अंत: अस्ति प्रारंभ: ३:{दुसरा जन्म }:{-शर्वरी-}
ईवलसं बाळ हातात आले. तिला माहितही नसलेल्या कित्येक भावनांनी तिचे मन भरून गेले. बाळाच्या रडण्याने, जावळाच्या वासानेही तिचा जीव उचंबळून यायचा.
नक्षत्रासारखी आहे पोर, आजी म्हंटली. तिला आता निवांत वाटत होतं. सगे-सोयरे आजूबाजूला होते. भूक तर इतकी प्रचंड लागत असे की, ज्याचे नाव ते.
लहान असताना, गरम पुरणपोळीवर तुपाची धार घालून आजी द्यायची. दमानं घे, तोंड भाजेल म्हणायची. चांदीच्या वाटीत कवडी सारखं घट्ट दही द्यायची. भरलं वांग, मिरचीचा खर्डा. अहाहा! जातीच्या खवय्याला संयम कसला?