इथे आल्यापासून मायलेकांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता.घरून शिदोरी बांधून घेऊन येता आली नव्हती.
सर्वत्र रंगीत वातावरण.सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्न भाव.पण कोणाच्या घरी आवर्जून जाऊन हात पसरणं फार भीतीदायक. अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये.अगदी ओसरीपर्यंत भुकेने नेलंही होतं.पण आतलं दृश्य पाहून परत फिरावं लागलं होतं.शिवाय बाहेर अखंड कोसळता पाऊस.
रात्र अशीच पोटात उसळलेला आगडोंब विसरत गेली.आजी कायम म्हणायची 'दिवस बसून राहत नाहीत.सत्त्वपरीक्षा असते ही.आपली सहनशीलता वाढवायची.संकटांचाही आपला मुहूर्त असतो येण्याजाण्याचा.'
सकाळ झाली.मनात आशा परत डोकावू लागली.समोरून एका घरातून आवाज आला."आता मनोभावे स्मरण करून ही पत्रावळ तिठ्यावर ठेवून या.मनात कोणत्याही शंका नकोत.एकदा ठेवल्यावर मागे वळून पाहू नका,इकडे तिकडे जाऊ नका,सरळ घरी परत या."
अतिशय खुश होऊन मायलेकानी पानाकडे धाव घेतली.पाऊस अजूनही आभाळाला भगदाड पडल्यासारखा कोसळतच होता.
ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच!
छान!
छान!
छान
छान
ओह्ह! छान लिहिलंय
ओह्ह!
छान लिहिलंय
छान!
छान!
आई ग्.. जमली आहे..
आई ग्..
जमली आहे..
सही
सही
जबरी!
जबरी!
छान.
छान.
ओह् ....
ओह् ....
जबरी. सही जमलिये!
जबरी. सही जमलिये!
ओह !!!
ओह !!!
जमलीय
विचार करतोय हा ritual कधी असतो?
वास्तुशांत वेळी ? मला लक्षात येत नाहीये.
अनु, मस्त कथा.
अनु, मस्त कथा.
आणि विशेषत:
एकदा ठेवल्यावर मागे वळून पाहू नका,
हे वाक्य वाचल्यावर,
आपले पूर्वज किती ग्रेट होते, अशा गरीब भुकेलेल्यांचा विचार करून, त्यांना संकोच वाटू नये म्हणून, मागे वळून न पाहता, अन्न ठेवून परत यायला सांगायचे! ..
अशा तऱ्हेचा एक फॉरवर्ड पण लिहिता येईल तुला...
पुढच्या गणेशोत्सवात काहीच्या काही
फॉरवर्डस् अशी स्पर्धा नक्की ठेवायला हवी!
आपले पूर्वज किती ग्रेट होते,
आपले पूर्वज किती ग्रेट होते, अशा गरीब भुकेलेल्यांचा विचार करून, त्यांना संकोच वाटू नये म्हणून, मागे वळून न पाहता, अन्न ठेवून परत यायला सांगायचे! .. >> हे मला actually पटलं आहे .
झकास
झकास
या कथेचं बीज 2 कारणाने
1. गणपती ला एकीकडे गेले होते तिथे एका सिंधी घरी ते मूल झाल्यापासून 11 दिवसांचा गणपती आणतात(अनंताच्या नेक्स्ट डे विसर्जन) अशी चर्चा चालू होती.मग त्यावर बाकी बायका 'इमोशन्स वगैरा ठीक है मगर तिथी भी देखो, महालय चालू हो राहा है' असं चालू होतं.
2. श्राद्धात पितर जेवण, देव जेवण, गाय, देव्हारा, गुरुजी अशी 5 पानं वाढायला सांगतात.पिंड म्हणजे सर्व (आजी आजोबा माता पिताप्रातिनिधिक) भात, मध, तूप आणि सर्व श्राद्ध स्वयंपाकातला एक एक कण घालून केलेले मऊभाताचे गोळे असतात, ज्यांना आपण फुल आणि काळे तीळ वाहून नमस्कार करतो. हे पिंड कावळ्यांना खायला गच्चीवर किंवा उघड्या जागी ठेवतात.)हे असं(वेगळ्या अन्न पदार्थांसह) पान वास्तुशांती ला पण नेऊन ठेवायला सांगतात गुरुजी.आणि 'मागे वळून पाहू नका' असं कटाक्षाने सांगतात.(वळून पाहिलं तर काही वेगळं दिसेल का डोळ्यांना), त्यामुळे डोक्यात हा हॉरर कंटेक्स्ट आला.
ज्यांच्या डोक्यात निरागस अन्नदान कंटेक्स्ट आला त्यांनाही धन्यवाद.या कथेत अन्न खाणारे आत्मे आहेत, ज्यांना गणपती पासून पक्ष पंधरवडा तिथी चालू होईपर्यंत मंगल वातावरणामुळे कुठे प्रवेश नव्हता.
प्रतिसादांबद्दल सर्वांचेच आभार.शतशब्दकथा मे 'नया है वह'. त्यामुळे जशी जमली तशी लिहिली.
कथा सणाला अनुचित वाटली असेल तर क्षमा मागते संयोजकांची. एका वाक्यावर बिल्डप म्हणून सुचली होती.
अच्छा अनु
अच्छा अनु
रेफरन्स कळाल्यामुळे अजून स्पष्टता आली.
ते आत्मे होते हे मेजर मिसिंग झालेलं माझयाकडून.
रेफरन्स कळाल्यामुळे अजून
रेफरन्स कळाल्यामुळे अजून स्पष्टता आली.
ते आत्मे होते हे मेजर मिसिंग झालेलं माझयाकडून. +१२३
>>>>>>कथा सणाला अनुचित वाटली
>>>>>>कथा सणाला अनुचित वाटली असेल तर क्षमा मागते
अजिबात नाही. पितर हे आपल्या संस्कृतीचे महत्वाचे घटक मानले जातात.
"कदा ठेवल्यावर मागे वळून पाहू
"कदा ठेवल्यावर मागे वळून पाहू नका" हे एका वर्षश्राद्धाला ऐकलं होतं. पण तिथे ते कमी उंचीच्या टेरेसवर ठेवायचं होतं. म्हणजे बाविसाव्या मजल्यावरून तेराव्या मजल्यावरच्या टेरेसवर. कारण कावळे एवढ्या उंचावर येत नाहीत म्हणे. कथेतले ते दोघेही तेच असतील असं वाटलं नव्हतं.
छान
छान.
अनुचित वगैरे काही नसतं. कथा आहे ती!
भरत >> कावळे २१ मजल्यावर येत नाहीत तर पितरं स्वर्गा पर्यंत कशी चढायची!
>>अशा तऱ्हेचा एक फॉरवर्ड पण लिहिता येईल तुला... >> नको!
कथा भिडली अगदी. भारी लिहिले
कथा भिडली अगदी. भारी लिहिले आहे.
त्यांना संकोच वाटू नये म्हणून
त्यांना संकोच वाटू नये म्हणून, मागे वळून न पाहता, अन्न ठेवून परत यायला सांगायचे! .. >> हे मला actually पटलं आहे .
दक्षिणा +786
मलाही ..
या कथेत अन्न खाणारे आत्मे
या कथेत अन्न खाणारे आत्मे आहेत
>>>>
ओह.. याची हिंट कुठे होती?
मला नव्हते कळले हे..
मला वाटले पावसाने अन्न वाहून गेले.. आणि ते उपाशीच राहिले.
अनु, स्पष्टीकरण दिलेस
अनु, स्पष्टीकरण दिलेस त्यामुळे कळले . मला कोणी गरीब लोक भुकेने व्याकूळ झालेत असे वाटले होते . असो , असाही ट्विस्ट आवडला
"अगदी ओसरीपर्यंत भुकेने
"अगदी ओसरीपर्यंत भुकेने नेलंही होतं.पण आतलं दृश्य पाहून परत फिरावं लागलं होतं"
या वाक्यात पुसट हिंट होती.घराघरात बसवलेले गणपती बघून ओसरीवरूनच परत फिरणे.
ओके
ओके
मला कोणी गरीब लोक भुकेने
मला कोणी गरीब लोक भुकेने व्याकूळ झालेत असे वाटले होते >>> +१.
माझी आकलनशक्ती फार च अशक्त.
खूपच छान जमली आहे. खालील
खूपच छान जमली आहे. खालील प्रतिसाद बघून नीट समजली. मला आधी वाटले की कोणी निराधार मायलेक आहेत. छानच.
डेंजर! वाचताना श्राद्धाचा
डेंजर! वाचताना श्राद्धाचा रेफ्रनस् लागला.
>>>शतशब्दकथा मे 'नया है वह'.
>>>शतशब्दकथा मे 'नया है वह'. >>>>
अहो छान जमलीय की....
गरीब लोक भुकेने व्याकूळ झालेत
गरीब लोक भुकेने व्याकूळ झालेत असे वाटले होते >>> +१
छान शशक!
Pages