आनंदी-आनंद गडे!
इकडे, तिकडे, चोहिंकडे,
वरती-खाली मोद भरे,
वायूसंगे मोद फ़िरे,
नभांत भरला,
दिशांत फ़िरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे,
आनंदी-आनंद गडे!
या ओळींनी अगदी लहानपणी बालकवींशी ओळख झाली.
कधी काळी पुलं 'मराठी साहित्याचा गाळीव इतिहास' लिहून गेले. आता गाळीव इतिहासाचे दिवस संपले. सध्याच्या काळात इतिहास 'पाळीव' झाला आहे. पर्यायी तथ्यांच्या गोठ्यात सत्तेच्या दावणीला बांधून घेऊन तो रवंथ करत असतो. ते एक असो. पण स्वतःची कुवत आणि अभ्यास ह्यांची नम्र जाणीव असल्याने मी काही इतिहास वगैरे लिहू शकत नाही. तो रसिकांसाठी एक 'छळीव' इतिहास ठरेल. ह्याची जाण ठेवूनही इतिहासकाराच्या थाटात म्हणतो, की महाराष्ट्र अगदी आधीपासूनच बालप्रतिभांच्या प्रेमात बुडालेला देश आहे.
छोट्यांसाठी कविता स्पर्धा
माझं नाव चिऊ, आडनाव चिमणे
आवडतात मला खायला दाणे||१||
माझं नाव काऊ, आडनाव कावळे
सगळे म्हणतात तुम्ही किती बावळे||२||
माझं नाव माऊ, आडनाव मांजरे
सगळ्यांपेक्षा आहेत डोळे माझे घारे||३||
ही आपल्या छोट्या अवनीला सुचलेली कविता.. पोस्टरसाठी हवी म्हटल्यावर एका आवडत्या कवितेवरुन प्रेरणा घेऊन तिने लिहून दिली. या छोट्यांमध्येही "बाल"कवी दडलेले आहेत. मग स्पर्धेसाठी अजून कोण कोण लिहिणार कविता?
स्पर्धेसाठी नियम व माहिती-