Submitted by मभा दिन संयोजक on 7 March, 2018 - 00:20
२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत, २०१५ वर्षीचा अपवाद वगळता . यंदाचं हे सलग सातवे वर्षं.
यात सहभागी झालेल्या आणि उपक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार. प्रताधिकार संदर्भात चिनूक्स यांनी जी मदत केली त्याबद्दल संयोजक मंडळ ऋणी आहे. नेहमीप्रमाणेच अॅडमिन आणि वेबमास्तरांचेही सर्व प्रकारच्या सहाय्याबद्दल आणि उत्तेजनाबद्दल तसेच संयोजन मंडळात काम करायची संधी दिल्याबद्दल आभार !!
यंदाच्या उपक्रमाला आमच्या अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. आमच्या कल्पना तुमच्यापर्यंत नीट पोचवण्यात कदाचित आम्हीच कमी पडलो. खेळांना मिळालेला भरघोस प्रतिसाद विशेषतः "अर्थ माझा वेगळा" बघून आम्हाला पुरेपूर मजा आली. एवढे बोलून आपली रजा घेतो! भेटत राहू इथेच!!
- संयोजक मंडळ.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मभा दिन संयोजक हा नवा आयडी
मभा दिन संयोजक हा नवा आयडी मिळाल्याबद्दल यंदाच्या संयोजकांचं अभिनंदन.
) घरात पडून असलेली दोन पुस्तके मायबोली मराठी भाषा दिनाच्या उपक्रमानिमित्त सलग वाचली. त्याबद्दल संयोजकांचेही आभार.
उपक्रमांत जिथे भाग घेतला, तिथे मजा आली.
अनेक दिवस (महिने/वर्षं
यंदा मनुष्यबळ कमी पडलंय असं वाटतं. संयोजनात सहभागी सदस्यांची नावे कळतील का?
तुमचा हा उपक्रम खूप आवडला
तुमचा हा उपक्रम खूप आवडला.यातूनच मी मायबोलीवर आणि नेट वर सुद्धा पहिल्यांदाच लेखन केल.आणि मराठीच्या पेपरची प्रॅक्टीस पण झाली.आयोजीत केलेले सगळे उपक्रम आवडले.पुढच्या वर्षी अजून प्रतिसाद मिळेल नवीन सदस्य अॅड झाल्यावर.
भरत ह्यांच्यासारखंच म्हणतो.
भरत ह्यांच्यासारखंच म्हणतो. जिथे भाग घेतला, तिथे मजा आली. अजून काही लेख वाचायचे आहेत, पण सगळे एक से एक असतील ह्यात काही शंकाच नाही. प्रतिसाद कमी वा जास्त मिळतो ह्याची अजूनही बरीच कारणं असतात असं गेल्या १-२ वर्षांत दिसतंय, त्यामुळे त्याचं इतकं काही वाटून घ्या. ह्या निमित्ताने मनातलं मराठीवरचं प्रेम व्यक्त करायला प्रोत्साहन मिळालं, हे मला खूप छान वाटलं.
तुम्ही कष्ट घेतले, त्याबद्दल विशेष आभार.
वैयक्तिक टेंशनमुळे आणि व्यस्त
वैयक्तिक टेंशनमुळे आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे फारसा सहभाग नोंदवता आला नाही. पण उपक्रम यावेळी छान होते. नावीण्य होते. उपक्रम ऐवजी स्पर्धा स्वरूप असते तर कदाचित जास्त लोकांनी सहभाग घेतला असते असे वाटते. कारण मराठी लोकांना एकमेकांशी स्पर्धा करायला आवडते
उपक्रमांत जिथे भाग घेतला,
उपक्रमांत जिथे भाग घेतला, तिथे मजा आली.>>>>>>
+1
काही उपक्रम थोडे कठीण वाटले, अलंकार वापरून कविता करणे वगैरे माझ्या बस की बात नाही, त्यामुळे माझा सहभाग गद्य उपक्रमांपुरताच राहिला
धन्यवाद संयोजक
उपक्रम छानच होते, आवडले. पण
उपक्रम छानच होते, आवडले. पण लिहीता हात नसल्याने अलंकारांत बसणारे / चांगले असे काही सुचले नाही चटकन आणि काही घरगुती कारणांमुळे वेळ देताही आला नाही फारसा.
'अर्थ माझा वेगळा'ने खूप शब्द नव्याने कळले/ आठवले.
कविता कमी आवडतात, त्यामुळे रसग्रहण नाहीच, पण लिहीली आहेत सुंदर सर्वांनी. एका एका ओळीवर थांबून मध चाखल्यासारखी.
संयोजकांचे कौतुक आणि आभार.
@भरत -- प्राजक्ता_ शिरीन, अक्षय दुधाळ, madhusudan, युवराज्ञी -- आणखी १-२ नावे होती ती विसरले. त्यांनी नावे दिली होती संयोजक होण्यासाठी.
गोष्ट तयार करायचा उपक्रम छान
गोष्ट तयार करायचा उपक्रम छान होता.मनाला येईल ते लिहीता आल.
उपक्रम साजरा करण्यासाठी
उपक्रम साजरा करण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतलेत, वेळ खर्च केलात, त्यासाठी अनेक धन्यवाद, संयोजक.
वैयक्तिक कारणांमुळे मायबोलीवरच फार सातत्याने येता येत नाही सध्या, त्यामुळे एकाच उपक्रमात भाग घेता आला (तोही वाढीव मुदत मिळाल्यावर!) - पण तो माझा तोटा समजते मी, तुमच्या प्रयत्नांतली कसर नव्हे.
सगळे धागेसुद्धा अजून वाचलेले नाहीत उपक्रमातले, जे वाचले ते फार आवडलेत आणि तसं नोंदवलंही आहे.
संयोजक, कदाचित वेळ कमी पडला
संयोजक, कदाचित वेळ कमी पडला असणार तुम्हाला, नाहीतर वाहत्या बाफांवर जाहिरात करणे हा एक उपाय लागू पडतो बर्याच वेळा.
तरीही वेळात वेळ काढून संयोजनात तुम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि उपक्रम साजरा केलात हे मह्त्त्वाचे. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! उपक्रम छान होते. मंडळात नावेही नविन दिसतायत यावेळी, ही पण उत्साहवर्धक गोष्ट आहे.
तब्येत बरी नसल्याने आणि धावपळ
तब्येत बरी नसल्याने आणि धावपळ असल्याने या वेळी मराठी भाषा दिनाच्या उपक्रमात भाग घेता आला नाही .
अजून एक गोष्ट म्हणजे या उपक्रमातील बाफ मराठी भाषा दिन ग्रुपचे सभासद झाल्यावरच पाहायला मिळतात . त्यामुळे देखील वाचले गेले नाहीत .आताशी हा बाफ वर आल्यावर लक्षात आलं की ग्रुपचे सभासद झाल्यावरच इतर बाफ वाचता येतात . दोन तीन बाफ वाचून प्रतिसाद दिलेत .बाकीचेही वाचून पोस्ट करेन .
उपक्रमाच्या संयोजकांचे कौतुक आणि अभिनंदन . चांगले उपक्रम राबवलेत .
ग्रुपचे सभासद झाल्यावरच इतर
ग्रुपचे सभासद झाल्यावरच इतर बाफ वाचता येतात>> "मायबोलीवर नवीन" दुव्यावर सर्व धागे दिसत आहेत (ग्रूपाचे सभासद नसतानाही).
Admin , मला रसग्रहण बाफ सभासद
Admin , मला रसग्रहण बाफ सभासद झाल्यावर दिसू लागले .
काहीतरी गडबड आहे
गेला आठवडा वेळ नाही झाला फार,
गेला आठवडा वेळ नाही झाला फार, पण आज हे इतके सगळे बाफ एकदम दिसल्यावर मेजवानी मिळाली. धन्यवाद मभादि संयोजक!
admin, हो सभासद न होता आत्ता वाचता आले. पण ते तिथे आहेत हेच माहित न्हवते! माझ्यासाठी नवीन आणि ग्रुप मध्ये नवीन पेक्षा मायबोलीवर नवीन मध्ये काय वेगळं असतं हे माहितच करून घेतलं न्हवत मी! मला वाटतं ज्या ग्रुपचा मी सभासद नाही आणि जो कंटेन्ट त्या ग्रुप मध्ये सार्वजनिक आहे तो तिकडे दिसत असावा.
मभादि हा मायबोलीचा उपक्रम असल्याने तो जरी ग्रुप मध्ये क्लासिफाय केला (जेणे करून सगळं एकत्र दिसेल आणि ग्रुपची इतर फीचर्स वापरता येतील) तरी तो ग्रुप सगळ्यांच्या फीड मध्ये default जावा. कोणाला सोडायचा असेल तर मुभा असावी पण default add मध्ये असावा असं वाटलं.
Admin , मला रसग्रहण बाफ सभासद
Admin , मला रसग्रहण बाफ सभासद झाल्यावर दिसू लागले . काहीतरी गडबड आहे >>> मा़झेही तसेच झाले.
आता वाचते. 
काही खेळ कठीण वाटले, अलंकार
काही खेळ कठीण वाटले, अलंकार कविता. काही मस्त होते. मजा आली.
एका शब्दाचे अनेक अर्थ तो खेळ वाचताना मजा आली, काहीजणांनी फार सुंदर लिहिलं.
संयोजक मंडळींचे आभार.
Admin , मला रसग्रहण बाफ सभासद
Admin , मला रसग्रहण बाफ सभासद झाल्यावर दिसू लागले . काहीतरी गडबड आहे >>> मलाही, आत्ता सभासद झाल्यावर एकदम खजिना समोर आल्यासारखे झाले आहे
मभादि चे लेख थेट सर्वांसमोर आले असते तरी चालले असते.
मला वैयक्तिक कारणाने यंदा भाग
मला वैयक्तिक कारणाने यंदा भाग घेता येणार नव्हता हे माहीत होते. पण माबोच्या नव्या अवतारात मला मभादिचे धागे दिसलेच नाहीत
आत्ता टिपापावर कळले आता शोधून वाचेन!
अॅडमिन, उपक्रमाचे सर्व धागे ज्या पानावर दिसतात त्या पानाची लिंक माबोवर सर्वात वरती पिन करून ठेवता येईल का? धागे वाचण्यासाठी तसेही ग्रुपचे सभासद असणे आवश्यक नसावे.
मला अजून रसग्रहण लिहायची
मला अजून रसग्रहण लिहायची इच्छा होती, पण २ च प्रतिसाद आल्याने माझा लिहण्यातला रस गेला.
बहुतेक आपलं लिखाण फारसं चांगलं झालं नसेल, असा माझ्यापुरता मी निष्कर्ष काढला.
अजून दुसऱ्या मुद्द्याचा मी केलेला विचार असा की, इथे कवितांवरही खूप कमी प्रतिसाद असतात, तर कदाचित कवितेचे रसग्रहण वाचणारे अजून कमी लोक असतील.
काही असले तरी, संयोजकांचे आभार. बाकी सर्व उपक्रम छान होते.
म भा दि चे धागे ग्रुपच्या सभासदांशिवाय इतरांना दिसत नव्हते हे वाचून थोडं वाईट नक्कीच वाटतंय.
फार भाग घेता आला नाही तरी
फार भाग घेता आला नाही तरी उपक्रम छान होते. मजा आली.
संयोजकांचे मंडळाचे कौतुक आणि आभार .
चला, म्हणजे मला एकटीलाच दिसत
चला, म्हणजे मला एकटीलाच दिसत नव्हते असे नाहीये तर .
संयोजक मंडळाचे कौतुक आणि आभार
संयोजक मंडळाचे कौतुक आणि आभार
त्यामुळे त्याचं इतकं काही
त्यामुळे त्याचं इतकं काही वाटून घ्या>>>
टायपो आज लक्षात आला. अजिबात काही वाटून घेऊ नका. 
अलंकाराचा उपक्रम मला नीट
अलंकाराचा उपक्रम मला नीट झेपलाच नाही.बाकी रसग्रहण आणि गोष्ट तयार करा मला खूप आवडले .त्यात भागही घेतला.सोप्या उपक्रमांना खूप प्रतीसाद मिळाले.मला अस वाटत जर स्पर्धा ठेवाल तर प्रतिसादांची संख्या वाढेल .बाकी उपक्रमांबद्दल आयोजकांचे धन्यवाद.
ंआयबोली वर नवीन बघितले जात
ंआयबोली वर नवीन बघितले जात नाही, सो उपक्रम मिस झाला.. गावा बाहेर गेले असल्याने, पूर्ण्वएळ नेट अॅक्सेस देखील नव्हता.
संयोजक मंडळाचे कौतुक आणि आभार
संयोजक मंडळाचे कौतुक आणि आभार >>>+१०१
हा गेल्या वर्षीचा धागा आहे.
हा गेल्या वर्षीचा धागा आहे.
घाबरलो ना मी, इतक्यातच समारोप झाला म्हणून.
@ भरत
@ भरत
धन्यवाद...
तरीही प्रतिसाद असाच ठेवतो कारण ऋणनिर्देश करण्यासारखे सुंदर काम नाही.
हे सगळे नक्की कुठे आहेत? मला
हे सगळे नक्की कुठे आहेत? मला फक्त research related articles दिसत आहेत
हे सगळे नक्की कुठे आहेत? मला
हे सगळे नक्की कुठे आहेत? मला फक्त research related articles दिसत आहेत >>
इथे पहा. कृपया धन्यवाद.
https://www.maayboli.com/marathibhashadin/2019