''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो. ''आम्हाला फोटू दाखवा ना!''च्या त्यांच्या गजरात शाळेपर्यंत येताना आजूबाजूच्या बकाल वातावरणाने मनावर आलेली किंचित मरगळ आपोआप झटकली जाऊ लागली. त्यांचे निरागस हसू आणि दंगा बघून आपल्या येण्याचे सार्थक झाले आणि ह्या मुलांसाठी आणखी काहीतरी केले पाहिजे हीच भावना मनावर तरंगत राहिली.
मायबोलीकर साजिरा, केदार, मो आणि मी गेल्या गुरुवारी खास वेळ काढून पुण्याच्या बुधवार पेठेत भर वेश्यावस्तीत चालविल्या जाणार्या व सावली सेवा ट्रस्ट तर्फे मदत केल्या जाणार्या नूतन समर्थ विद्यालयातील मुलांना भेटायला गेलो होतो. आपल्या संयुक्ता सुपंथ उपक्रमातून गेली दोन - तीन वर्षे आपण ह्या ना त्या प्रकारे या मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहोत. या वस्तीत राहणार्या व व्यवसाय करणार्या वेश्यांच्या मुलांना या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. बरीचशी मुले याच पार्श्वभूमीची असतात आणि खूप विचित्र आणि खडतर असते त्यांचे हे जगणे! आपले वडील कोण हे या मुलांना माहित नसते. आई वेश्या व्यवसायात असल्यावर त्या व्यवसायात असणारे शोषण अनेक प्रकारे ह्या मुलांच्या वाट्यालाही येते. रात्री ही मुले रस्त्यावर असतात. पहाटे तीन-चार च्या पुढे कधीतरी त्यांना घरात घेतले जाते. उपेक्षा, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष व असुरक्षिततेच्या दुष्टचक्रातून - तसेच वेश्याव्यवसायाच्या किंवा गँगवॉर-गुन्हेगारी जगताच्या फेर्यातून या मुलांना बाहेर काढायचा एकच मार्ग म्हणजे त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर, समाजात मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे.
नूतन समर्थ विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच दुपारची पोळी-भाजी आणि नाश्त्याला सरकार तर्फे दिली जाणारी खिचडी किंवा उपमा मिळतो. या मुलांच्या रात्रीच्या जेवणाची बर्याचदा वानवाच असते. उपासमार ही ठरलेली! सावली सेवा संस्थेकडून मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, स्वेटर, रेनकोट, दप्तर, इतर काही गरजेचे कपडे व वस्तू घेऊन दिल्या जातात. तसेच शाळेच्या काही शिक्षकांचे पगारही केले जातात. वर्षातून एकदा या मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित करणे, त्यांना पिकनिकला घेऊन जाणे, त्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, पपेट शो इत्यादी कार्यक्रम हेही केले जातात. ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटावी व स्वतःच्या हिमतीवर पुढे येऊन, चांगले शिक्षण घेऊन त्यांना अर्थार्जन करता यावे व समाजात मानाने जगता यावे यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न घेते.
आपल्यातील काही मायबोलीकर या मुलांना आर्थिक किंवा वस्तूरुपाने मदत दर वर्षी आवर्जून करतातच! परंतु त्या शिवाय आणखी कशा प्रकारे मदत करता येईल असा आमचा विचार चालला असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व सावली संस्थेच्या भाटवडेकर बाईंनी ''मायबोलीकरांपैकी कोणी या मुलांना दर शनिवारी येऊन स्पोकन इंग्लिश (बोली इंग्लिश) शिकवू शकेल का?'' असे आम्हाला विचारले.
तर इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी शाळेत जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे आहे. वेळ साधारण सकाळी अकरा ते बारा अशी असेल. कधी मुलांच्या व शाळेच्या सोयीनुसार पंधरा-वीस मिनिटे अलीकडे किंवा पलीकडे. आपल्यातले अनेक मायबोलीकर शनिवारी सुट्टीवर असतात. आपल्या वेळातला मौल्यवान वेळ या मुलांसाठी काढून त्यांना स्पोकन इंग्लिश शिकवू शकतात व त्यांचा इंग्रजीतून बोलण्याचा सराव घेऊ शकतात.
शाळेने अशी विनंती करण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एका संस्थेमार्फत या मुलांना सहा महिने स्पोकन इंग्लिश शिकविले जात होते. येणार्या शिक्षिका मुलांशी इंग्रजीतूनच संवाद साधत व फ्लॅश कार्ड्स, गेम्स इत्यादी माध्यमांतून मुलांना सहज, हसत-खेळत, त्यांच्या कलाकलाने इंग्रजी बोलायला शिकवित होत्या. मुलांचे इंग्रजी त्यानंतर बरेच सुधारले व त्यांच्या आत्मविश्वासातही चांगला फरक दिसून आला. त्यामुळे शाळेला या वर्षीही मुलांना स्पोकन इंग्लिश स्वयंसेवा धर्तीवर शिकविणारे शिक्षक हवे आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे. संपूर्ण शालेय वर्षात (जुलै / ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४) या मुलांना शिकवायचे आहे.
आपल्यातील कोणी मायबोलीकर जर या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवू इच्छित असतील तर कृपया ह्या बाफावर तसे कळवावे व मायबोली संपर्कातून आपला संपर्क क्रमांक, खरे नाव, आपण देऊ शकणारा वेळ इत्यादी तपशील कळवावेत. लवकरच आपल्याशी संपर्क साधला जाईल. स्पोकन इंग्लिश खेरीज आपण शालेय अभ्यासक्रमातील इतर कोणत्या विषयांबद्दल या मुलांना अनुभवी मार्गदर्शन करू इच्छित असाल तर तसेही कृपया कळवावे. आपल्यातील प्रत्येकाचा सहभाग व योगदान हे अनमोल असणार आहे!
शाळेचा पत्ता : नूतन समर्थ विद्यालय, सोन्या मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २.
अतिशय स्तुत्य उपक्रम.
अतिशय स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा
स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा
स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा
शुभेच्छा! आवडलंच असतं काम
शुभेच्छा! आवडलंच असतं काम करायला, पण दर शनि/रवी मुं-पु; जरा कठीण!
अभिमान वाटतो तुम्हा
अभिमान वाटतो तुम्हा सगळ्यांचा. अनेक शुभेच्छा.
स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा
स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा
अकु तुम्हा सर्वांचं अपार
अकु तुम्हा सर्वांचं अपार कौतुक वाटत आहे.. मनापासून शुभेच्छा!!!
असंच काहीसं ( चायनीज ऑर्फनेज मधे स्पोकन इंग्लिश शिकवण्याचं)काम मी इथेच गेली बरीच वर्षं करत आहे.. भारतात आल्यावर तुला काँटॅक्ट करीन.
धन्यवाद अरुंधती इथं
धन्यवाद अरुंधती इथं लिहिल्याबद्दल.
शिकवण्यासाठी- माझा हात वर. मला शिकवायचा अनुभव नाही अजून, पण सातवीपर्यंतच्या मुलांना (घरी आधी अभ्यास करून. ) कुठचेही विषय शिकवू शकेन असे वाटते.
'मो'ने काही फोटो काढलेत. जमले तर टाक इथं.
मला हे काम करायला नक्की
मला हे काम करायला नक्की आवडेल. पण मला शिकवण्याचा आजिबात अनुभव नाहीये, त्यामुळे जमेल की नाही, अशी काळजी वाटते आहे. शनिवारी किती वेळ द्यावा लागेल? समजा काही कारणाने एखाद्या शनिवारी नाही जमलं, तर दुसरी व्यवस्था असेल का?
वरदा, विनायकपरांजपे, योगेश
वरदा, विनायकपरांजपे, योगेश कुळकर्णी, जागू, किरण .... थँक्स!
वर्षू नील, हो, अवश्य!
साजिरा, थँक्स!! तू त्या दिवशी लगेच तिथे शाळेत जाऊन शिकवायची जी तयारी दाखवलीस त्याचेच कौतुक वाटले. तुझे नाव तर अगोदरपासून या उपक्रमात घेतलेच आहे.
अनया, शनिवारी तासाभराचा प्रश्न आहे. सकाळी ११ ते १२. मुलांची तयारी असेल व शाळेला काही हरकत नसेल तर थोडा वेळ जास्तही वर्ग घेता येऊ शकेल. इथे आपण पर्यायी व्यवस्था असावी म्हणूनच किमान २-३ स्वयंसेवक यासाठी घेत आहोत. कोणकोणते शनिवार जमतील ते परस्पर-सोयीने ठरवून घेता येऊ शकेल.
खरच खूप चांगलं काम...
खरच खूप चांगलं काम... शुभेच्छा... सध्यातरी इतकच करु शकतो.
शनिवारी सुट्टी नसल्याने माझा
शनिवारी सुट्टी नसल्याने माझा हात खालीच
पण माझ्या मित्रमंडळींमधे हे आवाहन / निवेदन पाठवत आहे. बघू त्यापैकी कोणास जमले तर....
अतिशय स्तुत्य उपक्रम. कधीतरीच
अतिशय स्तुत्य उपक्रम.
कधीतरीच यायचे असेल तर मी गणित, विज्ञान आणि इंग्रजी शिकवू शकेन (अनुभवः 'दोन घरचेच विद्यार्थी' इतकाच मर्यादित आहे). दर विकेंडला जमणे कठीण आहे मुंबई-पुणे करणे.
अतिशय स्तुत्य उपक्रम.
अतिशय स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा आहेतच
अतिशय चांगला उपक्रम. सलाम
अतिशय चांगला उपक्रम. सलाम तुम्हाला सर्वाना आणि शुभेच्छा.
अतीशय स्त्युत्य उपक्रम!
अतीशय स्त्युत्य उपक्रम! ओळखीच्या, नात्यातल्या मंडळींना ही लिंक पाठवते.
मला आवडेल ह्यात भाग घ्यायला.
मला आवडेल ह्यात भाग घ्यायला. अकु, तुला फोन करते मी.
छानच उपक्रम! मला शिकवणे मला
छानच उपक्रम! मला शिकवणे मला अजिबातच जमत नाही (आणि अर्थातच भारतातच नाहीये). नाहीतर नक्की आले असते!
मस्त उपक्रम. तुम्हां
मस्त उपक्रम. तुम्हां सगळ्यांना शुभेच्छा.
स्तुत्य
स्तुत्य उपक्रम.
पुण्यात्/भारतात नसल्याने उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही पण काही इतर कामे असतील तर (उदा. फ्लॅश कार्ड तयार करणे, स्टडी मटेरीअल इ.) जरुर कळवा.
महागुरू +१००...
महागुरू +१००...
छान उपक्रम! >>पुण्यात्/भारतात
छान उपक्रम!
>>पुण्यात्/भारतात नसल्याने उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही पण काही इतर कामे असतील तर (उदा. फ्लॅश कार्ड तयार करणे, स्टडी मटेरीअल इ.) जरुर कळवा.>> +१
अतिशय स्तुत्य उपक्रम. अशा
अतिशय स्तुत्य उपक्रम.
अशा उपक्रमासाठी दर महिन्यातल्या २ शनिवारी मुंबई-पुणे प्रवास करायची तयारी आहे आणि शिकवण्याचा अनुभवही आहे. वेळही सोयीस्कर आहे.
अतिशय स्तुत्य उपक्रम.
अतिशय स्तुत्य उपक्रम.
माझाही हात वर. मला
माझाही हात वर. मला शिकवण्याचा अनुभव आहे. पण लहान मुलांना तेही स्पोकन ईंग्लिश कधी शिकवलेले नाही. पण अभ्यासांती जमेल असे वाटते. मी पुण्यातच आहे आणि शनिवारी मला सुट्टीही असते. एक तास कसाही काढू शकेन. मला मनापासून आवडेल हे काम करायला.
वॉव. बरेच जण तयार होत आहेत.
वॉव. बरेच जण तयार होत आहेत. मायबोली रॉक्स.
शिकविने हा शब्दाची व्याप्ती थोडी मोठी होतेय पण आपल्यापुरती हवी असेल तर बोलणे. त्यांना आपल्याला इंग्रजी बोलायला लावायचे आहे. अगदी काहीही बोलले तरी चालेल. साधारण सुरूवात. अगदी हाऊ आर यू पासून आणि आपले उदिष्ट्य सलग ८-१० वाक्य इंग्रजीतूनच विचार करून त्यांना बोलता यायला हवीत.
हवे असेल तर आपण एकदा पुण्यात भेटून थोडा आराखडा ठरवून घेऊया. एकदा आपण आराखडा ठरविला की तो प्राचार्यांना सादर करता येईल. व मग प्रत्येकाच्या वेळा वगैरे आखता येतील.
काय म्हणता?
i agree with Kedar. सर्वांचा
i agree with Kedar. सर्वांचा गाईडन्स लागेलच.
छान आहे हा उपक्रम. शुभेच्छा!
छान आहे हा उपक्रम. शुभेच्छा!
अतिशय स्तुत्य उपक्रम.
अतिशय स्तुत्य उपक्रम.
खूपच छान उपक्रम आहे. एवढ्या
खूपच छान उपक्रम आहे. एवढ्या लवकर इतके जण तयार झाले ! खूप कौतुक वाटले जे तयार झालेत त्यांचे. :).
हार्दिक शुभेच्छा !! खूप चांगले काम करताय.
भाटवडेकर मॅडम, शाळेचे
भाटवडेकर मॅडम, शाळेचे ट्रस्टी, त्यांच्या पत्नी आणि मुख्याध्यापिका ह्यांना भेटल्यावर असे जाणवले की ते आपल्यापेक्षा कुठल्या तरी दुसर्याच विश्वात वापरतात. स्पेशली भाटवडेकर मॅडम.
'क्वांटिटी पेक्षा क्वालिटी' चे महत्व त्यांना बहुदा खूप आधीच पटले आहे. त्या खूप कमी जनांना (सध्या तरी १००) जनांना त्यांच्या संस्थेतर्फे मदत करतात पण त्यातील बर्याच मुलांपकी कोणी आता इंजिनिअर, तर कोणी स्पर्धापरिक्षातुन पुढे जातोय. पण ज्यांना ही मदत होतेय, त्यांच्यात आमुलाग्र बदल होतोय. एका मुलीला आम्ही भेटलो. ती "वेश्येची मुलगी" आहे असे एक क्षण ही कोणालाही जाणवले नाही (जो पर्यंत खुद्द मॅडमनी तिची हिस्ट्री, तिच्यासमोरच आम्हाला सांगीतली नाही तो पर्यंत.) जिन्स, टि शर्ट, मोबाईल, सॅन्डल्स असा तिचा वेष होता आणि ती सर्व सामान्य FY च्या मुली सारखीच दिसत होती. पाँईट इज केवळ ती वेश्येची मुलगी आहे म्हणून तीची वेगळी ओळख नको. आता तिच मुलगी त्यांना इतर व्यवस्थापणात पण मदत करते.
शाळेला भेट दिल्यावर आम्हाला धक्काच बसला होता. की ह्या जागेत शाळा चालतेच कशी? मी तर, तुम्ही बिल्डिंगची वार्षिक तपासनी वगैरे करता का? असाही प्रश्न विचारला होता. ऑल इन ऑल शाळा आम्हाला आवडली ती तेथे होत असणार्या उपक्रमामुळे आणि शाळेचे ट्रस्टी, त्यांच्या पत्नीमुळे. १०० रू चे डोनेशन मिळवायला हा माणूस जी मरमर करतो ती बघून आणि ह्या अस्तित्वाला अनेकदा सामोरे जाऊनही परत तितक्याच रिश्टर स्केलने नव्याने धक्का बसला.
अशा उपक्रमात भाग घेताना एक लक्षात नेहमी ठेवावे लागेल की त्यांना मदत हवीये उपकार नाही. आपण जे करतो ते आपल्या समाधानासाठी(ही) असते.
Pages