मभागौदि २०२५ :- लहान मुलांसाठी गंमतखेळ - शॉर्ट्स/रिल्स बनवणे
काय छोट्या दोस्तांनो?
कसे आहात सगळे?
तुमच्यासाठी एक सुंदर खेळ घेऊन आलो आहोत.
ह्या खेळात तुम्हाला रील्स /शॉर्ट व्हिडिओझ बनवायचे आहेत बरं का!
खूप मजा येईल ना!
आपले आईबाबा किंवा घरातील कोणत्याही मोठ्या माणसांची मदत घ्यायची. कारण त्यांचा मोबाईल वापरायचा आहे ना आपल्याला ?
पण म्हणजे नेमकं काय करायचं?
सोपं आहे.
तुम्हाला येत असलेली कविता, गाणे, बडबडगीत, संवाद, कथा, लेख असं *मराठी* साहित्य छोट्या लांबीच्या चित्रफितीच्या माध्यमात कैद करायचं , म्हणजे रीलचं शूटिंग करायचं.
एका गोष्टीची काळजी घ्यायची की विडिओचे चित्र आणि आवाज स्पष्ट असावेत.