हे दु:ख ऊरी माझ्या; आसवे डोळ्यात तुझ्या कां?
मी असता दारी त्याच्या; मागणे शब्दात तुझ्या कां?
*
व्यक्त जाहलो कवितेतून; जाणले तुज गझलेतून
सांगत मी माझे असतांना, लाजणे गालात तुझ्या कां?
*
ऋतु आले गेले कितीही, चिंब होतो प्रेमातच तरीही
गात मल्हार मी असतांना; पैंजणे पायात तुझ्या कां?
*
नभ माझे माझ्यापुरते, क्षितिजाचे त्याला कुंपण
हा चंद्र ओंजळीत माझ्या, चांदणे ह्रूदयात तुझ्या कां?
*
-अशोक
दि २६-०५-२०१८
वाहवा मिळावी यासाठी
मी नव्हते रचिले तुज कविते,
आरसा दिसावा यासाठी
तुज हृदयी मी धरिले होते.
पाहता मला आले थोडे
दिसलोही थोडा इतरांना,
पण पूर्णबिंब दिसण्याआधी
वाहवा धडकली दोघांना
मग छिन्न भिन्न हो दर्पण ते
'मी' आणिक 'तू'चे शततुकडे
तुकड्यांतुन माझी शतबिंबे
मन कोणा कोणाला पकडे?
-------
एकाच आरशामधून का
दिसशील तुला तू पूर्णपणे?
वाहवा तुझी ना, माझी ती
बघ तुला पुन्हा तू नवेपणे !
~ चैतन्य दीक्षित
माझ्या समोरचा कागद कोराच राहतो,
भावनांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा विचारांचा गुंता वाढतो,
विचारांचा गुंता सोडवता सोडवता
जेव्हा शब्दांचा गुंता वाढतो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
विचारांच्या गर्दीत प्रत्येक चेहरा अनोळखीच भासतो,
किंबहुना आपल्या विचारांशी आपलाच गहिरा संबंध असतो,
कधीकधी मनातून कागदावर उतरता उतरता
तो विचार पुन्हा गर्दीत हरवून जातो,
तेव्हा माझ्या समोरचा कागद कोराच राहतो.
कविता माझी उर्वशी
रागातच लटक्या ती दूरदेशी निघून गेली
आर्जवे शब्दांची लाख लाख जरी केली
शपथा किती किती घातल्या अर्थाच्या
धमक्याही खूप दिल्या जीव देण्याच्या
बधली ना ती जराही विव्हळ मज केले
जाता जाता माझे तीने सर्वस्व हो नेले
तुटले अन्नपाणी गोड काही काही लागेना
तिच्याशिवाय जळीस्थळी कोणीही दिसेना
शब्दांचे घनदाट जंगल पिंजून मी काढले
भावहीन काटे मज ठायी ठायी टोचले
उपाय सारे जरी थकले हाथ मी टेकणार नाही
घेतला वसा शब्दांचा सारस्वत टाकणार नाही
तू माझ्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीस,
तुला माझ्यातली 'मी' कधीच सापडणार नाही,
तू जिथे शोधशील तिथे मी गवसणार नाही,
जिथे जाशील तिथे गैरसमजाच्या धुक्यात हरवशील,
तुला माझ्यातल्या "मी "चा पत्ता सापडेल कधी ना कधी,
तू त्या दिशेने चालायला लागशील,
वाटेत तुला तो गाठेल - माझा भूतकाळ,
त्याचे किस्से ऐकून तू अर्ध्या रस्त्यातून परतशील,
इकडचे तिकडचे कितीतरी वारे तुझे कान भरतील,
खोट्या, ऐकीव गोष्टी गोंगाट करतील,
तुला 'माझा' आवाज ऐकू येईनासा होईल,
सत्य कुठेतरी कोपऱ्यात दडी मारून बसेल,
ती यायची म्हणे रोज या कवितांच्या बागेत
तासंतास रमायची म्हणे
प्रत्येक कवितेजवळ थांबून विचारपूस करायची
हसऱ्या लाजऱ्या कवितांचं
फार म्हणजे फार
अप्रुप असायचं तिला
कितीतरी कवितांना कुशीत घेऊन
गोंजारत, थोपटत राहायची म्हणे
एखाद्या खळाळून हसणाऱ्या कवितेला
उगाच गुदगुल्या करून
स्वतःच खुसूखुसू हसायची
आणि अनेक गंभीर ,दुःखी कवितांमध्ये बघायची वाकून वाकून स्वतःच प्रतिबिंब
पुटपुटायची ,
"विरून गेलेल्या स्वप्नांची कविता होत असते अशी "
...
गेले कित्येक दिवस ती फिरकलीच नाहीये इकडे
पण
२१ मार्च ला विश्व कविता दिवस होता, त्यानिमित्याने मला महाकवी कालीदास ह्यांच्या बद्दल आणि उज्जयनी बद्दल लिहावेसे वाटले.
उज्जैन, मध्यप्रदेशात दर वर्षी कार्तिक शुक्ल एकादशी पासून कालिदास समारोह सुरु होतो. कालिदासांच नावं घेतल कि मला माझ माहेर आठ्वत! मध्यप्रदेश च शहर उज्जैन हे कालिदासांच शहर आहे, मी माझी मास्टर्स डिग्री इथूनच केली होती. इथे राहूनच मला कालिदासांच वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळाली.
या कविता माझ्या नाहीत,
या कविता तिच्या आहेत
जी मी लिहायला बसल्यावर
माझ्या हातातलं पेन नकळत ओढून घेते,
समोरचा कागद शब्दांनी भरभर व्यापते,
तिच्या कवितांना यमक नसतं, ताल नसतो, लय नसते,
फक्त शब्दांच्या फटीमध्ये लपलेलं भय दिसते,
या कविता माझ्या नाहीत, तिच्या आहेत
जिला काहीही आठवलं, सुचलं तरी लिहायचं असतं,
काही काळ बुडण्याची चिंता सोडून अलगद वाहायचं असतं,
विचारांना शब्द आपोआप येऊन बिलगतात आणि ती फक्त मांडत राहते,
अनुभवांची बरणी नकळत कलंडते आणि वेदना कागदावर सांडत जाते,
पेशी दुंभगतात आणि जोडून राहतात
असे काही तुकडे.
शिवण घालून जोडले जातात, अंगचेच होतात
असे गोधडीसारखे काही तुकडे.
माझे आणि माझ्या जगाचेही.
जगाचा एक तुकडा माझ्या एका तुकड्याला ओळखतो.
दुसरा दुसर्याला.
जग तुकड्यापुरतं
मीही तुकड्यापुरतीच
अनोळखी तुकड्यांची वाट दिसत नाही,
बघाविशी वाटत नाही
जगाला आणि मलाही.
जगाला मी कळलेली असते आणि मला जग.
- नी
कधी काळी पुलं 'मराठी साहित्याचा गाळीव इतिहास' लिहून गेले. आता गाळीव इतिहासाचे दिवस संपले. सध्याच्या काळात इतिहास 'पाळीव' झाला आहे. पर्यायी तथ्यांच्या गोठ्यात सत्तेच्या दावणीला बांधून घेऊन तो रवंथ करत असतो. ते एक असो. पण स्वतःची कुवत आणि अभ्यास ह्यांची नम्र जाणीव असल्याने मी काही इतिहास वगैरे लिहू शकत नाही. तो रसिकांसाठी एक 'छळीव' इतिहास ठरेल. ह्याची जाण ठेवूनही इतिहासकाराच्या थाटात म्हणतो, की महाराष्ट्र अगदी आधीपासूनच बालप्रतिभांच्या प्रेमात बुडालेला देश आहे.