"अंत: अस्ति प्रारंभ: - १ - दर्शन - अni

Submitted by अni on 15 September, 2024 - 06:57

२०२२ जुलैची एक सायंकाळ -
खंडाळ्याच्या घाटात मेघ मल्हारच्या नादात सरी झेलत अनिकेची विकांताची धम्माल सुरू होती. लाँग राईड वर एकट्यानेच जायला आवडायचं त्याला. मस्त धुवांधार पाऊस, पल्सर आणि एक निसर्गवेडा.

२०२२ जुलैची ती रात्र -
चिंताग्रस्त होऊन सर्वजण डॉक्टरांची प्रतीक्षा करत ओटीच्या बाहेर उभे. ऑपरेशन संपले आणि अनिकेत कोमात गेल्याचे कळल्यावर आई बाबा शून्यात हरवून बसलेले.

२०२४ जुलैची एक रम्य सकाळ -
पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर तो त्याची पल्सर आणि एक शाश्वत सत्य असे तिघेजण लाँग राईडवर. जीवावर बेतलेला तो आज ठामपणे जगाला सांगू शकतो... होय ! परमात्मा आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची आस धरणाऱ्या वारीचे उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान