नुकताच मी मैत्रीतर्फे मेळघाटात जाउन परत आलो. खरेतर खूप जणांना, मैत्री आणि मेळघाट एकत्र उच्चारताच, सर्वप्रथम आठवतात, त्या वैद्यकीय संदर्भातील धडकमोहिमा. पण मी गेलो होतो शिक्षण संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमाकरता. मैत्रीच्या शैक्षणिक मोहिमेचे हे तिसरे वर्ष.
पहिल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०११-१२ शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता, चिलाटी येथे १०० दिवसांची निवासी शाळा आयोजित केली होती. याद्वारे ४३ मुलांना शाळेत परत प्रवेश घेण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यात आले. त्या सर्वच्या सर्व मुलांनी त्यानंतरच्या वर्षी आपापल्या गावातल्या शाळेत प्रवेश घेतला.
त्यानंतरच्या वर्षी (शैक्षणिक वर्ष २०१२-१३) मैत्रीतर्फे, चिलाटी परिसरातील ३ गावांमधल्या शाळांमधून स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण १०० दिवसंकरता, शैक्षणिक उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. त्यानंतर अनेक ग्रामस्थांनी असाच उपक्रम वर्षभर घ्यावा, जेणेकरून शाळा संपूर्ण वर्ष चालतील, असे सुचवले. स्थानिकांच्या अशा उत्साहवर्धक प्रतिसादामुळे यावर्षीच्या उपक्रमाची आखणी स्वयंसेवक व स्थानिक लोक यांचा मेळ घालून केलेली आहे.
चालू (२०१३-१४) शैक्षणिक वर्षासाठी असा उपक्रम राबवण्याकरता मेळघाटातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या ११ गावांमधून ९-१० वी शिकलेले स्थानिक (कोरकू या आदिवासी जमातीचे) युवक (ज्यांना गावमित्र असे संबोधण्यात येते) यांनाही सामील करून घेण्यात आले आहेत. हे गावमित्र, शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांना शाळा भरायच्या आधी एक तास गोळा करतील आणि त्यांना काही मूलभूत कौशल्ये शिकवतील, ज्यामुळे शाळेमध्ये शिकताना येत असलेल्या त्यांच्या अडचणी कमी होतील अशी योजना आहे. मी जाउन आलो तो अशा उपक्रमाचा दुसरा महिना. शिक्षणासंदर्भात तिथल्या मुलांची मुख्य अडचण आहे ती भाषेची (कारण मातृभाषा कोरकू), पण गावमित्र स्थानिक (कोरकू) आहेत आणि त्यांना मराठी पण चांगले कळते त्यामुळे ते मुलांशी नीट संवाद साधू शकतात.
तर अशा गावामित्रांकरता दर महिन्याला चिलाटीमध्ये एक शिबिर/ कार्यशाळा असते. त्या शिबिरात त्यांना पुढच्या महिन्यात मुलांकडून काय काय करुन घ्यायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. याकरता प्रत्येक महिन्यातील स्वयंसेवकांच्या तुकडीत या आधी जाउन आलेले किमान 2 स्वयंसेवक असतील असे बघितले जाते. त्यांनी चिलाटीमध्ये गावामित्रांना हे प्रशिक्षण देण्याबरोबरच स्वतः दोन गावांमध्ये शाळेत जाउन मुलांना शिकवून दाखवणे / पाठ घेणे अपेक्षित असते. या आधी जाउन आलेला स्वयंसेवक म्हणून माझ्या कामाचे स्वरूप हेच होते. माझ्या बरोबर निगडीस्थित प्राची कुलकर्णी यापण जुन्या स्वयंसेवक होत्या. आमच्या गटातले नवीन दोनही स्वयंसेवक, अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांचे प्रमुख काम आम्हाला जनरल मदत करणे व इतर उपक्रमाची साधने बनवणे असे होते.
इथे लिहायला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो की मायबोलीकर सुनिधी यांनी वास्तुरूपी दिलेली देणगी (प्रत्येकी २०० पाट्या, वह्या, पेन्सिली खोडरबरे ई. साहित्य आम्ही पुण्याहून नेउन मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम पण आमच्या हातून व आमच्या समोर घडले.
मेळघाटातला निसर्ग खूपच सुंदर आहे. पण ‘जितका सुंदर तितका खडतर’ हा निसर्गाचा सार्वकालीन नियम इथेही लागू पडतो. पण अशा खडतर परिस्थितीतही पाठपुराव्यानंतर का होईना पण होत सरकारतर्फे झालेली / होत असलेली काही कामे पाहून या वेळची ही भेट मनास अधिकच समाधान देणारी होती.
तर माझ्या ह्या मेळघाटभेटीची ही सप्रकाशचित्र झलक.
ही असे चिन्ह दाखवणारी पाटी सारखी सारखी बघून निर्माण झालेले कुतूहल लगेचच शमले. जिथे जिथे पाणी रस्त्याला ओलांडून वाहते तिथे एरवी ह्यूम पाईप टाकून छोटा पूल ज्याला कल्व्हर्ट असे म्हणतात त्या ऐवजी त्या ठिकाणचा रस्ताच ‘उतार सपाट व चढ’ अशा स्वरूपाचा आणि काँक्रीटचा केलेला होता, ह्याने प्रवासाचा वेग अगदी कमी झाला तरी पावसाने रस्ता वाहून जाण्याचे प्रमाण नगण्य झालेले दिसले. रस्त्यावरून जास्त पाणी जात असताना रस्ता नक्कीच बंद पडत असेल पण पाणी ओसरल्यावर लगेच वाहतूक चालू होऊ शकते. अगदी ऑगस्ट मध्ये देखील बरेच ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहून जात होते.
सध्या पावसाळ्यामुळे रस्ता खराब झाल्याने, नेहेमी चिलाटी वरून पुढे रूईपठार या गावापर्यंत जाणारी आपली एसटी महामंडळाची लालबस, चिलाटीच्या अलीकडे ३ किमी अंतरावर असलेल्या हातरु या गावापर्यंतच जाते आहे असे कळले. त्यामुळे आम्ही पुण्याहून नेत असलेले सामान कसे न्यायचे अशी विवंचना होती. पण हे साहित्य नेण्याकरता मैत्रीतर्फे एक जीप ठरवून दिली व ह्या साहित्य बरोबरच इतरही महिनाभराचे किराणा व भाजीपाला असे सामान घेउन आम्ही चिलाटीस पोचलो.
मैत्रीचे चिलाटी येथील कार्यालय
पुण्याहून नेलेले शैक्षणिक साहित्य - हे सामान बरोबर न्यायचे असल्याकारणाने मागच्या वेळेस गेलो होतो तसे आगगाडीने बडनेरापर्यंत पुढे तिथून (अर्धा तास शेअररिक्षा) अमरावतीपर्यंत मग अमरावती ते परतवाडा (दीडतास एसटी) व तिथून पुढे परत रुईपठारच्या बसने (चार तास) चिलाटी असा प्रवास त्रासाचाच ठरणार होता. त्यामुळे परतवाड्यापर्यंत जाणारी खासगी बस घ्यायचे ठरले जे थोडे त्रासदायक असले तरी सामान नेण्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठरले.
शैक्षणिक साहित्याचे गावमित्रांकडे हस्तांतरण
कुही नावाच्या गावातल्या एका शाळेला भेट - इथे मी ६ किमी चालत गेलो. जंगलातल्या वाटेने जाताना दिसणारी वृक्षसंपदा बघत बघत व त्या झाडांबद्द्ल, त्यांच्या उपयोगाबद्दल गावमित्रांकडून माहिती करुन घेत असताना वाट कशी सरली तेच कळले नाही.
तिथे पोचेतोवर मुलांची खिचडी खाण्याची वेळ झाली होती.
मग तिथेही सर्वप्रथम साहित्य वाटपाचे काम उरकले.
मग मी पाठ घेऊन दाखवला आणि नंतर गावमित्रांनी पण पाठ घेतले.
अगदी लहान मुलांकडून तर गिरवूनच घ्यावे लागत होते. अगदी लहान खेडी, शाळा सुटल्यावर कुठेही अक्षर दिसायाची मारामार, मग शिकवले तरी लक्षात कसे रहाणार....
ही मुले खरेतर अंगणवाडीतली, पण नवीन पाट्या मिळताहेत म्हटल्यावर ही देखिल मधेमधे येऊन लुडबुड करायला लागली, मग त्यांना पण जुन्या पाट्या दिल्या आणि पहा कशी रंगून गेली आहेत.
मग नंतर रंगांची ओळख व्हावी म्हणून टिपी टिपी टिप टॉप हा खेळ, अंकांशी ओळख व्हावी म्हणून एका एका होडीत किती किती जण असे काही खेळ घेतले.
ही कुहीची शाळा बाहेरुन आणि माझ्या बरोबर आलेले गावमित्र व शाळेचे शिक्षक
हा कुहीचा गावमित्र शाळेच्या वर्गात
And last but not least, ही मैत्रीच्या गावमित्रांची टीम
शाब्बास!
शाब्बास!
साती धन्यवाद...
साती धन्यवाद...:)
छान उपक्रम! हर्पेन आणि सुनिधी
छान उपक्रम! हर्पेन आणि सुनिधी तुमचे खूप कौतुक वाटते.
खूप छान उपक्रम. हार्दीक
खूप छान उपक्रम. हार्दीक अभिनंदन!!
भारी! फार आदर वाटला वाचून.
भारी!
फार आदर वाटला वाचून.
अभिनंदन आणि कौतुक.
अभिनंदन आणि कौतुक.
तुमचे करावे तेवढे कौतुक कमी
तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. एवढे चांगले कार्य हातात घेतल्याबद्दल अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.
भारी! फार आदर वाटला वाचून.
भारी!
फार आदर वाटला वाचून. >>>+१००
अभिनंदन आणि कौतुक..
अभिनंदन आणि कौतुक..
धन्यवाद मंडळी, माझा काय आपला
धन्यवाद मंडळी, माझा काय आपला खारीचा वाटा....
आपल्या नेहेमीच्या जीवनचक्रापासून दूर, शहरी कोलाहलापासून धबडग्यापासून लांब, निसर्गाच्या सानिध्यात, मोबाईलच्या रेंज बाहेर, आपल्याला आपल्याशी संवाद साधायला मिळाल्यामुळे, इतके निवांत आणि छान वाटते की काही काम करतोय ही भावना रहातच नाही, उलट कमीत कमी गरजांमधे, विनातक्रार कसे रहाता येऊ शकते हे शिकायला मिळते.
या वर्षी हा अनुभव घेण्याची संधी संपुर्ण वर्षभरात मिळू शकते, ज्यांना कोणाला शक्य होणार असेल त्यांनी याचा लाभ घ्यावा.
अभिनंदन.
अभिनंदन.
खुप कौतुक वाटले
खुप कौतुक वाटले हर्पेन.
छान!
लहानांचे निरागस भाव छान आले आहेत.
खूप सुंदर वाटले वाचून.
खूप सुंदर वाटले वाचून.
अंगणवाडीतल्या मुलांच्या चेहर्यावर काय सुंदर भाव आलेत. फार मोठा आब्यास करत असल्याचे!!
खूप खूप कौतूक तुमचं.जास्त
खूप खूप कौतूक तुमचं.जास्त कौतूक ह्यासाठी की "खूप काही मोठं काम करतोय"ही जराही भावना नाही.
फार आदर वाटला वाचून.>+१
सुंदर अनुभव आणि त्याहूनी
सुंदर अनुभव आणि त्याहूनी फोटोतील ती गोंडस मुले अभ्यासात रमलेली पाहताना एक आगळीच मजा. नशीबवान आहात तुम्ही हर्पेन आणि तुम्हाला अशा कार्यक्रमात एकदिलाने साथ देणारी तुमचा 'मैत्री' ग्रुप. शाळेतील फळ्यावरील "दररोज आंघोळ करावी...." हा सुविचार फार भावला....त्या मुलांनाही त्याचे अप्रुप वाटले असणार. बाकी कोरकु भाषेतील ती वाक्ये डोक्यावरूनच गेली असली तर त्या भागातील शिक्षणप्रसाराला शेवटी मातृभाषाच उपयोगी होणार हेच खरे.
भिंतीवर लावण्यात आलेल्या चित्रमालातील पशुपक्षी आणि अन्य घटक यांची माहिती देताना शिक्षक कोणत्या भाषेचा वापर करतात ?
अशोक पाटील
वाह!! तुमचं अभिनंदन आणि
वाह!! तुमचं अभिनंदन आणि कौतुक!:)
कित्ती गोड मुलं आहेत ही!
हर्पेनजी, तुम्हाला संपर्कातुन ईमेल पाठवलं आहे.
कापो, निनाद, वृषाली, धन्यवाद
कापो, निनाद, वृषाली, धन्यवाद
नंदीनी - अंगणवाडीतील मुले फार मोठा आब्यास >>> अगदी अगदी
अशोक. मी नशीबवान हे तर खरेच
ते फळ्यावरचे कोरकूतील गाणे असे आहे
हत्तीला सोंड एक
....ला हात दोन (कोणाला ते मी विसरलो :))
तिवईला पाय तीन
टेबलाला पाय चार
हाताला बोटे पाच.
मुलांना अंक मो़जणी लक्षात रहाण्यासाठी एक वेगळा प्रयास
मी_आर्या - ईमेलला उत्तर दिले आहे.
खूप आदर वाटला वेळ देऊ शकणार
खूप आदर वाटला वेळ देऊ शकणार नाही. दुसर्या कुठल्याप्रकारे संधी मिळत असेल तर नक्की घ्यायला आवडेल. कळवा
रुनी पॉटर +१. खरंच कौतुकास्पद
रुनी पॉटर +१. खरंच कौतुकास्पद आहे.
वा हर्पेन, खरं तर तुझे व
वा हर्पेन, खरं तर तुझे व तुझ्याबरोबरील इतरही सर्वांचे कौतुक करायला माझ्यापाशी शब्दही नाहीत...
त्या सर्व मुलांच्या चेहर्यावरील भाव पहाण्यातच मी रंगून गेलो होतो ...
तू हे सर्व इथे लिहिले नसतेस तर हा किती दुर्गम भाग आहे हे इथे ए. सी.त बसून वाचणार्या मला कसे कळणार रे ?
हा सर्व उपक्रम वाचून उर आनंदाने भरुन गेले व डोळे पाणावलेच ...
सलाम, सलाम तुम्हा सर्व लोकांना ........
"....इथे ए. सी.त बसून
"....इथे ए. सी.त बसून वाचणार्या मला कसे कळणार रे ?...."
~ शशांक, निदान तुम्ही इतके तरी लिहिता....असे कित्येक असतील या दुनियेत की हर्पेन यानी ज्या भागाचे व तेथील मुलांचॅ सचित्र वर्णन केले आहे तो विषय त्यांच्या हिशोबातदेखील येत नसेल. ए.सी. बाहेरही एक विशाल बहुढंगी जग आहे हे माहीत असले तरी पुष्कळ.
खरंच सलाम कराव हर्पेन टीमला.
खूप आदर वाटला >>>> +१ तुमच्या
खूप आदर वाटला >>>> +१ तुमच्या सगळ्या टिमला सलाम.
शशांक, अशोक. बास आता मेळघाट
शशांक, अशोक. बास आता
मेळघाट काही वर्षांपुर्वी मलाही माहित नव्हते, आता माहित झाले आहे बस इतकच
आणि हो मला अशीही माणसे माहित आहेत जे मेळघाट आणि माळशेज यात गल्लत करतात. आम्ही २ दिवसाच्या विकांतामधे तिकडे जाऊन काम करून येतो असे म्हणतात, मग त्यांना सांगायला लागते तिकडे जाण्यायेण्यालाच २ दिवस लागतात म्हणून पण तिकडे जाऊन काम करायचे आहे / करावेसे वाटते आहे ही भावना / कळकळ महत्वाची. मला स्वतःला या भावना आणि कृतीमधले अंतर पार करायला फार्फार दिवस लागले. चालायचेच
हर्पेन, अतिशय कौतुस्कापद
हर्पेन, अतिशय कौतुस्कापद उपक्रम आणि तुमचा सहभाग पण.
हर्पेन, अतिशय कौतुस्कापद
हर्पेन, अतिशय कौतुस्कापद उपक्रम आणि तुमचा सहभाग पण.
तुमच्या सगळ्या टिमला सलाम>>>
तुमच्या सगळ्या टिमला सलाम>>> +१००
हर्पेन अभिनंदन ! कौतुस्कापद
हर्पेन अभिनंदन !
कौतुस्कापद नि इंस्पायरिंग आहे हे
शेअर केल्याबद्दल धन्यवाद
अभिमान वाटला.
अभिमान वाटला.
हर्पेन, अभिनंदन आणि कौतुकही.
हर्पेन, अभिनंदन आणि कौतुकही.
मस्त मस्त! हर्पेन, फोटो व
मस्त मस्त! हर्पेन, फोटो व वृत्तांत दोन्ही भारी!! बंगलोरजवळच्या काही आदिवासी पाड्यांना बर्याच वर्षांपूर्वी भेट द्यायचा योग आला होता. तिथे आत्यंतिक कमी गरजा असणारी आणि अतिशय साधेपणाने राहणारी माणसे, त्यांची आजूबाजूला खेळणारी इवली इवली पोरं यांची हे फोटो पाहून उगाच आठवण झाली!
आपल्या इमेल्स, संभाषणांमधून तुझ्या चिलाटी भेटीबद्दल जे कळले नाही ते या वृत्तांतामधून कळले. भले शाब्बास!!
Pages