चटण्या - {बिटरुट चटणी}" - {कविन}"

Submitted by कविन on 11 September, 2024 - 13:40

आज एकच बिटरुट शिल्लक होते. त्याला सत्कारणी लावायला आज त्याची चटणी केली. लेकही आवडीने खाते ही चटणी त्यामुळे बिटरुट आणि मी दोन्ही भरुन पावतो Proud

साहित्य:
एका बिटरुटचा कीस
ओला नारळ बिटरुटच्या कीसापेक्षा साधारण निम्मा (इक्वल क्वांटिटी घेतला तर नारळाची चव ओव्हरपॉवर होते)
२ हिरव्या मिरच्या
१ लाल मिरची किंवा एक चमचा लाल तिखट
(फक्त लाल किंवा हिरवी मिरची किंवा तिखट घेतले तरी चालेल)
उडदाची डाळ
चण्याची डाळ
कढीपत्ता
२ लसूण पाकळ्या
मीठ
चिंच
तेल (कच्च साहित्य परतायला आणि नंतर फोडणी द्यायला)

करायला लागणारा वेळ (तयारी+कृती) जास्तीत जास्त १०-१५ मिनिटे

InCollage_20240911_213142493.jpg

कृती:
थोड्या तेलावर उडीद आणि चणाडाळ परतून घ्यावी. डाळींचा रंग बदलून सोनेरी झाला की त्यात कढीपत्ता, लसूण आणि मिरची घालून परतायचे एखाद मिनिट
त्यात आता बिटरुटचा कीस, मीठ आणि हवे असल्यास लाल तिखट घालून २-३ मिनिटे परतायचे. किंचीत रंग बदलला की त्यात खोबरं घालून परत अर्धा मिनिट परतायच आणि चिंच घालून गॅस बंद करायचा
हे सगळे जरा गार झाले की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे
या वाटलेल्या चटणीवर फोडणी घालायची
फोडणी: तेल तापले की मोहरी... मोहरी तडतडली की हिंग, उडदाची डाळ आणि कढीपत्ता घालून ही फोडणी चटणीवर घालून सगळीकडे मिसळून घ्यायची. अशी पाणी न घालता केलेली चटणी फ्रीजमध्ये २-३ दिवस रहाते (जास्त केली असेल तर)

काहीजणं यात वाटताना थोडे पाणी घालून ओलसरही करतात पण मग ती फारतर एखाद दिवस फ्रीजमध्ये टिकत असावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच बीटरूट आणलं आहे त्यामुळे करुन पाहिन. उद्या दोस्याचा बेत आहेच.>> करुन बघ आणि सांग आवडली का

धन्यावाद प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचेच

@केया, हो लसूण वगळला तरी चालेल.

okey

छान आहे चटणी.
उडदा चण्याच्या डाळीची फोडणी दाताखाली आली की छान लागते

उडदा चण्याच्या डाळीची फोडणी दाताखाली आली की छान लागते>> मलाही आवडते म्हणून मी नारळ चटणीलाही अशीच फोडणी देते