नमस्कार मंडळी !
सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू झाले आहे/ होत आहे त्याची माहिती देत आहे.
जून महिन्यामध्ये अमरावती येथे आपण गावमित्रांचे प्रशिक्षण व नियोजन शिबीर घेतले. त्या शिबीरात पुढील वर्षभर काय काय करायचे याची आखणी आपण केली. त्याच्या अभ्यासाचा भाग शोभाताईंनी तयार करून गावमित्रांना सांगितला व त्याप्रमाणे त्यांची तयारी करून घेतली.
सस्नेह नमस्कार! सालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू होत आहे त्याची माहिती देत आहे.
मागील कामाचा आढावा :
गेली चार वर्षे मेळघाटामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांसाठी अभ्यासपूरक अनेक उपक्रम घेत आहोत. आपली त्यांच्याबरोबर चालू असलेली ही ‘मैत्रीशाळा’ च आहे. गावामधील थोडेसे शिकलेले तरुण, (प्रत्येकी एक ) ज्यांना आपण ‘गावमित्र’ म्हणतो, संपुर्ण शैक्षणिक वर्षात (जुलै ते एप्रिल) शाळा भरण्याच्या आधी मुलांना जमा करुन त्यांचे शाळेचे शिकणे सोपे व्हावे यासाठी काम करतात. काय काय करतात ते?