''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो. ''आम्हाला फोटू दाखवा ना!''च्या त्यांच्या गजरात शाळेपर्यंत येताना आजूबाजूच्या बकाल वातावरणाने मनावर आलेली किंचित मरगळ आपोआप झटकली जाऊ लागली. त्यांचे निरागस हसू आणि दंगा बघून आपल्या येण्याचे सार्थक झाले आणि ह्या मुलांसाठी आणखी काहीतरी केले पाहिजे हीच भावना मनावर तरंगत राहिली.
मायबोलीकर साजिरा, केदार, मो आणि मी गेल्या गुरुवारी खास वेळ काढून पुण्याच्या बुधवार पेठेत भर वेश्यावस्तीत चालविल्या जाणार्या व सावली सेवा ट्रस्ट तर्फे मदत केल्या जाणार्या नूतन समर्थ विद्यालयातील मुलांना भेटायला गेलो होतो. आपल्या संयुक्ता सुपंथ उपक्रमातून गेली दोन - तीन वर्षे आपण ह्या ना त्या प्रकारे या मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहोत. या वस्तीत राहणार्या व व्यवसाय करणार्या वेश्यांच्या मुलांना या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. बरीचशी मुले याच पार्श्वभूमीची असतात आणि खूप विचित्र आणि खडतर असते त्यांचे हे जगणे! आपले वडील कोण हे या मुलांना माहित नसते. आई वेश्या व्यवसायात असल्यावर त्या व्यवसायात असणारे शोषण अनेक प्रकारे ह्या मुलांच्या वाट्यालाही येते. रात्री ही मुले रस्त्यावर असतात. पहाटे तीन-चार च्या पुढे कधीतरी त्यांना घरात घेतले जाते. उपेक्षा, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष व असुरक्षिततेच्या दुष्टचक्रातून - तसेच वेश्याव्यवसायाच्या किंवा गँगवॉर-गुन्हेगारी जगताच्या फेर्यातून या मुलांना बाहेर काढायचा एकच मार्ग म्हणजे त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर, समाजात मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे.
नूतन समर्थ विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच दुपारची पोळी-भाजी आणि नाश्त्याला सरकार तर्फे दिली जाणारी खिचडी किंवा उपमा मिळतो. या मुलांच्या रात्रीच्या जेवणाची बर्याचदा वानवाच असते. उपासमार ही ठरलेली! सावली सेवा संस्थेकडून मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, स्वेटर, रेनकोट, दप्तर, इतर काही गरजेचे कपडे व वस्तू घेऊन दिल्या जातात. तसेच शाळेच्या काही शिक्षकांचे पगारही केले जातात. वर्षातून एकदा या मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित करणे, त्यांना पिकनिकला घेऊन जाणे, त्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, पपेट शो इत्यादी कार्यक्रम हेही केले जातात. ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटावी व स्वतःच्या हिमतीवर पुढे येऊन, चांगले शिक्षण घेऊन त्यांना अर्थार्जन करता यावे व समाजात मानाने जगता यावे यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न घेते.
आपल्यातील काही मायबोलीकर या मुलांना आर्थिक किंवा वस्तूरुपाने मदत दर वर्षी आवर्जून करतातच! परंतु त्या शिवाय आणखी कशा प्रकारे मदत करता येईल असा आमचा विचार चालला असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व सावली संस्थेच्या भाटवडेकर बाईंनी ''मायबोलीकरांपैकी कोणी या मुलांना दर शनिवारी येऊन स्पोकन इंग्लिश (बोली इंग्लिश) शिकवू शकेल का?'' असे आम्हाला विचारले.
तर इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी शाळेत जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे आहे. वेळ साधारण सकाळी अकरा ते बारा अशी असेल. कधी मुलांच्या व शाळेच्या सोयीनुसार पंधरा-वीस मिनिटे अलीकडे किंवा पलीकडे. आपल्यातले अनेक मायबोलीकर शनिवारी सुट्टीवर असतात. आपल्या वेळातला मौल्यवान वेळ या मुलांसाठी काढून त्यांना स्पोकन इंग्लिश शिकवू शकतात व त्यांचा इंग्रजीतून बोलण्याचा सराव घेऊ शकतात.
शाळेने अशी विनंती करण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एका संस्थेमार्फत या मुलांना सहा महिने स्पोकन इंग्लिश शिकविले जात होते. येणार्या शिक्षिका मुलांशी इंग्रजीतूनच संवाद साधत व फ्लॅश कार्ड्स, गेम्स इत्यादी माध्यमांतून मुलांना सहज, हसत-खेळत, त्यांच्या कलाकलाने इंग्रजी बोलायला शिकवित होत्या. मुलांचे इंग्रजी त्यानंतर बरेच सुधारले व त्यांच्या आत्मविश्वासातही चांगला फरक दिसून आला. त्यामुळे शाळेला या वर्षीही मुलांना स्पोकन इंग्लिश स्वयंसेवा धर्तीवर शिकविणारे शिक्षक हवे आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे. संपूर्ण शालेय वर्षात (जुलै / ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४) या मुलांना शिकवायचे आहे.
आपल्यातील कोणी मायबोलीकर जर या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवू इच्छित असतील तर कृपया ह्या बाफावर तसे कळवावे व मायबोली संपर्कातून आपला संपर्क क्रमांक, खरे नाव, आपण देऊ शकणारा वेळ इत्यादी तपशील कळवावेत. लवकरच आपल्याशी संपर्क साधला जाईल. स्पोकन इंग्लिश खेरीज आपण शालेय अभ्यासक्रमातील इतर कोणत्या विषयांबद्दल या मुलांना अनुभवी मार्गदर्शन करू इच्छित असाल तर तसेही कृपया कळवावे. आपल्यातील प्रत्येकाचा सहभाग व योगदान हे अनमोल असणार आहे!
शाळेचा पत्ता : नूतन समर्थ विद्यालय, सोन्या मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २.
हो सांगेन तिला फोन करायला.
हो सांगेन तिला फोन करायला.
उत्तम उपक्रम. केदार, पोस्ट
उत्तम उपक्रम.
केदार, पोस्ट आवडली.
पुण्यात्/भारतात नसल्याने उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही पण काही इतर कामे असतील तर (उदा. फ्लॅश कार्ड तयार करणे, स्टडी मटेरीअल इ.) जरुर कळवा.>> +१
उपक्रमासाठी शुभेच्छा! केदार,
उपक्रमासाठी शुभेच्छा!
केदार, फार चांगली पोस्ट.
अरुंधती, अतिशय चांगली माहिती
अरुंधती,
अतिशय चांगली माहिती दिली आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत तर या सगळ्याच चिल्ल्यापिल्ल्यांना 'सेवा सहयोग' या संस्थेच्या 'स्कूल किट' उपक्रमाच्या माध्यमातून दप्तर व शैक्षणिक साहित्य देता येईल असे वाटले, म्हणून तुमच्या दुसर्या लेखात दिलेल्या मृणालिनी भाटवडेकरांच्या क्रमांकावर तुमच्या लेखाचा संदर्भ देउन संपर्क साधला. तेंव्हा यावर्षी सेवा सहयोगने या शाळेतील सर्व मुलांना हे स्कूल किट पुरवले आहे अशी माहिती कळली.
अजून काही मदत करता येईल का ते पहाण्यासाठी संचालकांना मृणालिनी भाटवडेकरांचा नंबर/पत्ता देत आहे.
तुमचे आधीचे लेखही आत्ता वाचले. एक अतिशय चांगल्या कामाबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा.
जीएस, फार छान काम केलेत. खूप
जीएस, फार छान काम केलेत. खूप थँक्स.
स्वाती_आंबोळे, प्रज्ञा९, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अरुंधती, tumachee mail check
अरुंधती,
tumachee mail check karaa.
अरुंधती, tumachee mail check
अरुंधती,
tumachee mail check karaa.
दिनांक २७ जुलैपासून नूतन
दिनांक २७ जुलैपासून नूतन समर्थ विद्यालयात मायबोलीकर स्वयंसेवक + नॉन-मायबोलीकर स्वयंसेवकांच्या संयुक्त प्रयत्नांतून स्पोकन इंग्लिशचे वर्ग दर शनिवारी सुरु झाले आहेत हे सांगण्यास आनंद वाटतो.
सध्या एकूण ९ स्वयंसेवक या उपक्रमात आहेत. २७ जुलै रोजी ४थी ते ७वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्पोकन इंग्लिशचे तास घेण्यात आले. सर्वच स्वयंसेवकांनी खूप उत्साहाने तयारी केली होती. वर्ग घेण्याअगोदर सर्वांनी ह्या संदर्भात इमेल, फोन, प्रत्यक्ष भेटींमधून एकमेकांशी चर्चा - शाळेला भेट, विद्यार्थी-शिक्षक-मुख्याध्यापिकांशी परिचय असे टप्पे पार केले. आपापल्या व्यस्त कार्यक्रमांमधून दर शनिवारी या मुलांसाठी खास वेळ काढणार्या व त्यांच्यावर परिश्रम घ्यायची तयारी दाखविणार्या सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक कौतुक!
२७ जुलैच्या तासानंतर स्वयंसेवकांनी दिलेल्या फीडबॅकमधील काही भाग त्यांच्याच शब्दांमध्ये :
''मुलं खरोखर फार चांगली आहेत. शिकण्याविषयी त्यांना तळमळ आहे. त्यांचा उत्साह पाहून शिकविणार्याला आपोआपच हुरूप येतो. अनेक नव्या नव्या संकल्पना आतापासूनच सुचू लागल्या आहेत.
पाचवी आणि सहावीच्या मुलांची इंग्रजीतली आतापर्यंतची प्रगती तपासताना लक्षात आले की काहींना इंग्रजी मुळाक्षरेच अजून पाठ नाहीत. जे काही थोडेफार भाषेचे ज्ञान आहे ते केवळ 'घोकंपट्टी' या स्वरूपाचे आहे. या मुलांना प्रथमतः इंग्रजी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हायला हवे. त्यासाठी काही खेळ, गोष्टी वगैरे माध्यमे वापरायचा विचार आहे.
मुलांच्या मानाने मुली बर्याच बुजर्या आहेत. पण या मुलांना फक्त इंग्रजी बोलणे शिकवण्यासोबतच आत्मविश्वासाने जगासमोर येणे शिकवायला हवे. ही मुले जगातल्या कुठल्याही वर्गातल्या मुलांपेक्षा तसूभरही मागे नाहीत हे त्यांना कळायला हवे.''
=================
''पहिला दिवसाचा अनुभव सार्यांचा खूपच छान होता. मुलं चांगली आहेत, ऐकणारी आहेत. क्वचित काही तर 'अत्यंत हुशार' म्हणता येतील अशी आहेत. ''
==================
चौथीच्या मुलांबद्दलचा हा फीडबॅक :
1) The children struggle with even basic concepts such as alphabets. They know things like A for Apple, B for Ball by heart but have no understanding of the alphabet and the phonetics behind each letter.
2) They seem to be doing good with numbers. At least from 1-20.
3) Other than that they have no understanding whatsoever of the language. They do not understand words or sentences other than the very basic ones that they are made to memorize.
4) They love singing songs and learn up the words of a song really quickly.
5) The children are very friendly and a real pleasure to teach.
फीडबॅक वाचुन मस्त
फीडबॅक वाचुन मस्त वाटलं!
उपक्रमास पुन्हा एकदा शुभेच्छा!
फीडबॅक वाचुन मस्त
फीडबॅक वाचुन मस्त वाटलं!
उपक्रमास पुन्हा एकदा शुभेच्छा! >> +१
ह्या मुलांना मी भेटून आले आहे. खरंच अतिशय लाघवी, आणि गोड मुले आहेत. योग्य मार्गदर्शनातून नक्कीच पुढे जायची क्षमता असलेली!
मायबोलीच्या माध्यमातून त्यांना जी मदत होतेय त्याबद्दल खूप आनंद वाटतोय.
अकु आणि सगळ्या स्वयंसेवकांचं अभिनंदन.
अकु आणि सगळ्या स्वयंसेवकांचं
अकु आणि सगळ्या स्वयंसेवकांचं अभिनंदन.>>>>> +1000000
फीडबॅक वाचुन मस्त वाटलं!
फीडबॅक वाचुन मस्त वाटलं! उपक्रमास पुन्हा एकदा शुभेच्छा!
अकु आणि सगळ्या स्वयंसेवकांचं खूप कौतूक!
अकु, हे मला आवडणारे यू-टुऊब विडिओ,
अल्फाबेट्स,
http://www.youtube.com/watch?v=BELlZKpi1Zs
http://www.youtube.com/watch?v=saF3-f0XWAY
कलर्स, कलर ट्रेन,
http://www.youtube.com/watch?v=MZ8m2x0qbuo
असेच नंबर ट्रेन, फ्रूट ट्रेन, शेप्स ट्रेन ... विडिओज आहेत.
त्यातून त्यांना थोडा इंटरेस्ट निर्माण करता येईल असं वाटतं.
अजून काही असे विडिओ,
ओव्हर, अंडर, ऑन चा वापर ... http://www.youtube.com/watch?v=idJYhjGyWTU
कलर्स - http://www.youtube.com/watch?v=RPAZHVNVJp0
डेज ऑफ वीक http://www.youtube.com/watch?v=7AvNq2CQnOI
स्वयंसेवकांनो, फार मोठे काम
स्वयंसेवकांनो, फार मोठे काम करता आहात !!!
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी तुम्हा सर्वांना मनापासुन शुभेच्छा.
खूप छान उपक्रम. अभिनंदन आणि
खूप छान उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा. अकु, तुझं कौतुक!
अभिनंदन आणि शुभेच्छा... खरच
अभिनंदन आणि शुभेच्छा... खरच एक चांगलं काम करत आहे तुम्ही...
धन्यवाद अरुंधती. अर्र हे मी
धन्यवाद अरुंधती.
अर्र हे मी कसे काय मिस केले.
माझ्या ओळखीच्यांना पाठवाते.
जर ऑनलाईन शिकवु शकायची काही सोय होऊ शकली तर माझे नाव नोंदवून घे प्लीज.
१०० रू चे डोनेशन मिळवायला हा
१०० रू चे डोनेशन मिळवायला हा माणूस जी मरमर करतो ती बघून आणि ह्या अस्तित्वाला अनेकदा सामोरे जाऊनही परत तितक्याच रिश्टर स्केलने नव्याने धक्का बसला.
अशा उपक्रमात भाग घेताना एक लक्षात नेहमी ठेवावे लागेल की त्यांना मदत हवीये उपकार नाही. आपण जे करतो ते आपल्या समाधानासाठी(ही) असते. >>>
केदार- ही पोस्ट खरंच ठ़ळक अक्षरात लिहीली जावी. आयामप्राऊडऑफयु.
चेरी, थँक्स. कळवते लिंक्स
चेरी, थँक्स. कळवते लिंक्स स्वसेंना.
सर्वांना धन्यवाद! मायबोलीच्या माध्यमातून असे काही काम करायला मिळते आहे हेही फार मस्त आहे.
मायबोलीमुळे ह्या कार्यक्रमात
मायबोलीमुळे ह्या कार्यक्रमात भाग घेता येतोय, ही फार मोठी गोष्ट आहे.
आठवड्यात एक-दीड तास बाजूला काढायला जमेल का? शिकवायला जमेल का? शाळेच्या बाई जे शिकवतात, त्याच्या विरुद्ध काहीतरी शिकवलं जाऊन मुलांचा गोंधळ तर नाही ना होणार? ह्या आणि अश्या अनेक शंका मनात घेऊन हे पाहिलं पाऊल अडखळत अडखळत टाकल आहे. आता पुढे काय होणार बघायचं!
अनया
अनया
सध्या ८-९ स्वयंसेवक शाळेत दर
सध्या ८-९ स्वयंसेवक शाळेत दर शनिवारी किमान एक तास (आणि नंतर जमेल तितका वेळ) शिकवत आहेत. काही कुटुंबे आणि व्यक्ती यांनी बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी एका बक्षीससमारंभात गुणवान मुलांना बक्षिसे दिली जातात. त्यांतली काही या नवीन शिकवायला येणार्या 'दादाताईं'च्या हस्ते मिळावीत, असा आग्रहही मुलांनी आणि हेडमास्तरांनी धरला.. आणि खेळीमेळीच्या वातावरणातल्या एका छोट्या समारंभात ती देण्यातही आली. हा अनुभव खरोखर सुंदर होता. आता आजकाल दर शनिवारी हे नवशिक्षक दादा-ताई आले, की मुलांच्यात उत्साह संचारतो.
सध्या असलेल्या शिक्षक-स्वयंसेवकांपैकी २-३ जणांना ऑफिस किंवा इतर कामामुळे दर शनिवारी जमत नाही. त्यातल्या त्यात एक आठवड्याआड तरी येण्याचा प्रयत्न ते करत आहेतच.
वर्ग नियमित चालू राहण्याच्या दृष्टीने अजून २-३ स्वयंसेवकांची गरज आहे. दर शनिवारी ११.३० ते १२.३० या वेळेत हे काम करायला कुणाला जमत असेल, तर त्यांनी कृपया इथं लिहा.
मुलांचा वयोगट- इ. पहिली ते सातवी. एका वर्गात अंदाजे १० ते १५ मुले फक्त.
यातून बरंच काही आपल्यालाही शिकायला मिळणार आहे. शिवाय 'स्वतःच्या आनंदासाठी, समाधनासाठी' हेही आहेच. मात्र फक्त हौसेपोटी करायचं हे काम नसून किमान वर्षभर (हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत) कमिट्मेंट देण्याची तयारी, सातत्याने दर शनिवारी, असायला हवी- हे लक्षात ठेवावं ही विनंती.
इथं हे लिहिल्याबद्दल थँक्स
इथं हे लिहिल्याबद्दल थँक्स साजिरा!
खूप उत्साही मुलं आहेत आणि त्यांचा नव्या गोष्टी शिकण्याचा उत्साह लाजवाब आहे. शिकवणारे सर्व 'ताई-दादा' शिक्षक खूप मनापासून प्रयत्न घेऊन शिकवत आहेत, त्यांचे खास कौतुक.
कमिटमेन्टबद्दल साजिर्याला अनुमोदन. आपण देऊ शकत असलेल्या वेळेचे व आपल्या प्रयत्नांचे सातत्य हे मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
माझा हात वर. शनिवारी सुट्टी
माझा हात वर. शनिवारी सुट्टी असते. शिकवण्याची आवड आहे. मला घ्या नक्की ह्यात.
शकुन, धन्यवाद! माबो
शकुन, धन्यवाद! माबो संपर्कातून मला व साजिरा यांना तुमचे संपर्क तपशील कळवाल का? [नाव, इमेल, फोन]
डन !
डन !
आताच स्पोकन इंग्लिश वर्गाच्या
आताच स्पोकन इंग्लिश वर्गाच्या सर्व स्वयंसेवक शिक्षकांचे छोटेसे गटग / आढावा मीटिंग झाली. उपक्रम सुरु केल्यापासून गेल्या ४ महिन्यांमध्ये काय प्रगती झाली, काय टप्पे पार केले, काय निरीक्षण आहे, अनुभव काय आहेत यांवर सविस्तर चर्चा झाली. तपशीलवार आढावा, फोटोग्राफ्स इत्यादी सोमवारी पोस्ट करेनच. शिवाय भविष्यात काय हालचाल करावी लागणार आहे ह्याचीही चर्चा झाली. प्रत्येक स्वयंसेवक शिक्षक अगदी मनापासून, तळमळीने हे काम करत आहे हे पुन्हा एकदा जाणवले व मायबोलीच्या माध्यमातून हे सर्व शक्य होत आहे ह्याचा खूप आनंदही झाला.
सोमवारी तपशीलवार आढावा व इतर बित्तंबातमीसकट भेटूच! पण तोपर्यंत राहावत नव्हते म्हणून ही पोस्ट!
२७ जुलै २०१३ रोजी जेव्हा
२७ जुलै २०१३ रोजी जेव्हा मायबोलीच्या स्वयंसेवक शिक्षकांनी स्पोकन इंग्लिशच्या वर्गांची सुरुवात केली तेव्हा प्रत्येकाच्याच मनात 'कसे, कितपत जमेल,' याबद्दल शंका होत्या, प्रश्न होते. पण प्रत्येकाची कमिटमेन्ट निश्चित होती. आपापल्या व्यापातून वेळ काढून शनिवारची दुपार ह्या तासांसाठी मोकळी ठेवत असताना स्वयंसेवकांनाही अनेक कसरती करायला लागलेल्या असणार! पण आपल्या प्रयत्नांचे सार्थक त्या मुलांच्या चेहर्यावर जेव्हा दिसते तेव्हा त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते!
गेल्या १२-१३ शनवारांना झालेल्या तासिकांमधून सर्वात ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे शाळेतल्या मुलांना इंग्लिश शिकण्यात, नवे काही ऐकण्यात, आपल्या ह्या नव्या 'ताई-दादां'कडून बाहेरच्या जगाची माहिती घेण्यात प्रचंड रस आहे. कुतूहल आहे. बालसुलभ मस्तीखोरपणा, दंगा करण्याची खोड, मिष्किलपणा याही मुलांमध्ये आहेच आहे. आणि तरी कितीतरी जण आपल्या परिस्थितीमुळे अकाली गंभीर, गप्प-गप्प किंवा अबोलही आहेत. अनेक मुलांची आकलनशक्ती क्षीण आहे किंवा त्यांच्या परिस्थितीचा त्यांच्या ग्रहणक्षमतेवर तीव्र परिणाम झाला आहे. आणि तरीही प्रत्येक वर्गात किमान २-३ मुलंमुली तरी अशी आहेत ज्यांच्यात विलक्षण स्पार्क आहे, प्रचंड जिज्ञासा आहे, प्रयत्न व कष्ट करायची तयारी आहे!
१६ नोव्हेंबरच्या शनिवारी ह्या उपक्रमात सामील असलेले आम्ही सर्वजण एका अनौपचारिक गटगमध्ये शांतपणे एकत्र भेटलो. तरी तिघाजणांना काही कारणामुळे यायला जमले नाही. एरवी प्रत्येकजण तास घ्यायला येणार, आपल्या स्वयंसेवक साथीदाराशी व साजिर्याशी संपर्क ठेवणार - बोलणार आणि उर्वरित आठवड्यात इमेल / समस द्वारे ग्रुपमधील इतरांच्या संपर्कात राहणार हे ठरलेले असते. परंतु एकत्र बसून काही विचार, चर्चा आणि शेअरिंग करण्याचा अनुभव हा नेहमीच निराळा असतो. आणि झालेही तसेच! भरपूर गप्पा, हशा, खादाडी करून निवांत झाल्यावर सर्वजण मीटिंगच्या मूळ उद्देशाकडे वळले आणि जाणवली ती प्रत्येकाची या मुलांविषयीची, त्यांना आपल्याकडून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसे शिकवता येईल ह्याची तळमळ! सर्व स्वयंसेवकांकडे सांगण्यासारखे, शेअर करण्यासारखे बरेच काही आहे, आणि त्याबद्दल इथे लिहिण्याची त्यांना विनंती केलीच आहे. संबंधित मुला-मुलींची खरी ओळख उघड न करता ते त्यांच्या अनुभवांविषयी इथे लिहितीलच!
गेल्या ४ महिन्यांचा आढावा घेताना आम्हाला जाणवलेल्या काही गोष्टी व चर्चिलेले काही मुद्दे आपल्यासमोर मांडत आहोत :
१. स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याची गरज, जेणे करून इयत्ता पहिली पासून ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण देता येईल.
२. प्रत्येक स्वयंसेवक देत असलेला वेळ : दर शनिवारी किमान २ तास तरी या उपक्रमासाठी देण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रत्येकाने नियमित स्वरुपात तास घेण्याची गरज आहे. सातत्य हे गरजेचे.
३. महिन्यातून एकदा सर्व स्वयंसेवकांची एकत्रित भेट/मीटिंग होणे गरजेचे आहे : सुचवणी : महिन्याचा पहिला शनिवार १० वाजता, शाळेच्या जवळपास.
४. शाळेतील टीचर्सची या उपक्रमात इन्वॉल्वमेन्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. मुलांना शिकवलेल्या Spoken English Lessons ची आठवडाभरात किमान काही प्रमाणात उजळणी घेण्यासाठी शिक्षकांना उद्युक्त करणे.
५. हुशार मुलांचा वेगळा वर्ग घेता येईल का, किंवा त्यांच्यासाठी काही वेगळे मार्गदर्शन आयोजित करता येईल का ह्याची शाळेशी व संबंधितांशी बोलून चाचपणी करणे.
६. शाळेतील टीचर्ससाठी वेगळ्या वर्कशॉप / ट्रेनिंगचे आयोजन करता येईल का, ह्याची चाचपणी.
७. मुलांचा इंग्लिशमधून एखादा सामूहिक कार्यक्रम / गाणे / स्किट / सादरीकरण करता येईल का, हे पाहणे.
८. आतापर्यंतच्या शिकवण्याच्या अनुभवांचे डॉक्युमेन्टेशन / दस्ताऐवजीकरण केलेच आहे, ते पुढेही चालू ठेवणे.
९. नव्या कल्पना, नव्या कविता -गाणी-गोष्टी, धडे, पद्धती, साधने इ. इत्यादी एकमेकांबरोबर शेअर करणे.
१०. स्वयंसेवकांनी आपले अनुभव इतरांबरोबर शेअर करणे.
* ह्यातील सर्वच कल्पना प्रत्यक्षात येतील असे नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहू हा विश्वास आहे.
आवश्यकता आहे ती अधिक
आवश्यकता आहे ती अधिक स्वयंसेवक शिक्षकांची!
अधिक संख्येने स्वयंसेवक शिक्षक हवे आहेत!
दर शनिवारी ११ ते १ हा वेळ देऊ शकणार्या व स्पोकन इंग्लिश शिकवण्यात रुची असलेल्या उत्साही व पुणेस्थित स्वयंसेवकांनी मला किंवा साजिर्याला संपर्कातून आपली नावे कळवण्यासाठी आग्रहाचे आवाहन. सोबत आपला मोबाईल क्रमांक, खरे नाव, इमेल इ. तपशीलही कृपया कळवावेत.
मस्त अपडेटस्, मला शनिवारी
मस्त अपडेटस्, मला शनिवारी सुट्टी नसल्याने प्रत्यक्ष सहभागी होता येत नाहीये पण मित्रमंडळींमधे परत एकदा फिरवतो हा लेख आणि अजून कोणाला येता आले तर बघतो.
फारच छान. इथे शेअर
फारच छान. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद, अकु.
Pages