बरेच लोक म्हणतात की मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात. म्हणजे याचा अर्थ असा की पुढे चालून मुले चांगले करियर करतात. माझे जवळपास 20 असे मित्र आहेत जे आयुष्यामध्ये आज उत्तम डॉक्टर, इंजिनीयर, कार्पोरेट लीडर, बिझनेस मन, वैज्ञानिक, जर्नलिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या मधले बरेच लोक अगदी लहानपणापासून मराठी असून देखील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. मग मला प्रश्न पडलाय ही खरंच आपण म्हणतो की लहान मुलांनी मातृभाषेत शिकावं हे खरोखरच सायटीफिकली सत्य आहे का?
एक ओंजळ तुझी माझी
यायचास मोठ्या दिमाखात शाळा सुरु होताना
गडगडाट कडकडाट धडाडधूम होताना
किती मज्जा वाटायची तुझ्या सोबत नाचताना
थेंब मस्त मजेत झेलत होड्या हळूच सोडताना
छत्री, रेनकोट द्यायची आई, विसरुन घरी जाताना
पाणी उडवित भिरभिरत परत घरी येताना
डोकं पुसत ओरडे आई किती भिजलास पहाना
चहा गरम आल्याचा भज्यां सोबत खाताना
वय वाढले, गंमत सरली, छत्री घेऊन शहाणा
जाता येता नावे ठेवली आॅफिसला जाताना
परत आता नातवासोबत मजा येई भिजताना
एक ओंजळ तुझी माझी गट्टी पुन्हा जमताना
आंबट गोड गाभुळलेल्या चिंचा
एक दिवस सकाळी उठून फोन हातात घेते, तर अचानक एका व्हॉट्सऍप ग्रुप चं आमंत्रण येऊन पडलेलं असतं. अजून एक ? आधीच इतके ग्रुप्स आहेत की मॅनेज होत नाहीयेत. आता अजून एक कुठला ? बघायला गेले तर पहिलीच्या शाळेचं नाव दिसतं - आता जरा उत्सुकता ताणली जाते. हे कोण असेल? डोळे चोळत, दोन वर्षांपूर्वीच लागलेला चष्मा घालून क्लिक करते तर काय ! एकदम जादूनगरीचा दरवाजा उघडल्यासारखं वाटतं.
मी डेलावेअर मध्ये शीफ्ट होतीये.. पण मला अजुन चांगले रेटींग असलेली शाळा मिळाली नाही ... कोणी सुचवु शकेल का प्लीज. asap
नमस्कार मंडळी
मैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
तिची वारी
पहाट फटफटायच्या आधीच धुरपानं तानीला ठवलं “ताने, उठ लवकर. वारीत जायचयं.” तानी अजुनच जास्त गोधडीत गुरफटली. कालच्या भुरभुर पावसानं चांगलाच गारवा आला होता. फाटक्या गोधडीतून अंग बाहेर निघत नव्हतं.
नमस्कार माबोकरांनो! किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला.
नमस्कार माबोकर मित्रमैत्रिणींनो,