मराठी भाषा दिन घोषणा

कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.
चला तर मग मंडळी, सज्ज होऊयात कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी संपन्न होणाऱ्या या आपल्या मायमराठीच्या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्यास आणि अभिमानाने म्हणण्यास,
लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य,ऐकतो मराठी !!
२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत, २०१५ वर्षीचा अपवाद वगळता . यंदाचं हे सलग सातवे वर्षं.
यात सहभागी झालेल्या आणि उपक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार. प्रताधिकार संदर्भात चिनूक्स यांनी जी मदत केली त्याबद्दल संयोजक मंडळ ऋणी आहे. नेहमीप्रमाणेच अॅडमिन आणि वेबमास्तरांचेही सर्व प्रकारच्या सहाय्याबद्दल आणि उत्तेजनाबद्दल तसेच संयोजन मंडळात काम करायची संधी दिल्याबद्दल आभार !!
कधी काळी पुलं 'मराठी साहित्याचा गाळीव इतिहास' लिहून गेले. आता गाळीव इतिहासाचे दिवस संपले. सध्याच्या काळात इतिहास 'पाळीव' झाला आहे. पर्यायी तथ्यांच्या गोठ्यात सत्तेच्या दावणीला बांधून घेऊन तो रवंथ करत असतो. ते एक असो. पण स्वतःची कुवत आणि अभ्यास ह्यांची नम्र जाणीव असल्याने मी काही इतिहास वगैरे लिहू शकत नाही. तो रसिकांसाठी एक 'छळीव' इतिहास ठरेल. ह्याची जाण ठेवूनही इतिहासकाराच्या थाटात म्हणतो, की महाराष्ट्र अगदी आधीपासूनच बालप्रतिभांच्या प्रेमात बुडालेला देश आहे.
शब्दशॄंखला
लोकहो, घेऊन येत आहोत मागच्या वर्षी मायबोलीवर लोकप्रिय झालेला खेळ - शब्दशॄंखला.
आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.
वाक्य बनवा
आपण लहानपणी शिकलो आहोत मराठी भाषेत वाक्य बनते - कर्ता कर्म क्रियापद ह्या क्रमाने. त्यातच विशेषण, सर्वनाम, क्रियाविशेषण ह्यांची लुडबुडही चालू असते.
ह्या खेळात आम्ही तुम्हाला अक्षरांचा संच देणार आहोत, त्यातील अक्षराने सुरू होणारे अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवायचं आहे.
उदा. अक्षरसंच - ह म र
हरी मुंबईमधे रहातो.
नियम -
१. दिलेल्या प्रत्येक संचाचे एक वाक्य लिहायचे आहे.
२. एक आयडी एकापेक्षा जास्त वाक्ये लिहू शकतो.
३. दिलेल्या अक्षराने सुरू होणारे जोडाक्षर चालेल.
४. वाक्य अर्थपूर्ण असायला हवे.
गोष्ट तशी छोटी
कथा प्रकारातला हा प्रकार सर्वाना माहीत झालाय. अतिशय छोटी कथा काहीजण ह्याला सुक्ष्मकथा म्हणतात इंग्रजीमध्ये टेन वर्ड्स स्टोरी, हंड्रेड वर्ड्स स्टोरी अश्या नावांनी ओळखलं जातं.
अर्थ माझा वेगळा
नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.
जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.
तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.
काव्यालंकार
खरंतर एखादी कविता म्हणजे शब्दाची रचना नव्हे. यमक जुळवले की कविता होत नाही तर ती कविता वाचल्यानंतर जे भाव मनात उरतात ती कविता. कवितेला वय नसतं ,आयुष्य नसतं. विषयाचं ,वेळेचं, बंधन नसतं. शब्द भाव अमर असतात. तर अश्याच आपल्या सुंदर भावनांना कवितेत गुंफून सुंदर भाव भरूया.
सवाल जवाब
मनामनातील खेळ असती निराळे
हर एक खेळाचे नवे रंग नवे तराणे
खेळाचा सामना असतो मोठा चुरशीचा
खेळ रंगता सवाल नसतो मर्जीचा.
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांची कोडी सोडवत असतो. कधी वर्तमानपत्रातले, मासिकातले तर हल्ली मोबाईलमध्ये आणि रोज आयुष्यात. या खेळात आपण खेळणार आहोत सवाल-जवाब.
नियम -
१. संयोजक रोज एक विषय देतील.
२. विषयाला अनुसरून एक कोडे देतील.
३. जो सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील तो पुढचे कोडे देणार.
४. एखादे कोडे अडल्यास जमेल तसा क्लू द्यावा.
पहिला विषय : मराठी चित्रपट
मराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा
ज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगती चालती द-याखो-यातील शिळा’, अशा शब्दांत मराठी भाषेचा गोडवा गायला आहे. मराठी भाषेचे इतके गर्भरेशमी वर्णन करणारे कुसुमाग्रज हे चिंतनशील लेखक, कवी, नाटककार होते. त्यांच्या मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. आपल्या ह्या भाषेची गोडी पुढल्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून हा उपक्रम.