२) "शब्दकोडे" - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 05:56

शोधा म्हणजे सापडेल.............

चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?

रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.

चला तर मग ही वैविध्यपूर्ण अशी कोडी डोकं चालवून पटापट सोडवा बरं!

नियम :-

. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
. या खेळात ठराविक वेळेच्या अंतराने वेगवेगळी कोडी दिली जातील. दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पूर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरील प्रतिसादात अपलोड करायचा.
दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
कागदावर उतरवून घ्यायचे मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
एक्सेल वर बनवा. तिथे सोडवा नंतर त्याचा स्क्रिनशॉट चा फोटो इथे प्रतिसादात द्या

ज्यांना आधीचे तिन्ही पर्याय जमत नसतील ते प्रतिसादात व्यवस्थित क्रमांक घालून उत्तरे लिहू शकतात.
परंतु पुर्ण कोडे/उत्तरेच येथे द्यायची आहेत. कृपया अपुर्ण कोडी/उत्तरे प्रतिसादात देऊ नयेत.

. काही वेळेस कोडे सोडवण्याबरोबरच अधिकची माहितीही विचारली जाईल. कोड्यासोबत ती माहितीही देणे अनिवार्य आहे.
५. नविन कोडी इथेच मुख्य धाग्यावरती दिली जातील.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

शब्दकोडे क्रमांक - ५ . नियती

यात आपल्याला १५ पात्रांची नावे शोधायची आहेत. आणि त्यांचे लेखक आणि त्यांच्या कथा/कादंबरींचे नाव यांचा देखील उल्लेख करायचा आहे.

---------------------------------------------------------

"शब्दकोडे क्रमांक ८"... उदयन

यात आपल्याला २४ पुस्तकांची नावे शोधायची आहेत आणि त्यांच्या लेखकांचा उल्लेख सुध्दा करायचा आहे.

उभी, आडवी, तिरकी, खालुन वर... सगळ्या प्रकारची आहे ... शोधा शोधा..
-----------------------------------------------------------------------------------------------

उत्तरे प्रतिसादात लिहिली तरी चालतील परंतु पुर्ण कोडे कृपया मुळ कोड्यावरुनच सोडवुन इथे देण्याचा प्रयत्न करावा इतरांना देखील उत्तरे कळायला हवीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन शब्दकोडे दिलेले आहे.

कृपया त्याच्या खाली दिलेल्या सुचना देखील लक्षात घ्या..

संयोजक हा धागा विसरलेत वाटतं.
अर्धे मुर्धे सापडलेत तेवढे लिहून ठेवतो इथे.

समिधा, विशाखा : कुसुमाग्रज
पर्व : एस. एल. भैरप्पा
पुनव : प्रा. राम शेवाळकर
कमला : तेंडुलकर

म्हयशीचे लग्न असं काही पुस्तक आहे का?
कमोदिनी? लय? स्वेदगंगा? भूमि? रीटा? बेरीज? अस्वल?

जा मुली जा?

मस्तर, चर्च, परंपरा हे पण शब्द सापडले

कमोदिनी- रणजीत देसाई
स्वेदगंगा- विंदा करंदीकर
बाकीची माहीत नाहीत.
रीटा नावाचा सिनेमा आहे. पण कादंबरीचं नाव रिटा वेलिणकर आहे. लेखिका शांता गोखले.

मायबोलीकरहो,

ज्या लेखकांनी गद्य आणि पद्य असे दोन्ही प्रकारचे लिखाण केलेले आहे अशा लेखकांच्या पुस्तकांची नावे शोधायची आहेत. कृपया शब्दकोड्यासोबत दिलेली उदाहरणे समजून घ्या आणि मग शोधास सुरूवात करा.

इब्लिस तुम्हाला शेवटची वॉर्नींग देतोय. नीट्पणे प्रतिसाद लिहा नाहीतर सदस्यत्व रद्द करण्यात येईल.

एक शब्दकोडे दिल्यावर मायबोलीकरांना ते पूर्णपणे सोडवता यावे याकरता आम्ही वेळ देत आहोत.

ज्यांनी कोणी कोडे अर्धवट सोडवून बरोबर उत्तर दिले आहे त्यांनी पूर्ण बरोबर उत्तर देणार्‍या मायबोलीकरासाठी थांबावे ही विनंती.

शब्दकोडे क्र. ४
१.स्मृतीचित्रे- लक्ष्मीबाई टिळक.
२.सांगत्ये ऐका- हंसा वाडकर
३.आयदान- उर्मिला पवार.
४.अमलताश- सुप्रिया दीक्षित.
५.झिम्मा- विजया मेहता.
६.कोसबाडच्या टेकडीवरून- अनुताई वाघ.
७.बंध अनुबंध- कमल पाध्ये.
८.जेव्हा माणूस जागा होतो- गोदावरी परुळेकर
९.कुणास्तव कुणीतरी- यशोदा पाडगावकर.
१०.चाकाची खुर्ची- नसीमा हुरजूक
११.नाच गं घुमा- माधवी देसाई.
१२.समिधा - साधना आमटे.
१३.रास- सुमा करंदीकर.

माझा सध्या गणित-सप्ताह सुरू असल्याने म.भा.दि.कडे फिरकताही आले नाही Sad
कोडे ४ :
१ स्मृतिचित्रे : लक्ष्मीबाई टिळक
२ माझी कहाणी : पार्वतीबाई आठवले
३ मी भरून पावले आहे : मेहरुन्निसा दलवाई
४ आयदान : उर्मिला पवार
५ जेव्हा माणूस जागा होतो : गोदावरी परुळेकर
६ अमलताश : सुप्रिया दी़क्षित
७ सांगत्ये ऐका : हंसा वाडकर
८ कोसबाडच्या टेकडीवरून : अनुताई वाघ
९ कुणास्तव कुणीतरी : यशोदा पाडगावकर
१०झिम्मा : विजया मेहता
११नाच गं घुमा : माधवी देसाई
१२बंध अनुबंध : कमल पाध्ये
१३ समिधा : साधना आपटे
१४ माझी जीवनयात्रा : पेंढारकर लीलाबाई
१५. मागे वळून : मथुताई आठल्ये
१६. झिम्मा : विजया मेहता
१७. चाकाची खुर्ची : नसीमा हुरजूक (साभार : नीलमपरी)

कोडे ३ मध्ये किती लेखक आहेत आणि कोडे ४ मध्ये किती आत्मचरित्रे आहेत ते सांगणार का?

भरत मयेकर,

कोडे क्र. ३ मध्ये ५ साहित्यिक आणि त्यांची प्रत्येकी ३ पुस्तके आहेत.

कोडे क्र. ४ मध्ये २० आत्मचरित्रे आहेत.

सर्व उत्तरे सापडल्यावर प्रतिसादात उत्तरे द्या पण ज्याप्रमाणे वर मंजूडीने कोड्यामध्ये रेषा मारून उत्तरे दर्शवली आहेत त्याप्रमाणे करून टाकलेत ( कोडे पेंट मध्ये उघडून उत्तरांवर रेषा मारून मग स्क्रीन शॉट घेऊन टाकता येईल.) तर अधिक उत्तम.

कृपया असे उत्तर दिल्यास इतरांना देखील उत्तरे कुठे आहे हे समजण्यास सोप्पे जाईल.

Pages