८४ वा पक्षी ..!!
Submitted by लोकेश तमगीरे on 4 July, 2019 - 06:29
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे मी सामुदायिक आरोग्य विभागात प्रकल्प समन्वयक म्हणून दोन वर्ष काम केले. या दोन वर्षाच्या काळात मी बऱ्याच नवीन गोष्टी शिकलो. व्यावसायिक विकासासोबतच माझातील काही सुप्त कलागुणांना खुलण्यास व बहरण्यास इथे वाव मिळाला किंबहुना ते मला इथे ज्ञात झाले. आदरणीय प्रकाश काका आणि मंदा काकू यांच्या प्रेरणेने माझा काम करण्याचा उत्साह खूप वाढायचा. कामाच्या व्यतिरिक्त व्यक्तीचित्रण, लेख, माडिया आदिवासी संस्कृतीचे छायाचित्रण, माडिया चालीरीतींचे व्हिडिओज तयार करणे, पक्षी निरीक्षण आणि त्यांचे व्हिडिओ डॉक्युमेंटेशन इ. अनेक छंद मी जोपासले.