माझ्या आठवणीतली मायबोली या विषयावर यंदा मायबोलीच्या गणेशोत्सवानिमित्त लेख लिहायचा आहे मायबोली २५ वर्षांची झाली , तुझा लेख वाचायला आवडेल असा अगदी सुरवातीला एका माबो मित्रानं मेसेज केला, म्ह्टल अरेच्चा २५ वर्ष झाली ?
पुन्हा एका दिवसानंतर दुस-या एका माबो मित्रानं स्टेट्सला मायबोली गणेशोत्सवाची लिंक पोस्ट केली होती , पुन्हा येऊन बघून गेले, लिहाव वटायला लागलं पण मुहुर्त मिळेना , थोडासा आळस आणि उगाच काहीबाही कारण, तर ते असो, नमन झालं घडाभर तेल पण झालं
ती यायची म्हणे रोज या कवितांच्या बागेत
तासंतास रमायची म्हणे
प्रत्येक कवितेजवळ थांबून विचारपूस करायची
हसऱ्या लाजऱ्या कवितांचं
फार म्हणजे फार
अप्रुप असायचं तिला
कितीतरी कवितांना कुशीत घेऊन
गोंजारत, थोपटत राहायची म्हणे
एखाद्या खळाळून हसणाऱ्या कवितेला
उगाच गुदगुल्या करून
स्वतःच खुसूखुसू हसायची
आणि अनेक गंभीर ,दुःखी कवितांमध्ये बघायची वाकून वाकून स्वतःच प्रतिबिंब
पुटपुटायची ,
"विरून गेलेल्या स्वप्नांची कविता होत असते अशी "
...
गेले कित्येक दिवस ती फिरकलीच नाहीये इकडे
पण
देहावर मोहरली रिमझिम सावरिया
अधरावर गुणगुणली थरथर सावरिया
लगबग बघ न्यासांची
तगमग या श्वासांची
स्पर्श स्पर्श छेडती; राधा सावरिया
न्यासांना, श्वासांना साज दे सावरिया...
साज दे सावरिया
खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया
हे गाण माझ्या चांदणशेला या अल्बममधे महालक्ष्मी अय्यरनी गायलं आहे.
मायबोलीवरील कवयित्री,गझलकार श्यामली उर्फ'' कामिनी फडणीस-केंभावी'' यांच्या ''चांदणशेला'' या अल्बुमबाबत गौरवोद्गार असलेला लेख लोकसत्तेच्या कालच्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.... श्यामली यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून अनेक उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होवो हीच सदिच्छा.
अनिरुद्ध भातखंडे - रविवार, ८ जुलै २०१२
सकाळपासून फोन, समस, आणि ई-मेल्सचा वर्षाव चालू आहे...औरंगाबादकरांना कौतुक वाटणं स्वाभाविकच. मजा वाटत्ये या सगळ्याची
ही त्या पानाची लिंक
हे या बातमीच चित्र मायबोलीवर अपलोड करण्यासारखं व्यवस्थित करुन पाठवल्याबद्दल बित्तुबंगाजींना पेशल धन्यवाद
काही हातून घडावे ऐसा तुझाच मानस
तुझ्या इच्छेविना देवा माझे बापुडे साहस!
२ जानेवारी , मेलबॉक्समधे एक मेल येऊन पडली, सिंगरहरी अशा नावानी आलेली. म्हटल काय स्पॅम असणार जाऊच द्या. मग अचानक आठवल की, अरे महिनाभरापूर्वी आपण हरिहरन सरांच्या मॅनेजरला गाण्यासाठी मेल टाकली होती. त्यांच उत्तर आलं की काय चक्क!!!!!
येस्...तीच मेल होती, अमुक तारखेला, दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या स्वतःच्या(च) स्टुडिओमधे रेकॉर्डिंग असेल. अग्ग्ग्ग्ग्ग बाब्बो! जागी आहे का मी नक्की? नक्की हे वाचतेय का?
सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?
अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
काही सुचवण्या स्वाती_आंबोळे यांच्या..त्याबद्दल स्वातीला धन्यवाद.
ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला
ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला
ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा-भाका.. तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. हिरमुसला चांदणशेला
~श्यामली