित होत आहेत.... सतत आणि असंख्य घडामोडी.
या घटनांचा, बदलांचा, प्रगतीचा प्रत्येकाच्या जीवनावर कमीअधिक प्रमाणात परिणाम होतच असतो.
अशाच काही विशिष्ट घटनांचे पडसाद, संशोधन, सामाजिक व आर्थिक घडामोडी, प्रशासकीय निर्णय यांवरून पुढच्या काही वर्षांत परिस्थिती कशी बदलेल, याचा संवेदनशील विचार म्हणजे भविष्याचा वेध. भविष्याचा वेध घेताना बहुतेक वेळा विज्ञानातील व तंत्रज्ञानातील प्रगती वा त्याच्या परिणामांचा प्रामुख्याने विचार केला जातो. पण सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, राजकीय, न्याय, मुलभूत सुविधा, प्रशासकीय, पर्यावरण अशी अनेक क्षेत्रं आहेत ज्यांच्यातील स्थित्यंतरं ही भविष्यं घडवायला वा बिघडवायला कारणीभूत होऊ शकतात. आपली पुढची वाटचाल कशी असणार आहे, किंवा कशी असावी, यांवर आपण वर्तमानात काय केलं पाहिजे, याचीही जाणीव आपल्याला होऊ शकते.
सद्य परिस्थितीतील घडामोडींमुळे सामाजिक राहणीमान, कुटुंबव्यवस्था, राजकारण, समाजकारण, पर्यावरण, दळणवळण, मूलभूत सुविधा या व अशा अनेक गोष्टींमध्ये पुढील २०-२५ वर्षांत होणारे बदल कसे असतील, ते तसे का असतील आणि त्याचे सकारात्मक वा नकारात्मक परिणाम काय होतील, याचा वेध आपण यंदाच्या हितगुज दिवाळी अंकात घेणार आहोत.
हा भविष्याचा वेध घेण्यासाठी आपण कथा, कविता, विनोदी लेखन, व्यंगचित्रं, संशोधनपर लेख, ललित यांपैकी आपल्या आवडीच्या कुठल्याही लेखनप्रकाराचा वापर करू शकता.
तर मग चला! व्हा तयार आपल्या सर्वांच्या आवडत्या भविष्याच्या अंतरंगात डोकवायला!
साहित्य आणि कलाकृती पाठवण्याविषयी सूचना आणि नियम
मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा
आपल्या काही शंका, प्रश्न सूचना असतील तर संपादक मंडळाशी इथे किंवा sampadak@maayboli.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
ही संकल्पना पण लय भारी! Can't
ही संकल्पना पण लय भारी! Can't wait!!
मस्तं विषय. आवडला. लगे रहो.
मस्तं विषय.
आवडला.
लगे रहो.
He aawaDalaM.
He aawaDalaM.
छान संकल्पना!
छान संकल्पना!
मस्त संकल्पना!
मस्त संकल्पना!
खूप आवडली ही संकल्पना.
खूप आवडली ही संकल्पना.
आवडली संकल्पना.
आवडली संकल्पना.
मजा येणार! भाऊंच्या
मजा येणार! भाऊंच्या व्यंगचित्रांची वाट बघायला लागलेय आतापासूनच.
मस्त विषय.. या वेळी वाचायला
मस्त विषय.. या वेळी वाचायला मोठ्ठा खजिना आहे की
विषय आवडला. आता भविष्याचा
विषय आवडला.
आता भविष्याचा वेध घ्यायला कुंडली शोधावी लागेल मात्र!!!
छान. भरपूर आवाका असलेला विषय
छान. भरपूर आवाका असलेला विषय आहे.
>>>> आता भविष्याचा वेध घ्यायला कुंडली शोधावी लागेल मात्र!!! >>> माझ्याकडे एक क्रिस्टल बॉल आहे. भाडेतत्वावर देण्यात येईल.
खूपच आवडली संकल्पना. पहिलीही
खूपच आवडली संकल्पना. पहिलीही छानच आहे. लगे रहो संपादकमंडळ !
मस्त आहे ही संकल्पना. (पण
मस्त आहे ही संकल्पना. (पण यावेळी लेखनासाठी फार कमी वेळ उपलब्ध आहे हो संयोजक...)
नंदिनी, मामी
आशूडी +१
चहाच्या कपात बघा.
चहाच्या कपात बघा.
पण यावेळी लेखनासाठी फार कमी
पण यावेळी लेखनासाठी फार कमी वेळ उपलब्ध आहे हो संयोजक.. >>> लले, नंतर वाढवतील ते. काळजी नको.
मामे
मामे
नंतर वाढवतील ते. >>>>>>>> हे
नंतर वाढवतील ते. >>>>>>>> हे आधिच सांगा .........
हो पण ज्यांना लिहायचेय
हो पण ज्यांना लिहायचेय त्यांनी लवकरच लिहायला घ्या. नाहीतर सालाबादप्रमाणे संपादक मंडळाला शेवटच्या षटकात सोळा धावा काढणार्या धोनीचा संचार स्वतःत करून घ्यावा लागेल.
धोनीवरून सुचले. त्याच्या निवृत्तीपर्यंत त्याच्या डोक्याचे आणि केसांचे नक्की काय काय होऊ शकेल, याचा सचित्र वेध घ्या कोणीतरी
त्याच्या निवृत्तीपर्यंत
त्याच्या निवृत्तीपर्यंत त्याच्या डोक्याचे आणि केसांचे नक्की काय काय होऊ शके >>>>>>>> शेवट "गांधीगिरी"च आहे ....
हो पण ज्यांना लिहायचेय
हो पण ज्यांना लिहायचेय त्यांनी लवकरच लिहायला घ्या. <<< अगदी बरोबर. शेवटच्या दिवसाची वाट पाहिलीत तर तुमच्या मनासारखी लेखाची भट्टी जमेलच असे नाही .. तेव्हा वरचा उत्साह साहित्यात उतरु द्या
लिहा म्हटल्यावर बाफ वरची
लिहा म्हटल्यावर बाफ वरची वर्दळ कमी झाली वाटतं
संयोजक मंडळ, गणेशोत्सवाची
संयोजक मंडळ, गणेशोत्सवाची बॅनर्स हटवून दिवाळीची सजावट, रोषणाई सुरू करा की आता!
ती गणेशोत्सव मतदानाची लिंक अजून दिसतीये नविन लेखनात.
लिहा म्हटल्यावर बाफ वरची
लिहा म्हटल्यावर बाफ वरची वर्दळ कमी झाली वाटतं
स्फुर्तीदेवतेकडे धाव घेतली असेल सगळ्यांनी (आपापल्या अर्थात...)