मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

अंत: अस्ति प्रारंभ: - १ - {वाटाड्या} - {कविन}"

Submitted by कविन on 16 September, 2024 - 12:57

तो एक वाटाड्या होता. प्रवाशाला पुढचा रस्ता दाखवणं कामच होतं त्याचं. पुर्वी सठीसहामाशी हाताला काम मिळायचं, येतच कोण होतं मरायला इतक्या आडगावी.

आत्तापर्यंत ९९ जणांना त्याने वाट दाखवायचं काम केलं होतं. नियमाप्रमाणे शतक झाले की तो करार मुक्त होणार होता.

सद्गतीच्या वाटेवर नेणे हे कामच होते त्याचे. गोंधळलेल्या, घाबरलेल्या वाटसरूला या सुंदर शाश्वत वाटेची ओळख करुन द्यायला त्याला मनापासून आवडायचे. या वाटेवरचा तो एक वाटाड्याच तर होता. आणि आज तर मुक्तीचा दिवस होता. आज शतक पुर्ण होण्याचे संकेत त्याला कधीचे मिळाले होते.

प्रकाशचित्रांचा झब्बू ५ - फिटनेसचे सवंगडी

Submitted by संयोजक on 16 September, 2024 - 03:10

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

फिटनेस.... तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. याच्यासाठी कुणी डाएट करतात, कुणी व्यायाम, कुणी नियमित एखादा मैदानी खेळ खेळतात तर कुणी रोजच्या रोज ठराविक अंतर चालून येतात तर कुणी हे सगळे थोडेथोडे करतात.
फिटनेस राखायच्या या प्रयत्नात जे जे आपल्याला मदत करतात ते सगळे फिटनेसचे सवंगडी.
आठवा आता तुमच्या फिटनेसचा प्रवास आणि येऊद्या खुप सारी छायाचित्रे Happy

विषय: 

"अंत: अस्ति प्रारंभ: - १ - दर्शन - अni

Submitted by अni on 15 September, 2024 - 06:57

२०२२ जुलैची एक सायंकाळ -
खंडाळ्याच्या घाटात मेघ मल्हारच्या नादात सरी झेलत अनिकेची विकांताची धम्माल सुरू होती. लाँग राईड वर एकट्यानेच जायला आवडायचं त्याला. मस्त धुवांधार पाऊस, पल्सर आणि एक निसर्गवेडा.

२०२२ जुलैची ती रात्र -
चिंताग्रस्त होऊन सर्वजण डॉक्टरांची प्रतीक्षा करत ओटीच्या बाहेर उभे. ऑपरेशन संपले आणि अनिकेत कोमात गेल्याचे कळल्यावर आई बाबा शून्यात हरवून बसलेले.

अंत: अस्ति प्रारंभ: - २ - {हक्काचं अन्न} - {mi_anu}

Submitted by mi_anu on 14 September, 2024 - 23:12

इथे आल्यापासून मायलेकांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.घरून शिदोरी बांधून घेऊन येता आली नव्हती.
सर्वत्र रंगीत वातावरण.सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्न भाव.पण कोणाच्या घरी आवर्जून जाऊन हात पसरणं फार भीतीदायक. अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये.अगदी ओसरीपर्यंत भुकेने नेलंही होतं.पण आतलं दृश्य पाहून परत फिरावं लागलं होतं.शिवाय बाहेर अखंड कोसळता पाऊस.

चित्रकला उपक्रम-माझी आवडती गाडी-माहिरा- (Mrunali.samad)

Submitted by mrunali.samad on 14 September, 2024 - 07:07

माहिरा-वय ६वर्षे .
वर्ग,सेक्शन आणि घर नं पण लिहिलाय Lol
स्कूल बस आमच्या फार आवडीची आहे.. येता जाता फ्रेंड्स सोबत दंगा घालता येतो ना ..

विषय: 

अंत: अस्ति प्रारंभ: -३ - अधांतरी - छल्ला

Submitted by छल्ला on 14 September, 2024 - 01:53

परतीला असह्य विलंब होत होता!

परत घरी जाऊ शकू यावरचा विश्वास डळमळीत होऊ लागला होता.
तांत्रिक बिघाड की मूळ डिझाईन मधला लोचा ..काही समजत नव्हते!
तऱ्हेतर्‍हेच्या मीमांसा आणि दोषारोप.

विषय: 
शब्दखुणा: 

अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - प्राक्तन - छल्ला

Submitted by छल्ला on 12 September, 2024 - 12:51

नर्मदेने डोक्यावरचे लाल आलवण कानामागे खोचले, आणि बाहेर कुणी आहे का याची चाहूल घेतली.
रोजच्या कामाच्या धबडग्यात दुपार कधी सरून जाई तिला पत्ताच लागत नसे.
दोन थोरले दीर, त्यांचा परिवार, पाव्हणेरावळे ... सरदेसायांचा मोठा बारदाना होता!
या सगळ्यात तिला अगदी जवळचा वाटणारा एकच जण होता, चार वर्षांचा अनंता!
तो आजारी होता. काही खातच नव्हता. वैद्यांनी तिला बजावून सांगितलं होतं, की निदान दोन मोसंबी तरी त्याने खायलाच हवीत आज.
तिने निकराचा प्रयत्न चालवला होता आणि अनंता रडरडून खायला नकार देत होता.
"कडू तर नाही मोसंबी? का खाईना पोर..!"

विषय: 
शब्दखुणा: 

अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - {तालमीच्या गोष्टी} - {कविन}

Submitted by कविन on 12 September, 2024 - 06:20

अरे ए! शुंभासारखा तिला बघत काय उभा राहिलायस? असा पुढे ये आणि समोर नजरेला नजर देऊन बोल घडाघडा.

छे! पालथ्या घडावर पाणी आहे

आज दोन महिने झाले तालीम करतोय ना आपण? प्रयोग चार दिवसांवर आलाय आणि तरी एकेकाची ही तऱ्हा. तुम्हा पोरांची नाटकं बसवणं म्हणजे माझ्याच संयमाची परिक्षा आहे.

ओरडून ओरडून माझा घसा दुखला आणि प्रॉंप्टिंग करुन या वामन्याच नरडं सुजलं तरी सुधारणा नाही.

अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - {घरोघरी..} - {कविन}"

Submitted by कविन on 12 September, 2024 - 00:44

“माझा जरा छान फोटो काढून दे ना”

“जसा आहे तसाच येणार ना?”

“टोमणे मारण्यापेक्षा फोटो काढ”

“बरं! हा घे काढला”

“ईss किती जाड आलेय यात. परत काढ”

“बरं!”

“अरे हे काय? पोट विचित्र दिसतय यात.”

“आता बघ!”

“श्शी! बाई तुला नीट काढताच येत नाही फोटो. हा असा फोटो लावू मी डिपीला?”

“मग तुझा तू काढ ना सेल्फी”

“होsत्तर! सगळं मीच करते आता. घर आवरते, तुमची गिळायची सोय करते. नातेवाईकांनाही एंटरटेन मीच करते. तू फक्त मीम्स धाग्यावर पडीक रहा wfh च्या नावाखाली.”

माझे स्थित्यंतर - {व्यसन} - {उपाशी बोका}

Submitted by उपाशी बोका on 11 September, 2024 - 23:15

खरं तर लिहिणे हा माझा प्रांत नाही. पण हा विषयच इतका मोहक वाटला की म्हटलं, आता लिहूनच टाकूया. तसं म्हटलं तर हे लेखन १००% नवीन नाही, पण विषयाला अनुरूप आहे म्हणून परत या लेखात लिहितोच. कुणी सांगावे, जर कुणाला याचा उपयोग झाला तर आनंदच होईल.

माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खात असत, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे तंबाखू चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, गुटखा, पानमसाला वगैरे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली