Submitted by श्यामली on 11 March, 2010 - 05:28
सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?
अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
काही सुचवण्या स्वाती_आंबोळे यांच्या..त्याबद्दल स्वातीला धन्यवाद.
गुलमोहर:
शेअर करा
मस्त !!
मस्त !!
सहीये! रुचावे न काही सुचावे
सहीये!
रुचावे न काही सुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?>>>>>>>> मस्त!
अहा..क्या बात है ! खुलासे,
अहा..क्या बात है !
खुलासे, अंबर आणि मक्ता............खूप आवडले
लिखा करो जानेमन जानेजिगर
छान! आवडली!!
छान! आवडली!!
वा ! गझल फार फार आवडली
वा ! गझल फार फार आवडली .प्रत्येक शेर अगदी मोत्याचा दाणा .मस्त .
मस्त. सुचावे न काही रुचावे
मस्त.
सुचावे न काही रुचावे मनासी>>> हा मिसरा फार आवडला..
शेवटचा खास
>अबोलीपरी गंध घ्यावा
>अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
वा! सुरेख! सगळीच गझल आवडली!
सही. पूर्ण गजल आवडली.
सही. पूर्ण गजल आवडली.
मोगरा आणि खुलासा
मोगरा आणि खुलासा सुंदरच.
शेवटचा शेर - तुलाही समासी
मुळे समजला नाही.
म्हणजे 'reserve/ margin' मध्ये ठेवले, असे का?
-सविनय.
एकदम मस्त गझल. नकळते स्वत:ला
एकदम मस्त गझल.
नकळते स्वत:ला हा खास आवडला.
अबोली आणि मोगरा वाह! खरेच मोगर्याला असे वाटु शकेल ही कल्पनाच एकदम निराळी.
मस्त गझल!!!!! अगदी खास.
मस्त गझल!!!!!
अगदी खास.
नुसत्या मक्त्यावर श्यामली
नुसत्या मक्त्यावर श्यामली तुम्हाला काही गावं इनाम द्यायला हवीत...
मतला-सुंदर , मक्ता - अतिवसुंदर अन त्यामधलं : अप्रतीम !!!! जियो !!!
गिरीश, मक्ता कुठाय?
गिरीश, मक्ता कुठाय?
अबोली-मोगरा आणि व्यथा सुंदर!
छान गझल. <<न कळते स्वत:ला असे
छान गझल.
<<न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?<< खूप छान!
खूप सुन्दर नेहमीप्रमाणेच.
खूप सुन्दर नेहमीप्रमाणेच. श्यामल पुस्तक ड्यु आहे हं.
---------------------------------------------------------------------
मोगर्याचा मिटायचा मूड असेल तर मोगर्याचे अत्तर लावा
न कळते स्वत:ला असे काय
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी
जाम आवडले.
क्या बात है श्यामली! सगळेच
क्या बात है श्यामली! सगळेच शेर आवडेश!
शेवटचा शेर मात्र खासच!
अगदी खास.
अगदी खास.
खूप खूप धन्यवाद लोकहो
खूप खूप धन्यवाद लोकहो

ब-याचदिवसांपासून(दोन वर्ष :अओ:) या गझलेचे चार शेर लिहून पडले होते....पाचव्या शेराविना
काल शेवटी अर्धवटच गझल पोस्ट करायची असं ठरवून इथे पेस्ट केली आणि सेव्हवर क्लिकायच्या जस्ट आधी हा शेर सुचला...मजा आली
अलकाताई..तुम्हाला मेल करते
त्यापेक्षा भारतातल चालेल.
मामी...पुस्तक??कसलं म्हणे?
गिरीश...कुठली कुठली गावं देताय? चायनामधली नको बर्का
मी अजूनही लिहिताना बरेच गोंधळ घालते
पूनम... ठांकू 
व्वा , सर्वच द्विपदी आवडल्या-
व्वा , सर्वच द्विपदी आवडल्या- मस्त गझल !
श्यामली, सुरेख आहे. आवडली.
श्यामली, सुरेख आहे. आवडली.
आहाहा.. सुंदर!!
आहाहा.. सुंदर!!
अबोलीपरी गंध घ्यावा
अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ? >> हे मस्तच
अत: पासुन इती पर्यंत परिपुर्ण
अत: पासुन इती पर्यंत परिपुर्ण सुरेख गझल
वाह!
वाह!
क्या बात
क्या बात है...
खासकरून...
<<<न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?>>> हे फ़ार आवडले.
श्यामले,मस्त गझल..
श्यामले,मस्त गझल..
श्या.. मस्त मस्त.. काही काही
श्या.. मस्त मस्त..
काही काही सुटे सुटे मिसरे फार आवडले...
सुचावे; न काही रुचावे मनासी
खुलासे कसे काय देऊ जगासी ?
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
>>> मस्तच
छान आहे - आवडली ! >>अबोलीपरी
छान आहे - आवडली !
>>अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी
व्वाह !
[भाईंची आठवण आलीच
नंद्या, भाईंची आठवण आलीच>>>
नंद्या, भाईंची आठवण आलीच>>> सं स्प क . हे असं अर्धवट काय?

तुम्हा सगळ्यांना धन्यवाद लोकहो....उगाच जुन्या मायबोलीवर आल्यासारखं वाटत आजकाल.
Pages