शाळा सुटली, पेपर ....
आज काल वर्तमानपत्र उघडलं ना कि पेपर फुटीच्या बातम्या येत असतात ना.... कि बस्स.कालच अशी एक बातमी वाचली आणि मन काहीस माझ्या माहेरी नासिक ला CIDCO मध्ये गेलं.कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय आठवलं(माझ शिक्षण तिथे झालं आहे ना...). १० वी ला असताना जेव्हा आमचा अभ्यासक्रम पुर्ण शिकवून झाला(अस मला आमच्या शिक्षकांनी सांगितल्यावरच कळाल होत.) त्यानंतर आमचे सरावाचे पेपर असायचे आणि ते पण रोज, अभ्यास करायला वेळच मिळायचा नाही(आयुष्यात तो मला कधीच मिळाला नाही... वेळ हो) आणि लगेच दुसर्या दिवशी पेपर असायचा.
मन कंटाळून गेलं होत.अभ्यास करायला उत्साह राहिला नव्हता.