चटण्या - {बिटरुट चटणी}" - {कविन}"
आज एकच बिटरुट शिल्लक होते. त्याला सत्कारणी लावायला आज त्याची चटणी केली. लेकही आवडीने खाते ही चटणी त्यामुळे बिटरुट आणि मी दोन्ही भरुन पावतो
मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती
आज एकच बिटरुट शिल्लक होते. त्याला सत्कारणी लावायला आज त्याची चटणी केली. लेकही आवडीने खाते ही चटणी त्यामुळे बिटरुट आणि मी दोन्ही भरुन पावतो
माझा मुलगा रुहान (वय वर्षे ९) ने काढलेले चित्र
चित्र काढता काढता विषयाची व्याप्ती वाढत गेली आणि कागद कमी पडल्याचे लक्षात येताच वेगळ्या कागदाची पुरवणी जोडण्यात आलेली आहे.
त्याला म्हंटले रंगव की तर म्हणतोय असेच बरे दिसतेय.... रंगवले तर मज्जा जाईल!!
मुलगी गेले दोन तास कुठले कार्टून काढायचे यावर नुसतीच चर्चा करत पेपर पेन्सिल घेऊन बसली आहे..... चर्चा सफल झाली तर येईल दुपारपर्यंत तोही धागा
सटवाईने कुणाच्या कपाळी काय लिहीलं असेल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना! मला पाऊस आवडतो पण बाल्कनी सोडून पावसात मला जाता येत नाही. आणि या दोघांचं पावसाशी अजिबातच सख्य नाही तरी त्यांची मात्र पावसात भिजण्यातून सुटका नाही. रोजंदारीवर जगणाऱ्याला चॉईस असतोच कुठे?
वाईट वाटलं तरी माझ्या पंखात कुठे बळ होते मदत करण्याइतके.
आजही पाऊस कोसळत होता. “आजही भिजणार बिचारे!”, मन उद्गारले
पण आजचा दिवस मात्र वेगळा होता. आता पावसात भिजायची गरजच उरली नव्हती. कॅट सॅकमधे एकमेकांना बिलगून बसलेले ते दोघे आज त्यांच्या हक्काच्या घरी चालले होते.
नाव वाचून काहींना वाटेल काहीतरी हटके बघायला मिळणार इथे. तर तस काही नाहीये. हे तमिळ नाव आहे. Thengai refers to Coconut, Paal means Milk and Sadam denotes rice. म्हणजे कोकोनट मिल्क राईस आणि आपल्या नारळीभाताचा सख्खा चुलत भाऊ. तुम्ही याला मखमली पुलाव पण म्हणू शकता टेक्ष्चरमुळे.
पदार्थ कॉमन आहे म्हणून जरा नाव वेगळं शोधावं म्हंटलं. संयोजकांच्या 'जुनी कढई नवी उपमा' या घोषणेचा परिणाम असावा बहुदा
डिस्क्लेमर: पक्के चहाबाज असाल तर या शिर्षकातला 'टी' तुम्ही वाचू नका . फुल चहाचे अपभ्रंश करुन लिहीलेल्या शब्दातल्या 'चा' कडेही तुम्ही बघू नका. पण एक वेगळ्या स्वादाचे पेय म्हणून एकदा तरी नक्की करुन बघा. करायलाही फार कष्ट नाहीत.
चला मग करुन बघुया हे दोन चहा
१) गोकर्ण फुलाचा चहा आणि २) जास्वंद फुलाचा चहा
प्रचि:
घटक पदार्थ: १-२ ग्लास आंबील करण्यासाठी
१) नाचणी सत्व/ नाचणी पीठ ३ चमचे
२) पाणी दिड ते दोन ग्लास
३) मीठ (साधे किंवा सैधव)
४) पुदीना ५-६ पाने
५) मिरची तिखटवाली असेल तर अर्धी किंवा पाव मिरची
६) जिरे पावडर अर्धा चमचा
७) आलं अर्ध पेर
८) ताक
९) कोथिंबीर
(यात घटक पदार्थ आणि काही प्रमाणात कृतीमध्ये व्हेरिएशन्स आहेत. मी आज केलेली कृती खाली सविस्तर देते. व्हेरिएशन्स नंतर सगळ्यात खाली लिहेन.)
नमस्कार मायबोलीकरहो!!
मायबोली ही आपल्या सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव! या 'मायबोली गणेशोत्सवाचे' यंदाचे हे पंचविसावे वर्ष!
पंचवीस वर्षे हा एक खूप महत्त्वाचा मैलाचा दगड. गणरायाच्या कृपेने आणि मायबोलीकरांच्या अलोट प्रेमाने, ओसंडणार्या उत्साहाने आजवरची ही वाटचाल आपल्या मायबोली परिवाराला शक्य झाली. मायबोलीकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सग्या-सोयर्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही गणेश चरणी प्रार्थना. _/\_
सालाबादप्रमाणे या विद्या आणि कलांच्या अधिपतीचा जागर करायला इथे जमलेल्या सगळ्या मायबोलीकरांचे सहर्ष स्वागत.
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
एक पिढी होती ज्यांच्या मते शिक्षण पूर्ण करुन एकदा नोकरीला चिकटलात की फंड, पेन्शन घेऊनच तिथून बाहेर पडायचे. सरकारी नोकरी, बॅंकात कारकूनीपासून सुरुवात करुन अधिकारीपदापर्यंत पोहचणे; चांगल्या शाळा कॉलेजात शिक्षक म्हणून सुरुवात करुन पर्यवेक्षक, मुख्याध्यापक वगैरे होऊन निवृत्त व्हायचे ह्या त्या पिढीच्या रुळलेल्या वाटा होत्या.
दर दोन चार वर्षांनी नोकऱ्या बदलणारी पुढची पिढी त्या सगळ्या जुन्या संकल्पनांना धक्का देऊन गेली आणि मग त्याच पिढीने पुढे जाऊन 'फॉलो युअर पॅशन' म्हणत स्वत:च बदललेल्या संकल्पनांना परत एक धक्का देत ऐन चाळिशीत पुन्हा शून्यातून सुरुवात केली.
गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.