१) "बोलीभाषेची काव्यधारा" - मराठी भाषा दिवस २०१४
Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 06:29
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. अगदी दर दहा कोसांवर मराठीचं रुपडं बदलतं. वर्हाडी, अहिराणी, मालवणी, बेळगावी, कोल्हापुरी, नागपुरी, झाडीबोली अशा अनेक बोलीभाषांतून विविध विषयांना सामावणारं, लोकांशी थेट आणि जवळचा संवाद साधणारं लिखाण झालं आहे. बहिणाबाईंची कविता अहिराणीत होत्या. मालवणी दशावतारांसारख्या लोककलांमधून सर्वत्र पोहोचली. झाडीबोली रंगभूमी आजही पूर्व विदर्भात जोम धरून आहे.
विषय: