Submitted by श्यामली on 14 February, 2013 - 02:14
देहावर मोहरली रिमझिम सावरिया
अधरावर गुणगुणली थरथर सावरिया
लगबग बघ न्यासांची
तगमग या श्वासांची
स्पर्श स्पर्श छेडती; राधा सावरिया
न्यासांना, श्वासांना साज दे सावरिया...
साज दे सावरिया
खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया
हे गाण माझ्या चांदणशेला या अल्बममधे महालक्ष्मी अय्यरनी गायलं आहे.
तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
sundar. majha awadata
sundar. majha awadata
मस्त!
मस्त!
एखादी नर्तकी बेभान होऊन नृत्य
एखादी नर्तकी बेभान होऊन नृत्य करत आहे असे दृष्य डोळ्यासमोर आले. शीर्षकासकट अतिशय मोहमयी वाटली रचना! मनापासून अभिनंदन, शब्दनिवडीबद्दल!
धन्यवाद!
खोल खोल अंतरात दीप चेतले
खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया
या शब्दांना सुंदर संगीतसाज लाभो..
सुरेख रचना. जाईच्या कळ्यांचा
सुरेख रचना. जाईच्या कळ्यांचा गजरा पाहिजे त्या नर्त़कीला. आणि चांदीचे पैंजण.
या गाण्याचं रेकॉर्डिंग झालय
या गाण्याचं रेकॉर्डिंग झालय ना
भारतीताई, यांच गाणं झालंय हो
भारतीताई, यांच गाणं झालंय हो महालक्ष्मी अय्यर नी गायलं आहे.
होय, मैत्री मी तसे टॅग्ज टाकले आहेत खर तर; वरती पण अपडेट करते
धन्यवाद मंडळी
शीर्षकासकट अतिशय मोहमयी वाटली
शीर्षकासकट अतिशय मोहमयी वाटली रचना! >>> बेफींच्या मताशी सहमत.
हा अल्बम कुठे मिळेल विकत
हा अल्बम कुठे मिळेल विकत घ्यायला? माहिती द्या.
एक्दम झक्कास.......आवडेश
एक्दम झक्कास.......आवडेश
खूपच छान रचना.
खूपच छान रचना.
एकदम मस्त रचना गाणं कसं
एकदम मस्त रचना गाणं कसं ऐकायला मिळेल? महालक्ष्मीचा आवाज आवडतो
अरे वा! मग लिंक द्या ना
अरे वा! मग लिंक द्या ना श्यामली योग्य वाटत असेल तर ,आणि आल्बमचं नावही.
चांदणशेला फ्रि डाऊनलोड
चांदणशेला फ्रि डाऊनलोड
अहाहा...... कसं
अहाहा...... कसं अलवार.......नाजुक पण बेभान सुद्धा..........क्या मूड बनाया जानेमन .....जियो
अल्बमबद्दल अभिनंदन
अल्बमबद्दल अभिनंदन श्यामली.
वरच्या लिंकवरुन फक्त चांदणशेला तेवढं उघडलं. बाकी गाणी अजून ऐकायची आहेत. चांदणशेला ह्या कवितेचं वाचन कुणाच्या आवाजात आहे? महालक्ष्मी अय्यर का? तिचं मराठी थोडं खटकलं कानाला.
वा वा खूप
वा वा खूप छान
बेफीजी+१
आल्बम??? मला नव्हतं माहीत असो अभिनंदन माझ्यातर्फे
धन्यवाद सगळ्यांना अमा,
धन्यवाद सगळ्यांना
अमा, फ्लिपकार्ट या साईटवर, तसेच रिदम हाउस मधे अल्बम आहे. वर दिलेल्या लिंकमधेही आहे.
सायो, चांदणशेला मीच वाचलय ग उच्चार खटकले असतील तर कळव नक्की, सुधारणा करायला आवडेलच
उच्चार खटकले म्हणण्यापेक्षा
उच्चार खटकले म्हणण्यापेक्षा जसं म्हटलं आहेस ते कानाला खटकलं. नंतर पुन्हा एकदा ऐकते आणि सांगते काय खटकलंय ते.
अल्बमबद्दल अभिनंदन, श्यामली
अल्बमबद्दल अभिनंदन, श्यामली
मस्त!
मस्त!
शामजी धन्स
शामजी धन्स
सुंदर. चालीत ऐकण्याची मौज
सुंदर.
चालीत ऐकण्याची मौज अनुभवायला हवी.
यू ट्यूबवर अपलोड केले आहे काय?
मस्त !
मस्त !
ते नामांकनाचं पण सांगा ना ताई
ते नामांकनाचं पण सांगा ना ताई इथे.
खुपच सुंदर ! अल्बम सुंदर आहे
खुपच सुंदर ! अल्बम सुंदर आहे वा ! मस्त.................
शाम....... मी सांगते ते
शाम....... मी सांगते ते नामांकनाचं.खरं तर मी अभिनंदनीय कामगिरी मधे त्याबद्दल लिहिलंय पण इथे पुन्हा लिहिते
http://www.maayboli.com/node/24933?page=5
आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) आणि सोनाली जोशी ह्या दोघींचेही संगीत अल्बम्स अनुक्रम "चांदणशेला" आणि "सांगावा"...... यंदाच्या मराठी चित्रपट परिवार पुरस्कारासाठी नामंकित झाले आहेत.
ही लिंक तुम्ही बघू शकता
http://marathichitrapatparivar.com/puraskar.htm
दोघींचेही मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!!
मायबोली रॉक्स
शाम, जयू थँक्स दोस्तस
शाम, जयू थँक्स दोस्तस