शोधा म्हणजे सापडेल.............
चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?
रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.
चला तर मग ही वैविध्यपूर्ण अशी कोडी डोकं चालवून पटापट सोडवा बरं!
नियम :-
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. या खेळात ठराविक वेळेच्या अंतराने वेगवेगळी कोडी दिली जातील. दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पूर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरील प्रतिसादात अपलोड करायचा.
दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
कागदावर उतरवून घ्यायचे मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
एक्सेल वर बनवा. तिथे सोडवा नंतर त्याचा स्क्रिनशॉट चा फोटो इथे प्रतिसादात द्या
ज्यांना आधीचे तिन्ही पर्याय जमत नसतील ते प्रतिसादात व्यवस्थित क्रमांक घालून उत्तरे लिहू शकतात.
परंतु पुर्ण कोडे/उत्तरेच येथे द्यायची आहेत. कृपया अपुर्ण कोडी/उत्तरे प्रतिसादात देऊ नयेत.
४. काही वेळेस कोडे सोडवण्याबरोबरच अधिकची माहितीही विचारली जाईल. कोड्यासोबत ती माहितीही देणे अनिवार्य आहे.
५. नविन कोडी इथेच मुख्य धाग्यावरती दिली जातील.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शब्दकोडे क्रमांक - ५ . नियती
यात आपल्याला १५ पात्रांची नावे शोधायची आहेत. आणि त्यांचे लेखक आणि त्यांच्या कथा/कादंबरींचे नाव यांचा देखील उल्लेख करायचा आहे.
---------------------------------------------------------
"शब्दकोडे क्रमांक ८"... उदयन
यात आपल्याला २४ पुस्तकांची नावे शोधायची आहेत आणि त्यांच्या लेखकांचा उल्लेख सुध्दा करायचा आहे.
उभी, आडवी, तिरकी, खालुन वर... सगळ्या प्रकारची आहे ... शोधा शोधा..
-----------------------------------------------------------------------------------------------
उत्तरे प्रतिसादात लिहिली तरी चालतील परंतु पुर्ण कोडे कृपया मुळ कोड्यावरुनच सोडवुन इथे देण्याचा प्रयत्न करावा इतरांना देखील उत्तरे कळायला हवीत.
शब्दकोडे १ - उदयन..
शब्दकोडे १ - उदयन..
अरे वा. मस्तच. काश मी आज घरी
अरे वा. मस्तच. काश मी आज घरी असते. ऑफिसमधुन इतका वेळ देणे शक्य नाहीय.. संध्याकाळी मात्र नक्कीच भाग घेईन.
व्वा ! शब्दकोड्याची संकल्पना
व्वा ! शब्दकोड्याची संकल्पना खूप छान..... आवडली.
कोडे इथेच ऑनलाइन सोडविण्याची सोय असती तर अधिक छान झाले असते.
सुमारे दोन वर्षांपूर्वी मी एका ब्लॉग/वेबसाइटवर ऑनलाइन सोडविण्याचे मराठी शब्दकोडे पाहिल्याचं आठवतंय.
शब्दकोडे चांगले तयार झाले
शब्दकोडे चांगले तयार झाले आहे. ज्यांनी कोणी बनवले असेल त्यांच्यासाठी टाळ्या.
सोडवायचा प्रयत्न करतो.
कोडे इथेच ऑनलाइन सोडविण्याची
कोडे इथेच ऑनलाइन सोडविण्याची सोय असती तर अधिक छान झाले असते. +१
ज्यांनी कोणी बनवले असेल त्यांच्यासाठी टाळ्या. +१
कोडे मस्त आहे. क्ल्यूज वाचता
कोडे मस्त आहे. क्ल्यूज वाचता वाचता काही शब्द आलेही. पण प्रिन्ट घेऊन ते भरणे आणि परत अपलोड करणे काही शक्य होणार नाही
खरेतर वाचताना -
खरेतर वाचताना - प्रत्येकाने त्याला जे शब्द आले ते नंबर - उभे आडवे इत्यादी माहिती देऊन इथे लिहिले आणि मग नंतर कोणीतरी ते शब्द कोड्यात लिहुन इथे टाकले तर जास्त मज्जा आली असती असे वाटलेले. मी दोनतिन शब्द लिहिलेलेही उत्साहाच्या भरात पण मग नियम वाचल्यावर एडिटले.
कोडे भरुन अपलोड करणे बहुतेकांना शक्य होणार नाही, तेव्हा संयोजक मंडळाने मी वर लिहिलेय तसे करता येईल का हा विचार करुन पाहावा एकदा.
कोडे मस्त आहे. क्ल्यूज वाचता
कोडे मस्त आहे. क्ल्यूज वाचता वाचता काही शब्द आलेही. पण प्रिन्ट घेऊन ते भरणे आणि परत अपलोड करणे काही शक्य होणार नाही अरेरे>>> +१
पौर्णिमा +१ प्रिंट घेणं शक्य
पौर्णिमा +१
प्रिंट घेणं शक्य नाहीये.
प्रिंट घेऊन डोके खाजवायला
प्रिंट घेऊन डोके खाजवायला लागणार.
(No subject)
मंजूडी, एक्सेलच्या माध्यमातून
मंजूडी,
एक्सेलच्या माध्यमातून हे शक्य झाल्यास छान होईल.
--------------------------------------------------------------------------------------------
संयोजक,
संपर्कातून मेल केली आहे. कृपया वाचावी.
सध्या अतिमहत्त्वाचे काम
सध्या अतिमहत्त्वाचे काम आल्यामुळे वेळ देऊ शकत नाहीये, पण यासंदर्भात प्रयत्न करते नक्की.
MBD shabdakode1.doc (38 KB)
MBD shabdakode1.doc (38 KB) ही फाईल अॅक्सेस होतेय का बघा.
मात्र मायबोलीवर शब्द लिहून एकेक अक्षर तिकडे पेस्ट करावे लागेल
आत्तापर्यंत इतकं
आत्तापर्यंत इतकं सुटलं.
बाकीचं फारच जास्त नाटक बेस्ड आहे. दुर्गी नामक प्रकार ठाऊक नाही. गूगलून सापडलं नाही. शिवराळकर मी वाचत नाही. त्यामुळे कुणी अडलेले २ शब्द सांगेल तर गिफ्ट विभागून घ्यायला माझी ना नाही, किंवा सगळंच तुम्ही घेतलंत तरी हरकत नाही
हाईला!!! इब्लिस, भारी हां...
हाईला!!! इब्लिस, भारी हां... ३१, ३५ उभ्या शब्दांसाठी माझ्याकडून तुम्हाला बक्षीस.
तुमच्या आधीच्या उत्तरांत 'बादशाह' करा म्हणून सांगणार होते, पण मनपाचे कार्य यावर अडले होते.
बाकी, १३ उभं 'दारा' आहे. दुर्गी, सुर्याची पिल्लं मीही शोधतेय.
नमस्कार,. दिलेले कोडे आधी
नमस्कार,.
दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
कागदावर उतरवून घ्यायचे मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
एक्सेल वर बनवा. तिथे सोडवा नंतर त्याचा स्क्रिनशॉट चा फोटो इथे प्रतिसादात द्या
ज्यांना आधीचे तिन्ही पर्याय जमत नसतील ते प्रतिसादात व्यवस्थित क्रमांक घालून उत्तरे लिहू शकतात.
परंतु पुर्ण कोडे/उत्तरेच येथे द्यायची आहेत. कृपया अपुर्ण कोडी/उत्तरे प्रतिसादात देऊ नयेत.
काही वेळेत दुसरे कोडे दिले
काही वेळेत दुसरे कोडे दिले जाईल
अहो संयोजक, इतके कठोर होऊ
अहो संयोजक, इतके कठोर होऊ नका. ज्यांनी कोडे सोडवायचा प्रयत्न केला त्यांना निदान शाबासकी देऊन उत्तेजन तरी द्या.
'पू'र्ण आणि अ'पू'र्ण.
या शब्दकोड्याची उत्तरे मिळणार आहेत का?
१३ आडवे "दामु" (दुर्गी आणि
१३ आडवे "दामु" (दुर्गी आणि सुर्याची पिल्ले दोन्हीचे दिग्दर्शक दामु केंकरे इती गुगल्बाबा)
मंजुडी थ्यांकू. कविन, दामु
मंजुडी थ्यांकू.
कविन, दामु बसते. अन दाराही बसले. दामु पर्यंत येत होते, पण सुशी वाचत नसल्याने पुढे काही कन्फार्मेशन नव्हते.
ते महाप्राण काय आहे? ॐ कारच ना? महाप्राण अक्षरे असतात कखग इ.?
संयोजक, अहो खेळ आहे
संयोजक,
अहो खेळ आहे हा.
स्पर्धा करा, बक्षिस ठेवा मग अक्खं सोडवून लावतो.
नै बघत काही लोक नाटकं. मी मेडीकल कोडं देऊ का करून? कुणाला सुटणार नाहीत असे शब्द घालता येतील. पण मग त्यात फक्त कठीण प्रश्न विचारल्याचा आनंद मिळेल. तोदेखिल फक्त मला.
जौद्या गडे! तुम्ही किनै फारच कडक आहात
लाल रंगातील उत्तरासाठी कविन व मंजूडी यांचे आभार.
महाप्राण चुकलेले असू शकते.
अरे!!! पहिलं कोडं काढून का
अरे!!! पहिलं कोडं काढून का टाकलं? निदान इथे प्रतिसादांत तरी द्या की राव...
नविन शब्दकोडे हेडरमध्ये
नविन शब्दकोडे हेडरमध्ये टाकले आहे.
इब्लिस, तुम्ही शब्दकोडे १
इब्लिस, तुम्ही शब्दकोडे १ जवळजवळ पूर्ण सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
पूर्णामायची लेकरे, माणदेशी
पूर्णामायची लेकरे, माणदेशी हवा (असचं कां?)
दुर्गभ्रमणगाथा
दुर्गभ्रमणगाथा
पडघवली, जैत रे जैत, माचीवरला
पडघवली, जैत रे जैत, माचीवरला बुधा
सोनपरीचे आजोबा - गो. नी.
सोनपरीचे आजोबा - गो. नी. दांडेकर
मंजूडी ने उत्तर पोस्ट
मंजूडी ने उत्तर पोस्ट केल्यामुळे संपादित करतेय कारण मी पुर्ण उत्तर लिहीलं नव्हतं
मंजे, मस्तच
Pages