लहानपणी नवख्या लोणच्याची चव पाहणं हा एक सोहळा असायचा. दुपारी आईची नजर चुकवून बरणीचे झाकण हळूच उघडायचे... लोणच्याची फोड जिभेवर टेकवायची... पाठोपाठ लोणच्यातल्या साखरेला बाजूला सारत करकरीत फोडींची आंबट जर्द चव करवती सारखी सरसरत शेवटच्या दाढेपर्यंत जायची आणि न आलेल्या अक्कल दाढेच्या मोकळ्या परिसरात विरघळून जायची. आहा ! 'अनुभूती' शिवाय त्याला दुसरा शब्द नाही ! पण मोठा झालो तसतशी एक जाणीव व्हायला लागली - ताज्या लोणच्याची चव हवीहवीशी असते हे खरे, पण खाल्ल्यानंतरही त्यातल्या साखरेची गोडी जेवणानंतर खूपवेळ रेंगाळत ठेवणारे मुरलेले लोणचेच जास्त समाधान देते.
नुकताच मी मैत्रीतर्फे मेळघाटात जाउन परत आलो. खरेतर खूप जणांना, मैत्री आणि मेळघाट एकत्र उच्चारताच, सर्वप्रथम आठवतात, त्या वैद्यकीय संदर्भातील धडकमोहिमा. पण मी गेलो होतो शिक्षण संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमाकरता. मैत्रीच्या शैक्षणिक मोहिमेचे हे तिसरे वर्ष.
पहिल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०११-१२ शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता, चिलाटी येथे १०० दिवसांची निवासी शाळा आयोजित केली होती. याद्वारे ४३ मुलांना शाळेत परत प्रवेश घेण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यात आले. त्या सर्वच्या सर्व मुलांनी त्यानंतरच्या वर्षी आपापल्या गावातल्या शाळेत प्रवेश घेतला.
शालेय अभ्यासात उपयोगी पडणार्या बेवसाईटस आणि पुस्तकं यांची नोंद या धाग्यावर करावी.
आयुष्याचे विषय
इतिहासातील तह-कलमांनी
मनात गुंता झाला
टुंड्राच्या अभ्यासाने
भुगोल वेडा झाला!
बीज-गणितातील "क्ष" ही
राक्षसातील वाटून गेला
नाते त्रिज्येशी भूमितीत
परिघाशी "पाय" अडला !
गणितातील शून्याचे
असेच काही झाले
गुणपत्रिकेतच त्याचे
स्थान पक्के झाले!
हायड्रा अमीबा प्राणीशास्त्रातले
भिंगातूनही ना दिसले
अल्गी-फंगी वनस्पती कां ते
शास्त्रानेही ना सांगितले !
शाळेचे ना कुठल्या विषयाचे
आयुष्याशी नाते होते
आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते !
शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?
घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?
रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?
बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?
कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?
मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो.
जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.