✪ मैत्री संस्थेतल्या मित्रांसोबत भेट
✪ मैत्री = सामाजिक कामासाठी काही करणा-या मित्रांचा गट
✪ मैत्रीच्या उत्तराखंड पूराच्या वेळेच्या कामाच्या आठवणी
✪ मैत्री एक इनोव्हेटीव्ह मॉडेल
✪ दोन करामती आजींचं इनोव्हेशन
✪ सामाजिक कार्य म्हणजे त्याग- परिश्रम असंच असलं पाहिजे असं नाही
✪ आपण काय करू शकतो?
✪ नागपूरमध्ये विशेष मुलांसोबत भेट
✪ विशेष मुलांसोबत चालू असलेल्या कामाची ओळख
✪ स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज?
✪ ये शाम मस्तानी!
✪ मळभ हटताना
✪ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे
✪ गरज फक्त सोबत देण्याची
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. त्यातले काहीजण त्यांच्या कामात चांगले यश मिळवतात. त्यानुसार त्यांची दखल विविध माध्यमांतून घेतली जाते. गौरव, सत्कार, पुरस्कार अशा अनेक प्रकारे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यामुळे या व्यक्तींना एक वलय प्राप्त होते. त्यांची कर्तबगारी हेच त्यांचे समाजासाठी मोठे योगदान असते.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ९ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
नमस्कार,
मायबोलीकरांनी मिळून सामाजिक उपक्रम सुरु करुन ९ वर्षे झाली. यंदा या उपक्रमाचे १० वे वर्ष. गेली ९ वर्षे मायबोलीकरांनी व मायबोलीकर नसलेल्या दात्यांनी देखील या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. मायबोलीकरांनी सढळ हातांनी दिलेल्या देणग्यांमुळे सामाजिक उपक्रमाद्वारे अनेक गरजू संस्थांना मदत करणे शक्य झाले.
कायम चांगल्या संस्था निवडणे, त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्या गरजा, देणग्यांचा मेळ बसविणे, सर्व देणगीदारांना पावत्या वेळेवर मिळणे ही सर्व स्वयंसेवकांची महत्वाची कामे यात केली जातात.
नमस्कार,
मायबोलीवरील सामाजिक उपक्रमाच्या पहिल्या आवाहनाची वेळ झाली आहे.
हा उपक्रम यंदाही केला जाईल व याकरता स्वयंसेवक हवे आहेत.
उपक्रमातील सर्वच सहभागी स्वयंसेवकांना पुढील कामे करावी लागतात :
१. आपली ईमेल्स नेहमी पहाणे व उपक्रमासंबधी इथे अथवा ईमेलने आलेल्या सर्व प्रश्नांना वेळेवर उत्तर देणे.
२. देणगीदारांची यादी व देणगीच्या रकमा यांची लगेच योग्य जागी नोंद करणे व इतर स्वयंसेवकांना देखील लगेच ती माहिती पुरवणे.
३. उपक्रमाच्या कामाच्या ठराविक पायर्या असतात. ती कामे वेळेवर पार पाडणे.
यावर्षी एकूण जमा झालेल्या देणगीतील रुपये २५,०००/- (पंचवीस हजार) एवढी देणगी राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्थेद्वारे चालविल्या जाणार्या सुमति बालवन शाळा व पाखरमाया अनाथाश्रमाला देण्यात आली.
सदर देणगीचा विनियोग संस्थेने अनाथाअश्रमाकरता किराणा मालाची खरेदी आणि उरलेला निधी मुलांना वापरण्याकरता भिंतीत कपाटे बनवणे याकरता केला.
सुमति बालवन/पाखरमाया ह्यांना मदतीचा हात पुढे करणार्या सर्व देणगीदारांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानणारे पत्र, कपाटांचे फोटो आणि खरेदीच्या पावत्या आपल्याला पाठवल्या आहेत, त्या इथे पाहता
येतील.
आभारपत्र
यावर्षी एकूण जमा झालेल्या देणगीतील रुपये २५,०००/- (पंचवीस हजार) फक्त एवढी देणगी सावली सेवा ट्रस्टला देवदासींच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आली.
सदर देणगीतून ट्रस्टने मुलांच्या शाळा-कॉलेजेसचे शुल्क भरणे तसेच गणवेश, चपला, बूट, दप्तरे इत्यादींची खरेदी केली. त्यांच्या पावत्या त्यांनी पाठवल्या आहेत.
तसेच देणगीदार आणि सावली सेवा ट्रस्टला मदतीचा हात पुढे करणार्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानणारे पत्रही त्यांनी मुलांच्या प्रगतीच्या अहवालासकट पाठवले आहे.
१) आभारपत्र
नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे सहावे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांसाठी थोडक्यात ओळख,
या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.
देणग्या मार्च-एप्रिल या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.
आतापर्यंत खालील संस्थांना या उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली,