Indian Railways history

आगीनगाडी ते वंदे भारत एक्सप्रेस

Submitted by पराग१२२६३ on 18 April, 2023 - 05:01

ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत खंडप्राय, अखंड भारताच्या कानाकोपऱ्यातून कच्च्या मालाची बंदरांकडे आणि ब्रिटनहून आयात केलेल्या तयार मालाची भारताच्या बाजारपेठेत जलद ने-आण करण्याच्या हेतूने येथे लोहमार्गांचे जाळे उभारण्याचा विचार एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून होत होता. त्याचबरोबर भारतात आणीबाणीच्या प्रसंगी सैन्याची जलद ने-आण करण्यासाठीही लोहमार्गांच्या बांधणीचा आग्रह तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड डलहौसीने धरला होता. त्यानुसार 1849 मध्ये ग्रेट इंडियन पेनीनसुलार रेल्वे (GIPR) कंपनीची स्थापना होऊन मुंबई आणि ठाणेदरम्यान लोहमार्ग उभारण्यास सुरुवात झाली.

Subscribe to RSS - Indian Railways history