अ आ इ ई उ ऊ ऊ - आई मी लवकर शाळेत जाऊ?
ए ऐ ओ औ अं अः अः - माझा सुंदर गणवेश पहा
क ख ग घ ग घ ङ - आई मी अभ्यास करणारं
च छ ज झ ज झ ञ - मी खूप शहाणा होणारं
ट ठ ड ढ ड ढ ण - आई घंटा वाजे घणघणं
त थ द ध द ध न - माझी शाळा खूप छानं
प फ ब भ ब भ म - आई मला आहे खूप कामं
य र ल व ल व श - करायचा आहे अभ्यासं
ष स ह ळ क्ष ज्ञ ज्ञ - आई मी मोठ्ठा होणार हं
_______________________
चाल - english A B C D ... प्रमाणे.
गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!
तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो.
बॅन्गलोर (साउथ) मध्ये कोणाला चांगली शाळा माहित आहे का? बोर्ड, फी बद्दल माहिती असेल तर उत्तम्च.
डोमेगावच्या शाळेत शिकवीत होते a b c d
पण पोऱ्ह म्हणत होते व्हाय धिस कोलावारी डी?
मग मास्तर म्हणले e f g
आन पोऱ्ह करायला लागले ए जी, ओ जी!
मग मास्तर म्हणले h i j k
आन पोऱ्ह म्हणले माय नेम इज मिस्टर के. के.!
मग मास्तर वैतागून म्हणले l m n
तर गण्या म्हणतो, दिप्याने चोरला माझा पेन!
मास्तर ला आला राग आन मास्तर ओरडलं o p q r
झंप्या म्हनला, मास्तर उद्या सुट्टी, उद्या हाय रविवार
मास्तर म्हणे झंप्या गप आणि म्हण s t u v
झंप्या म्हणतो, उद्या मज्जा, उद्या पाह्यचा tv
मास्तर भांबावून म्हणे w x y z
मी या शाळेत जाणार नाही
दुर आहे शाळा घरी लवकर येता येत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
भिती मला वाटे शाळा नवी मोठी
आठवते मला शाळा जुनी छोटी
नविन शाळा मला मुळीच आवडत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
जुने मित्र माझे फार होते ग चांगले
बट्टी होई आमची जरी भांडण झाले
ह्या शाळेत मला मुळी कुणी मित्रच नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
मोठे मोठे वर्ग येथे मोठा आहे फळा
नव्या मुलांना जुनी मुले करती कोंडाळा
भंडावून सोडी सारे दोन्ही डोळा पाणी येई
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
लहानच आहे मी काही मोठा नाही झालो
उगीचच मागच्या वर्गात पहिला मी आलो
९ ऑक्टोबर २०११ रोजी या लेखाचा पहिला भाग मायबोली वर प्रकाशित केला होता.....
दुसरा भाग:
स्व. श्री. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांच्या परिवारात ते ही डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या पोटी जन्माला येणे हे माझे खरोखरच भाग्य आहे. जन्मापासून गडचिरोली जिल्ह्यातील लोक बिरादरी प्रकल्पात वाढलोय. तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. दुर्दैवाने बाबा आणि साधनाताई आमटे (आजी-आजोबा) यांचा अतिशय थोडा सहवास मला लाभला. बाबा - आजी दोघही चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचा कर्मभूमीत आनंदवनात राहायचे. ३-४ महिन्यातून एकदा त्यांची लोक बिरादरी प्रकल्पाला भेट असायची. १-२ दिवस राहून ते आनंदवनाला परतायचे.
श्री गणेश
स्कूल चले हम.....!
गणपतीचे दिवस. दुपारी बारा, साडेबाराची वेळ. पुण्यातले रस्ते. रस्त्यात वेडेवाकडे उभारलेले मांडव. त्यातच खास गौरी गणपतीच्या वस्तूंनी सजलेले असंख्य स्टॉल्स. खरेदीसाठी उडालेली झुंबड. त्यामुळे होणारं ट्रॅफिक जॅम, कर्कश्य हार्न्स आणि त्यातुन कासवाच्या वेगानं जाणारी वाहनं. नायर सरांकडे मी क्लास साठी निघाले होते.