अंत: अस्ति प्रारंभ: - १ - {वाटाड्या} - {कविन}"
Submitted by कविन on 16 September, 2024 - 12:57
तो एक वाटाड्या होता. प्रवाशाला पुढचा रस्ता दाखवणं कामच होतं त्याचं. पुर्वी सठीसहामाशी हाताला काम मिळायचं, येतच कोण होतं मरायला इतक्या आडगावी.
आत्तापर्यंत ९९ जणांना त्याने वाट दाखवायचं काम केलं होतं. नियमाप्रमाणे शतक झाले की तो करार मुक्त होणार होता.
सद्गतीच्या वाटेवर नेणे हे कामच होते त्याचे. गोंधळलेल्या, घाबरलेल्या वाटसरूला या सुंदर शाश्वत वाटेची ओळख करुन द्यायला त्याला मनापासून आवडायचे. या वाटेवरचा तो एक वाटाड्याच तर होता. आणि आज तर मुक्तीचा दिवस होता. आज शतक पुर्ण होण्याचे संकेत त्याला कधीचे मिळाले होते.