मी या शाळेत जाणार नाही
दुर आहे शाळा घरी लवकर येता येत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
भिती मला वाटे शाळा नवी मोठी
आठवते मला शाळा जुनी छोटी
नविन शाळा मला मुळीच आवडत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
जुने मित्र माझे फार होते ग चांगले
बट्टी होई आमची जरी भांडण झाले
ह्या शाळेत मला मुळी कुणी मित्रच नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
मोठे मोठे वर्ग येथे मोठा आहे फळा
नव्या मुलांना जुनी मुले करती कोंडाळा
भंडावून सोडी सारे दोन्ही डोळा पाणी येई
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
लहानच आहे मी काही मोठा नाही झालो
उगीचच मागच्या वर्गात पहिला मी आलो
या शाळेत अॅडमीशन का घेतले समजत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
आई तू एकदातरी सांग ना ग बाबांना
जुनी शाळाच चांगली बोल ग त्यांना
अभ्यास तेथेही करीन निट मी राहीन
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही
- पाषाणभेद
साध्याच शब्दांत लहान मुलाच्या
साध्याच शब्दांत लहान मुलाच्या बावरलेल्या मनातील विविध भावनांचा जो कल्लोळ प्रकट झाला आहे तो लाजवाब आहे. जबरदस्त शब्दसामर्थ्य.
मस्तच... लहानपण आठवलं अवघड
मस्तच... लहानपण आठवलं
)
अवघड आहे लहान मुलाच्या भूमिकेतून लिहीणं ( मुलाच्या बाबतीत झालंय का असं
पाभेजी,मस्तच. ठोकू का
पाभेजी,मस्तच.
ठोकू का खिळा.....मध्ये शिक्षकांची काळजी होती,आता मुलांची काळजी,छान.
पुन्हा वाचली. यावेळी असे
पुन्हा वाचली. यावेळी असे वाटले की 'केविलवांणा' हा शब्द मुलाच्या तोंडी फिट होत नाही.
विभाग्रजजी: सकाळी सकाळी हातात
विभाग्रजजी:
सकाळी सकाळी हातात हातोडा?
विभाग्रजजी: सकाळी सकाळी हातात
विभाग्रजजी:
सकाळी सकाळी हातात हातोडा?>>>>>
दगड्फोड्यांच्या कविता वाचताना घ्यावा लागतो.
छान आहे कविता
छान आहे कविता
सूंदर
सूंदर
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!:)
छान वाटली बाल कविता.
छान वाटली बाल कविता.
छान पकडल्यात लहान मुलांच्या
छान पकडल्यात लहान मुलांच्या भावना. मला अजुनच अपिल झाली कारण Victorious Kids कालच खराडीला शिफ्ट झाली आणि नुसती बिल्डिंग बदलुनही मुलं इतकी अपसेट आहेत. माझ्या मैत्रिणीची मुलगी जुन्या स्कुलमधे जायचं म्हणुन रडते आहे. तिला आम्ही समजावलं कि टिचर आणि फ्रेंडस सेम आहेत, पण तिला जुन्याच शाळेत जायचं आहे.
खुपच निरागस कविता.
खुपच निरागस कविता.
आपण पुढचा विचार करून मुलांना
आपण पुढचा विचार करून मुलांना मोठ्या शाळेत घालतो पण मुलांच्या मनःस्थितीचा विचार करीत नाही.
लहान मुलांची व्यथा छान मांडली आहे कवितेत,.