चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान - स्वरुप - रेवा कुलकर्णी.
उपक्रम जाहिर झाल्यावर घरात जेंव्हा डिटेल्स सांगितले तेंव्हापासून बच्चेकंपनीने अगदी पिच्छा पुरवला होता...... दोन चारदा रफ ड्रॉइंगसुद्धा काढून झाले; पण आधी घरचा गणपती आणि मग सोसायटीतले गणपतीचे कार्यक्रम, स्पर्धा यामुळे गेले काही दिवस जरा गडबडीचेच होते.
आज सगळ्यांनाच सुट्टी असल्यामुळे आज उठल्या उठल्याच "आधी लगीन चांद्रयानाचे" हे अजेंड्यावर आले होते.