७५ वर्षाचा माणूस म्हंटल्यावर साधारणतः आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते हो ? ...
ज्याचे दोन्ही गुडघे झिजले आहेत आणि कंबर, पाठदुखी, मानदुखीमुळे जो दिवसाचा ८०% वेळ घरात आराम खुर्ची किंवा बिछान्यावर घालवत आहे.
कधी बाहेर काम पडलंच तर लगेच ड्रायव्हरला घेऊन चार-चाकी गाडी मध्ये फिरणारा,
स्वतःची सर्व वैयक्तिक कामे दुसऱ्यांच्या मदतीने करून घेणारा,
डायबिटिज, हायपरटेन्शन, आर्थराइटिस इ. रोगाने ग्रस्त आणि म्हणून मरणाची सतत चिंता करणारा,
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे मी सामुदायिक आरोग्य विभागात प्रकल्प समन्वयक म्हणून दोन वर्ष काम केले. या दोन वर्षाच्या काळात मी बऱ्याच नवीन गोष्टी शिकलो. व्यावसायिक विकासासोबतच माझातील काही सुप्त कलागुणांना खुलण्यास व बहरण्यास इथे वाव मिळाला किंबहुना ते मला इथे ज्ञात झाले. आदरणीय प्रकाश काका आणि मंदा काकू यांच्या प्रेरणेने माझा काम करण्याचा उत्साह खूप वाढायचा. कामाच्या व्यतिरिक्त व्यक्तीचित्रण, लेख, माडिया आदिवासी संस्कृतीचे छायाचित्रण, माडिया चालीरीतींचे व्हिडिओज तयार करणे, पक्षी निरीक्षण आणि त्यांचे व्हिडिओ डॉक्युमेंटेशन इ. अनेक छंद मी जोपासले.
बाबांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने भामरागड़ येथील त्रिवेणी संगमाच्या ३ किलोमीटर अलीकडे, हेमलकसा गावी काही जमीन लोक बिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिली. प्रकल्प निर्मितीच्या सुरुवातीला, दुर्दम्य जिद्दीच्या बाबांसोबत काही १५-२० लोकं १९७३ साली घनदाट अशा दंडकारण्यामध्ये आली. सुरुवातीला बाबांसह या सर्वांनी काही राहण्यायोग्य झोपड्या आणि शेतजमिनी तयार केल्या आणि लोक बिरादरीच्या कार्याचा आरंभ झाला. या कार्यकर्त्यांमधीलच एक नाव जे बिरादरीमधे आजही आपसुक तोंडावर येते ते म्हणजे आमचे "गोविंद काका". लोक बिरादरी प्रकल्पाचे सर्वात पहिले कार्यकर्ते म्हणून ते आजही बिरादरीत ओळखले जातात.
प्रिय मायबोलीकर,
मी आणि सोनू आम्ही ३ वर्ष लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथील दवाखान्यात आणि आस-पास च्या २६ आदिवासी खेड्यांमध्ये आरोग्य विषयक काम केलं. नुकताच आमचा प्रोजेक्ट संपला. हॉस्पिटल स्टाफशी आमचं खूप घट्ट नातं झालय. त्यांचाच आठवणीत म्हणून मी हे त्यांना लिहिलं होतं. तेच मी मायबोली वर शेअर करतोय. धन्यवाद ..!!
प्रिय मित्र मैत्रिणींनो,
भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो……
कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो……
जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती.
चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..
ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’.
मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो. लोक बिरादरी मधील अवॉर्ड रूमच्या खालच्या वॉर्ड मध्ये, रेडीओवरच्या बातम्या-गाणी ऐकत रुग्णांच्या जखमा पुसण्यासाठी “गौज पिस” तयार करतांना ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच दिसणार.
" बिरादरीची माणसं - पल्लो मामा "
"पल्लो मामा"....हो, बिरादरीत सारे याच नावाने हाक मारतात त्यांना. "दोगे पिरंगी पल्लो" हे पल्लो मामांचं पूर्ण नाव. गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल असलेल्या एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावामध्ये एका माडिया कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारे हे माडिया आदिवासी. ही गोष्ट साधारणतः ६०-६५ वर्षापूर्वीची असेल. आजच हा भाग एवढा घनदाट आहे तर ६० वर्षांपूर्वी कसा असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही. जन्मतारीख त्यांना माहित नाही. कारण शिक्षण-शाळा हा प्रकार या भागात अस्तित्वात सुद्धा नव्हता.
९ ऑक्टोबर २०११ रोजी या लेखाचा पहिला भाग मायबोली वर प्रकाशित केला होता.....
दुसरा भाग: