कविता माझी उर्वशी
Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 April, 2018 - 04:41
कविता माझी उर्वशी
रागातच लटक्या ती दूरदेशी निघून गेली
आर्जवे शब्दांची लाख लाख जरी केली
शपथा किती किती घातल्या अर्थाच्या
धमक्याही खूप दिल्या जीव देण्याच्या
बधली ना ती जराही विव्हळ मज केले
जाता जाता माझे तीने सर्वस्व हो नेले
तुटले अन्नपाणी गोड काही काही लागेना
तिच्याशिवाय जळीस्थळी कोणीही दिसेना
शब्दांचे घनदाट जंगल पिंजून मी काढले
भावहीन काटे मज ठायी ठायी टोचले
उपाय सारे जरी थकले हाथ मी टेकणार नाही
घेतला वसा शब्दांचा सारस्वत टाकणार नाही
विषय: