सकालपासनं माय लय आटवत हुती
उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली
बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं
आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन
सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू?
आजपास्न बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर का,
रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल”
मी सिकाया गेलो. काल्याकूट पाटीवर सफेत सफेत आक्षरा फटाफट लिवाया सिकलो.
मास्तरीन बोल्ली,” मुला, हुशार आहेस रे तू”
लय बेश वाटलं
मास्तरीन झकास, दूद पाव फसकलास
भंगारपाली बेगी-बेगी करूनशान म्हैनाभर साळत गेलो
येक डाव मास्तरीन बोल्ली, “ आज परीक्षा घेते, आहेस तयार?”
आपुन बोल्लो हाय तय्यार
ती म्हटली, “ ग कशातला?” आपुन बोल्लो “गटारीचा”
ती म्हटली, “ म कशातला?” आपुन बोल्लो “मटक्याचा”
ती म्हटली, “ भ कशातला?” आपुन बोल्लो “भ॓गारचा”
ती म्हटली, “ न कशातला?” आपुन बोल्लो “नालीचा”
ती म्हटली, “ क कशातला?” आपुन बोल्लो “कचऱ्याचा”
ती म्हटली, “ घ कशातला?” आपुन बोल्लो “घंटा-गाड़ीचा ”
दुदासारक सफेत हासून बोल्ली,” अरे बाळा, ग- गणपतीतला, म-मक्यातला, भ-भटजीतला, न- नळातला, क-कमळातला, घ-घरातला”
आपुन मिष्टेक कबूल केली.
मॉप आक्षारं सिकलो फुडे ,
काना : काटीवानी, येलांटी : भंगार डिपोच्या गोल छपरावानी, आक्षरावरला टिम्ब : कपालीच्या टिकलीवानी
सवालाची खून मंजी परश्न चिन्न : भंगार सावडायच्या आकड्यावानी.... आसं बरंच कायकाय .....
बापाला आक्षर सिकतो बोल्लो. त्यो मावा थुकून म्हनला " आरं पोरा, आक्षरानं नादावू नगंस.
म्या बी मॉप आक्षारं सिकलो तुज्यावानी. पन आपल्या-तुपल्या भंगार जिंदगीला आक्षरा काय कामाची?
आपल्या जिनगीला रग्गड पुरतोय
तुज्या साळंच्या पाटीचा कालाकूट रंग
अक्षराच्या लायनी मदली बेवारस खाली जागा
भेटंल त्या छपराची येलांटी
अन रोजच्या रोटीचा सवाल -....... कचरा सावडायच्या आकड्यावानी आतडं पोखरनारा"
.........तवाधरनं सांगतो...खडू पाटीकडं नजर बी मारावीशी वाटत नाय...........
त्याची बाराखडी
Submitted by अनन्त्_यात्री on 26 July, 2017 - 01:21
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुन्न.....
सुन्न.....
कविता तर जमलीये .... पण सुंदर म्हणवत नाहीये.....
शब्दहीन मस्तच जमलीये कविता!
शब्दहीन मस्तच जमलीये!
शशांक पुरंदरेजी, ह्या सुन्न
शशांक पुरंदरेजी, ह्या सुन्न करणाऱ्या घटनेचा मी साक्षीदार होतो.
प्रतिसादाबद्दल आभार !
अक्षय दुधाळ, प्रतिसादाबद्दल
अक्षय दुधाळ, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
खुप छान
खुप छान
mr pandit , धन्यवाद
mr pandit , धन्यवाद
खरंतर प्रतिसाद कसा लिहावा हेच
खरंतर प्रतिसाद कसा लिहावा हेच कळत नाहीये.....
...तवाधरनं सांगतो...खडू पाटीकडं नजर बी मारावीशी वाटत नाय.... >>>>+१११ हि भावना एकदम स्वाभाविक आहे तसल्या परिस्थितीत.. एकदम नि:शब्द करणारी..
राहुल, आपली प्रतिक्रिया बरच
राहुल, आपली प्रतिक्रिया बरच काही बोलून गेली !. मनापासून धन्यवाद !
छान !
छान !
मेघा. , आभार !
मेघा. , आभार !
आवडली ही बाराखडी. अजुन लिहा.
आवडली ही बाराखडी.
अजुन लिहा.
अंकु, प्रतिसादाबद्दल आभार !
अंकु, प्रतिसादाबद्दल आभार !
सुचेल तसं लिहीत राहीन .
सुंदर! आवडली बाराखडी!
सुंदर! आवडली बाराखडी!
फूल, प्रतिसादाबद्दल आभार!
फूल, प्रतिसादाबद्दल आभार!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
कथा अगोदर कुठे प्रसिद्ध केली होती का? वाचल्याची आठवतेय.
मला वाटतं, ऐसीवर सचिनजी!!!
मला वाटतं, ऐसीवर सचिनजी!!!
बरोबर! 'ग म भ न'
बरोबर! 'ग म भ न' शिर्षकांतर्गत.
सचिन काळे, प्रतिसादाबद्दल
सचिन काळे, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ही कथा मी याअगोदर ऐसी आणि मिपा वर प्रसिद्ध केली होती.
पण बाराखडी म्हणजे 'क का कि की
वा
शन्तनू, आभार
शन्तनू, आभार
(No subject)
अॅमी, प्रतिसादाबद्दल आभार
अॅमी, प्रतिसादाबद्दल आभार
मस्तं आहे. छान लिहीताय तुम्ही
मस्तं आहे. छान लिहीताय तुम्ही. परीक्षा आवडली.
सोनू, प्रतिसादाबद्दल आभार
सोनू, प्रतिसादाबद्दल आभार