One Dish Meal - {mi_anu}

Submitted by mi_anu on 6 September, 2024 - 14:50

साहित्य:
5-6 मखाने
4 बदाम
1 अंजीर
3 जरदाळू
चिमूटभर मीठ
1 सफरचंद
4 खजूर
3 काजू
5 सढळ चमचे दही(घरचे असल्यास उत्तम, नसल्यास आयडी चे)

वाढणी:
खादाड माणसांच्या पोर्शन साईझ च्या गणितानुसार

वेळ:
5 तास

कृती
1. सफरचंद बारीक काप करून बाजूला ठेवावे.
IMG_20240907_000501.jpg
2. दही वाडग्यात काढून नीट फेटून घ्यावे
IMG_20240907_000541.jpg
3. यात सर्व सुकामेवा घालावा.जरदाळू च्या बिया मी काढल्या नाहीत, कारण एकटीच खाणार होते.तुम्हाला पाहिजे असल्यास काढू शकता.
IMG_20240907_000433.jpg
4. दह्यात स्वादानुसार मीठ घालावे.
(या फोटोची काहीही गरज नव्हती.पण मिशो वरून मिळालेलं लेबल दाखवायचं होतं.)
IMG_20240907_000520.jpg
5. दह्यात सर्व सुकामेवा मिक्स करून नीट हलवावे आणि 5 तास बाजूला ठेवून विसरून जावे.
6. पाच तासांनी सर्व ड्रायफ्रुटे चांगली मुरली असतील.चवीने भिजलेली ड्रायफ्रुट, करकरीत सफरचंद, आणि दह्याचा किंचित आंबटपणा यासहीत खावे.
IMG_20240907_000609_0.jpg
7. चिया सीड आणि सूर्यफूल, भोपळा बिया घरात नव्हत्या म्हणून टाकल्या नाही. पण आवडत असल्यास टाकू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसीपी!
जेवणानंतर खायचं की आधी खायचं?..... +१.

तसेही 1 अंजीर,3 जर्दाळू वगैरे आपल्या बस की बात नहीं.

आज डब्यात रोल्ड ओटस, चिया,आयडी दही, पाणी,मिक्स ड्रायफ्रुट, 3 किमिया खजूर,सफरचंद काप, मीठ असे मिसळून नेले होते, दुपारी 1.15ला पण सफरचंद तपकिरी झाले नव्हते(बहुतेक आयडी दह्यातल्या केमिकल्स ची कृपा असेल.)
त्यामुळे शिक्कामोर्तब झाले की आयडी दही असल्यास सफरचंद आधी पण घालता येईल(मी आयडी दही मालकाची नातेवाईक किंवा पेड प्रमोटर नाही.)

करुन बघितले आणि आवडले. सफरचंद सकाळीच बाकी सगळ्या बरोबरच दह्यात मिक्स केले होते. ८ वाजता डबा भरला साधारण मी आणि १ वाजता जेवले तरी सफरचंद करकरीत राहिले होते. काळेही पडले नव्हते. घरचे दही पण ते काल सकाळचे होते म्हणून आंबट होण्याच्या भितीने मी तासाभरात ऑफीसला पोहोचल्यावर डबा फ्रिजमधे ठेवला होता.

IMG_20240918_132539_3.jpg

फोटो बरा असेल नसेल पण लंच पोटभरीचा आणि टेस्टी होता Proud

वाह, छान दिसतोय फोटो
काय काय आणि किती किती प्रमाणात व्हेरिएशन केलं तेही सांग.

(आयडी दही म्हणजे दह्याचा आणि इन्स्टंट डोसा पीठ, ,फिल्टर कॉफी इन्स्टंट द्रावण,पनीर विकणारा ब्रँड)
https://www.idfreshfood.com/

काय काय आणि किती किती प्रमाणात व्हेरिएशन केलं तेही सांग.>> घरातले जर्दाळू आणि खजूर संपले होते. मी घातलेले जिन्नसः २-३ अक्रोड तुकडे करुन, ३ बदाम रात्री भिजवून ठेवले होते ते साले काढून चिरुन, बेदाणे ५-६, चिया सिड्स अर्धा चमचा, मिक्स सिड्स १ चमचा (सुर्यफूल, भोपळा, अळशी अशा मिक्स सिड्सचे पॅकेट किसान कनेक्ट वरुन मागवले होते), मखणा (हा किती घेतला लक्षात नाही पण मुठभरीला थोडा कमी असेल, अर्ध सफरचंद फोडी, दही, सैधव मीठ (मी वेगळ्या डब्यात छोटे प्रसादाचे केळेही घेऊन आले होते संपवायचे म्हणून. ते पण आयत्यावेळी मिक्स केले. मला माझी डाएटीशीयन म्हणालेय की रोज दही केळे खा एका जेवणात शक्य असल्यास. रोज काही होत नाही पण आज अनायसे जमून आले) (टोटल पोर्शन पुढल्यावेळी अजून थोडा कमी करेन एका डब्यासाठी)

(ग्रिक योगर्ट मिक्स करुनही हे चांगले लागेल असे वाटतेय.) (एक व्हिडिओ बघितला होता कधीतरी युट्युबवर, त्यात त्या बाईंनी स्मुदी बोल असे नाव देऊन दही/योगर्टमधे घेतलेल्या प्रमाणाच्या निम्मी फळ आणि अक्रोड बदाम वगैरे ब्लेन्ड करुन त्या स्मुदीत उरलेली फळे आणि अक्रोड बदाम खजूर वगैरे चिरुन घातले होते. नुसती स्मुदी प्यायली आपण तर काही घटकांचे ऑक्सिडेशन होते, काही घटकातले फायबर तितके मिळत नाहीत त्यामुळे या बोलमधे दोन्ही साधले जाईल थिकनेस आणि अख्ख्या फळाचे गुणधर्म वगैरे असे थोडेफार सार होते. करुन बघेन एखाद दिवस तसेही तेव्हढा उत्साह आणि वेळ असेल तर)

ओके.
ग्रीक योगर्ट एकदा खाल्ले होते.जरा विचित्र लागते(माझं आणि याकुल्ट चं पण पटत नाही.)
स्मूदि मध्ये काही गोष्टी चांगल्या लागत नाहीत.अंजीर बारीक झाले तर उत्तम लागतात.पण जरदाळू चं तसं नाही.शिवाय भिजलेले बदाम नीट बारीक होत नाहीत(किंवा सर्व भिजवलेला मसाला अगदी थोडया पाण्यात वाटून मग बाकी दही मिक्स करून परत फिरवावे लागेल.)

ग्रीक योगर्ट एकदा खाल्ले होते.जरा विचित्र लागते>> मलाही नाही आवडले. पण कदाचित तो फ्लेवर्/ब्रॅन्ड नसेल झेपला असे मी मानून चालले

धन्यवाद. इतक्या सरस वन डिश मिल एंट्रीज स्पर्धेत असताना याचा नंबर आल्याचं पाहून भारी वाटतं आहे.
मतं दिलेल्या सर्वांचे आभार.

अभिनंदन..
पाकृ स्पर्धेत पहिली एन्ट्री तुमचीच होती वाटते.. हिंमत की किंमत Happy

अभिनंदन अनु.
तुझी ही रेसिपी अगदीच फ्लेक्झिबल आहे....त्यामुळे आवडली जास्त.

अभिनंदन

तुझी ही रेसिपी अगदीच फ्लेक्झिबल आहे....त्यामुळे आवडली जास्त.>> +१

मी दोनवेळा डब्याला करुन आणली ही. आता व्हेरिएशनही करेन. सहज सोपी,पौष्टीक आणि चविष्टही आहे ही रेसिपी.

Pages