देहावर मोहरली रिमझीम सावरिया

Submitted by श्यामली on 14 February, 2013 - 02:14

देहावर मोहरली रिमझिम सावरिया
अधरावर गुणगुणली थरथर सावरिया

लगबग बघ न्यासांची
तगमग या श्वासांची
स्पर्श स्पर्श छेडती; राधा सावरिया
न्यासांना, श्वासांना साज दे सावरिया...
साज दे सावरिया

खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया

हे गाण माझ्या चांदणशेला या अल्बममधे महालक्ष्मी अय्यरनी गायलं आहे.

तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादी नर्तकी बेभान होऊन नृत्य करत आहे असे दृष्य डोळ्यासमोर आले. शीर्षकासकट अतिशय मोहमयी वाटली रचना! मनापासून अभिनंदन, शब्दनिवडीबद्दल!

धन्यवाद!

खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया

या शब्दांना सुंदर संगीतसाज लाभो..

भारतीताई, यांच गाणं झालंय हो Happy महालक्ष्मी अय्यर नी गायलं आहे.

होय, मैत्री Happy मी तसे टॅग्ज टाकले आहेत खर तर; वरती पण अपडेट करते
धन्यवाद मंडळी Happy

अहाहा...... कसं अलवार.......नाजुक पण बेभान सुद्धा..........क्या मूड बनाया जानेमन .....जियो Happy

अल्बमबद्दल अभिनंदन श्यामली.

वरच्या लिंकवरुन फक्त चांदणशेला तेवढं उघडलं. बाकी गाणी अजून ऐकायची आहेत. चांदणशेला ह्या कवितेचं वाचन कुणाच्या आवाजात आहे? महालक्ष्मी अय्यर का? तिचं मराठी थोडं खटकलं कानाला.

वा वा खूप छान
बेफीजी+१
आल्बम??? मला नव्हतं माहीत असो अभिनंदन माझ्यातर्फे Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy
अमा, फ्लिपकार्ट या साईटवर, तसेच रिदम हाउस मधे अल्बम आहे. वर दिलेल्या लिंकमधेही आहे.

सायो, चांदणशेला मीच वाचलय ग Happy उच्चार खटकले असतील तर कळव नक्की, सुधारणा करायला आवडेलच

उच्चार खटकले म्हणण्यापेक्षा जसं म्हटलं आहेस ते कानाला खटकलं. नंतर पुन्हा एकदा ऐकते आणि सांगते काय खटकलंय ते.

मस्त !

शाम....... मी सांगते ते नामांकनाचं.खरं तर मी अभिनंदनीय कामगिरी मधे त्याबद्दल लिहिलंय पण इथे पुन्हा लिहिते Happy

http://www.maayboli.com/node/24933?page=5

आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) आणि सोनाली जोशी ह्या दोघींचेही संगीत अल्बम्स अनुक्रम "चांदणशेला" आणि "सांगावा"...... यंदाच्या मराठी चित्रपट परिवार पुरस्कारासाठी नामंकित झाले आहेत.

ही लिंक तुम्ही बघू शकता

http://marathichitrapatparivar.com/puraskar.htm

दोघींचेही मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!!

मायबोली रॉक्स