बाराखडी

त्याची बाराखडी

Submitted by अनन्त्_यात्री on 26 July, 2017 - 01:21

सकालपासनं माय लय आटवत हुती
उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली
बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं
आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन
सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू?
आजपास्न बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर का,
रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल”
मी सिकाया गेलो. काल्याकूट पाटीवर सफेत सफेत आक्षरा फटाफट लिवाया सिकलो.
मास्तरीन बोल्ली,” मुला, हुशार आहेस रे तू”
लय बेश वाटलं
मास्तरीन झकास, दूद पाव फसकलास
भंगारपाली बेगी-बेगी करूनशान म्हैनाभर साळत गेलो

शब्दखुणा: 

अ आ इ ई उ ऊ ऊ

Submitted by सुसुकु on 7 March, 2012 - 13:31

अ आ इ ई उ ऊ ऊ - आई मी लवकर शाळेत जाऊ?
ए ऐ ओ औ अं अः अः - माझा सुंदर गणवेश पहा

क ख ग घ ग घ ङ - आई मी अभ्यास करणारं
च छ ज झ ज झ ञ - मी खूप शहाणा होणारं

ट ठ ड ढ ड ढ ण - आई घंटा वाजे घणघणं
त थ द ध द ध न - माझी शाळा खूप छानं

प फ ब भ ब भ म - आई मला आहे खूप कामं
य र ल व ल व श - करायचा आहे अभ्यासं

ष स ह ळ क्ष ज्ञ ज्ञ - आई मी मोठ्ठा होणार हं

_______________________
चाल - english A B C D ... प्रमाणे.

गुलमोहर: 

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात

Submitted by सावली on 7 October, 2010 - 19:28

नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे या धाग्यावर काही जणांनी मुलांना मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन कसे आणि कधी शिकवायचे याबद्दल काही प्रश्न विचारले होते. मला सुद्धा हा प्रश्न बरेच दिवस पडला आहे. या विषयासाठी वेगळा धागा केला तर चर्चा एकत्रीत राहिल अस वाटलं म्हणुन हा धागा चालु करतेय.

जी मुलं मराठी शाळेत जात नाहीत त्यांना
- मराठी मुळाक्षरे, बाराखडी आणी शब्द वाचन कसे शिकवावे?
- कुठल्या वयापासुन याची सुरुवात करता येईल?
- मराठी वाचनाची आवड कशी लावता येईल?
- आणि त्या पुढची पायरी म्हणजे मराठी लिहायला कसं शिकवता येईल?
याबद्दलची माहिती इथे द्याल का?

विषय: 
Subscribe to RSS - बाराखडी