One Dish Meal - {mi_anu}

Submitted by mi_anu on 6 September, 2024 - 14:50

साहित्य:
5-6 मखाने
4 बदाम
1 अंजीर
3 जरदाळू
चिमूटभर मीठ
1 सफरचंद
4 खजूर
3 काजू
5 सढळ चमचे दही(घरचे असल्यास उत्तम, नसल्यास आयडी चे)

वाढणी:
खादाड माणसांच्या पोर्शन साईझ च्या गणितानुसार

वेळ:
5 तास

कृती
1. सफरचंद बारीक काप करून बाजूला ठेवावे.
IMG_20240907_000501.jpg
2. दही वाडग्यात काढून नीट फेटून घ्यावे
IMG_20240907_000541.jpg
3. यात सर्व सुकामेवा घालावा.जरदाळू च्या बिया मी काढल्या नाहीत, कारण एकटीच खाणार होते.तुम्हाला पाहिजे असल्यास काढू शकता.
IMG_20240907_000433.jpg
4. दह्यात स्वादानुसार मीठ घालावे.
(या फोटोची काहीही गरज नव्हती.पण मिशो वरून मिळालेलं लेबल दाखवायचं होतं.)
IMG_20240907_000520.jpg
5. दह्यात सर्व सुकामेवा मिक्स करून नीट हलवावे आणि 5 तास बाजूला ठेवून विसरून जावे.
6. पाच तासांनी सर्व ड्रायफ्रुटे चांगली मुरली असतील.चवीने भिजलेली ड्रायफ्रुट, करकरीत सफरचंद, आणि दह्याचा किंचित आंबटपणा यासहीत खावे.
IMG_20240907_000609_0.jpg
7. चिया सीड आणि सूर्यफूल, भोपळा बिया घरात नव्हत्या म्हणून टाकल्या नाही. पण आवडत असल्यास टाकू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कृती. Happy
पण मिशो वरून मिळलेलं लेबल दाखवायचं होतं. >>> छान आहे लेबल. Happy

वाढणी:
खादाड माणसांच्या पोर्शन साईझ च्या गणितानुसार>>>

पण मिशो वरून मिळलेलं लेबल दाखवायचं होतं. >>>

Lol

एवढ्याश्या रेसिपीमधे पण दोन पंचेस टाकलेत….

रेसिपी छान आहे. सोप्पी आहे. सगळे घटक पदार्थ आवडीचे आहेत. नक्कीच करून पाहेन.

छान आहे. Happy
पहिला फोटो बघुन 'वन डिश मील' म्हणजे 'वन डिश' मध्ये पदार्थ मांडलेत. जरा शिमेट्रिकल मांडलेत. खा आता! अशी पळवाट आहे काय वाटलं. ती ताटली पूर्ण वर्तुळ ही नाही. हे म्हणज 'वन (अष्टमांश) डिश मील' झालं असा जोक तयार पण झाला डोक्यात. पण नंतर पाच तासांची रेसिपी दिसली. Lol आता फाको तयार झाल्यामुळे मारणं आलंच.

Happy धन्यवाद मेहरबान कदरदान.
मला सर्वात पहिली टाकायची होती(आणि मग गॅलरीत साचलेले फोटो साफ करायचे होते) म्हणून 12 ला झोपेत लिहायला घेतली.
ही रेसिपी उपासाला चालते.

तुमची म्हणून आणि पहिलीच रेसिपी म्हणून वाचली.. नाहीतर साहित्यात इतके ड्राय फ्रूट बघूनच मी परत निघालो होतो Happy
दह्यात पाच तास मुरवून... टेस्टेड आहे तर एकदा ट्राय करायला हवे..

सोपी healthy रेसिपी. अगदी कोणालाही जमेल त्यामुळे 10/10 मार्क.
एक छोटासा बदल सुचवू का? कृतीच्या पहिल्याच पायरीवर सफरचंदाचे तुकडे करून ठेवायचे असं लिहिलं आहे. त्यानंतर दह्यामध्ये ड्रायफ्रूट्स पाच तास भिजवायचे. (तोपर्यंत सफरचंदाची वाट लागेल.) त्यामुळे पायरी 1 ची कृती पाच नंबरला टाकावी असं सुचवते.

मखाना देखील भिजवले होते का? की ते oven मध्ये फिरवून क्रिस्प करून वरून टाकले?

हां नंतर कापलं तरी चालेल.तसं ते दह्यात भिजवल्यावर काळं पडत नाही, पण तरी.ऐनवेळी ताजं कापून मिसळलं तरी चालेल.
मखाने भिजवले होते.भिजवून चांगले लागतात.कच्चे खाऊन काहींना पचन इश्यू होतात.त्यामुळे स्वतःत चिकाटी असल्यास दह्यात भिजवण्यापूर्वी अगदी थोड्या तुपात खरपूस परतले तरी चालतील.

तसं ते दह्यात भिजवल्यावर काळं पडत नाही, पण तरी.ऐनवेळी ताजं कापून मिसळलं तरी चालेल. >>> ओह अच्छा. सफरचंद पण दह्यात मुरवायचं होतं हे मला कळलं नाही. मला वाटलं दह्यामध्ये फक्त वरून घातलं होतं.
मी डेअरी प्रॉडक्ट्स आणि फळ एकत्र खात नाही, त्यामुळे minus सफरचंद ही डिश नक्की ट्राय करेन.

तसं ते दह्यात भिजवल्यावर काळं पडत नाही, पण तरी.ऐनवेळी ताजं कापून मिसळलं तरी चालेल. >>> ओह अच्छा. सफरचंद पण दह्यात मुरवायचं होतं हे मला कळलं नाही. मला वाटलं दह्यामध्ये फक्त वरून घातलं होतं.
मी डेअरी प्रॉडक्ट्स आणि फळ एकत्र खात नाही, त्यामुळे minus सफरचंद ही डिश नक्की ट्राय करेन.

सफरचंद दह्यात मुरवत ठेवावे हे पाकृ मध्ये मलाही क्लिअर झाले नाही.
माझ्या डोळ्यासमोर तर भेळपुरी जसे सुक्या पुरीने खातात तसा हा ड्राय फ्रूट रायता सफरचंदाची काप घेऊन खायचे आले Happy फोटो सुद्धा तसाच आहे

मी डेअरी प्रॉडक्ट्स आणि फळ एकत्र खात नाही.. >>> ड्राय फ्रूट सुद्धा फळेच झाली Happy

अगं हो, दूध फळं एकत्र नको आयुर्वेद म्हणतां, फळात किंचीत जरी आंबट चव असेल तर विरुद्ध अन्न होईल म्हणून, पण दही किंवा ताक फळं चालतात असं वाचलं होतं.

(आता गुपित फोडणे आले, एरवी हे मी आठवड्यात एखादा दिवस डब्यात नेते, सकाळी 7.3० ला भरून ठेवून 12.30 ला खाते.पण काल हरतालिका असल्याने 5 तास ठेवून खायचा प्लॅन सफल झाला नाही आणि भूक लागल्याने अर्ध्या तासात मटकवले.म्हणून असे दिसतेय.)

एरवी यात रोल्ड ओट आणि एक सिझन असतो त्यात ब्लुबेरी एकदम स्वस्त झालेल्या असतात त्या ब्लुबेरी टाकते.सफरचंद टाकल्यावर जरा पोटभरीची भावना येते.पोर्शन कंट्रोल बरेचदा पोटापेक्षा डोळ्याने आणि मनाने स्वीकारणे जास्त कठीण असते.म्हणजे मूठभर पनीर खाऊन कॅलरी आणि पोषण तेच मिळेल पण कार्ब बेस खाणं खायची ज्याला सवय आहे त्याला मन 'ह्या, काहीतरी राहिलंय खायचं' सांगत राहील. त्या मनाला आणि डोळ्याला शांत करायला हा सफरचंदरुपी फिलर.

पण सर्वानुमते सफरचंद ऐनवेळी टाकण्याची कल्पना पण आवडलेली आहे.करकरीतपणा जास्त चांगला राहील.

मस्त आहे रेसिपी. आणि लिहिली ही मस्तच आहे..
पाच तास बाहेर ठेवून दही आंबट होत नाही का ? की सगळ एकत्र करून फ्रिज मध्ये ठेवलं होतं ?

मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण डब्यात नेते.दही आंबट नव्हतं झालं.बहुतेक विकतच्या आयडी दह्यात आंबट होऊ नये म्हणून काही व्यवस्था असेल.

व्वा मस्तच!!

>>पहिला फोटो बघुन 'वन डिश मील' म्हणजे 'वन डिश' मध्ये पदार्थ मांडलेत. जरा शिमेट्रिकल मांडलेत. खा आता! अशी पळवाट आहे काय वाटलं.
मला पण अगदी तसच वाटल Wink

>>मग गॅलरीत साचलेले फोटो साफ करायचे होते
जरा थांबा.... झब्बूला उपयोगी पडतील Happy

मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण डब्यात नेते.दही आंबट नव्हतं झालं.बहुतेक विकतच्या आयडी दह्यात आंबट होऊ नये म्हणून काही व्यवस्था असेल. > बरोबर.

पहिला फोटो बघुन 'वन डिश मील' म्हणजे 'वन डिश' मध्ये पदार्थ मांडलेत. जरा शिमेट्रिकल मांडलेत. खा आता! अशी पळवाट आहे काय वाटलं.>>+१

अनु मस्त आहे ही डिश आणि माझ्या उपयोगाचीही आहे. चिया सीड्स, मिक्स्ड सिड्स (किसान कनेक्टवरुन मागवले होते ते आहेत घरी) मिक्स करेन. चिया सीड्स रात्री पाण्यात घालून मग त्यात मिक्स करतेस की पाच तासात ते दह्यातलं पाणी पिऊन फुगतात तेव्हढच पुरेसं आहे? मला असे सांगितले डायटिशियन मैत्रिणीने की चिया सीड्स न भिजवता खाऊ नये.

हे कमी प्रमाणात करुन ब्रेफा होईल पोटभरीचा आणि असे वरच्या इतके केले तर एक लंच डबा नक्कीच होईल माझा.

धन्यवाद करुन बघता येईल अशी रेसिपी दिल्याबद्दल नाहीतर एरव्ही मी फक्त कौतुक भरल्या नजरेने इथले फोटो बघते (माझ्यातल्या पेशन्सची लेव्हल माहिती असल्यामुळे) Proud

चिया आम्ही खातो तेव्हा 2-3 तास जितक्या भिजतील तितक्या भिजवून खातो. रात्रभर भिजवून वापरण्याइतकं परफेक्ट प्लॅनिंग जमलं नाही अजून.
एरवी मीपण इथल्या रेसिपी बघून 'कोणी करून घालेल का' असे खयाली पुलाव बनवत राहते.
यावेळची आव्हाने थोडी सोपी असल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद.
(मी कोणताही कठीण पदार्थ वर्षात केव्हाही केला तरी स्टेप चे फोटो काढून ठेवणार आहे.कोणत्यातरी गणपतीला आलेल्या चॅलेंज मध्ये तो बसेल आणि टपाटप रेसिपी टाकता येतील.)

व्वा मस्तच.
आधी पहिला फोटो पाहून वाटल हेच One Dish Meal.
पण मग सगळी पाककृती वाचली.
नक्कीच करून बघण्यात येईल.
बाकी ते मिशो वरून मिळालेलं लेबल भारी आहे. मागवेन.
आमच्याकडे अशाच बरण्या आहेत. येरा च्या.

शेवटचा फायनल फोटो लै भारी नाही आलाय.तो पाहून लोक रेसिपी पण पूर्ण न वाचता पळून जातील.म्हणून रंगीत टाकला.

छान रेसिपी आहे. Happy

आता एक उगाचच प्रश्न.
हे जेवणानंतर खायचं की आधी खायचं?
Lol

Pages