कविता

Submitted by श्यामली on 25 March, 2018 - 09:31

ती यायची म्हणे रोज या कवितांच्या बागेत
तासंतास रमायची म्हणे
प्रत्येक कवितेजवळ थांबून विचारपूस करायची
हसऱ्या लाजऱ्या कवितांचं
फार म्हणजे फार
अप्रुप असायचं तिला
कितीतरी कवितांना कुशीत घेऊन
गोंजारत, थोपटत राहायची म्हणे
एखाद्या खळाळून हसणाऱ्या कवितेला
उगाच गुदगुल्या करून
स्वतःच खुसूखुसू हसायची
आणि अनेक गंभीर ,दुःखी कवितांमध्ये बघायची वाकून वाकून स्वतःच प्रतिबिंब
पुटपुटायची ,
"विरून गेलेल्या स्वप्नांची कविता होत असते अशी "
...
गेले कित्येक दिवस ती फिरकलीच नाहीये इकडे
पण
त्या तिथे मागे बागेच्या कोपऱ्यात
नवीन कविता कोणी लावलीये ?

~कामिनी फडणीस केंभावी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या ब्बात है!
अतिशय सहज,सखोल!
अजून लिहा,लिहीत रहा...
आपल्या नवीन कवितांच्या,प्रत्येक रोपट्यास खूप-खूप वसंत-शुभेच्छा!