अंत: अस्ति प्रारंभ: -३ - अधांतरी - छल्ला

Submitted by छल्ला on 14 September, 2024 - 01:53

परतीला असह्य विलंब होत होता!

परत घरी जाऊ शकू यावरचा विश्वास डळमळीत होऊ लागला होता.
तांत्रिक बिघाड की मूळ डिझाईन मधला लोचा ..काही समजत नव्हते!
तऱ्हेतर्‍हेच्या मीमांसा आणि दोषारोप.

पृथ्वीवरून येणारे उलटसुलट निरोप आणि आशानिराशेचा जीवघेणा खेळ!
वरकरणी कितीही आनंदात आणि सुरक्षित असल्याचा आव आणला तरी सुनीता मनातून पार धास्तावली होती!
त्यात यानातला मर्यादित अन्नसाठा आणि इतर जीवनावश्यक वस्तू.
अजून किती काळ थांबावे लागेल माहिती नाही!
फ्रस्ट्रेशन पहिल्यांदा अन्नावर काढायची तिची जुनीच सवय !
भराभर टीन उघडून तिने ते फ्रोजन समोसे तोंडात कोंबायला सुरुवात केली!
“अगं थांब जरा!”
बूचने अधिकारवाणीने म्हटले, " खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults