चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान - स्वरुप - रेवा कुलकर्णी.

Submitted by स्वरुप on 28 September, 2023 - 04:34

उपक्रम जाहिर झाल्यावर घरात जेंव्हा डिटेल्स सांगितले तेंव्हापासून बच्चेकंपनीने अगदी पिच्छा पुरवला होता...... दोन चारदा रफ ड्रॉइंगसुद्धा काढून झाले; पण आधी घरचा गणपती आणि मग सोसायटीतले गणपतीचे कार्यक्रम, स्पर्धा यामुळे गेले काही दिवस जरा गडबडीचेच होते.
आज सगळ्यांनाच सुट्टी असल्यामुळे आज उठल्या उठल्याच "आधी लगीन चांद्रयानाचे" हे अजेंड्यावर आले होते.
माझ्या मुलीने (रेवाने) काढलेले हे चांद्रयान..... तिने तिच्या स्वभावानुसार पटकन तुकडा पाडला आणि चित्र माझ्या हाती दिले..... मुलाची (रुहान) कलाकुसर अजुन चालूच आहे.... त्याने काढलेले चित्र वेगळ्या धाग्यात पोस्ट करत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर, तिरंग्याचे तीन रंग फार कल्पक पद्धतीने वापरले आहेत.
दोन्ही मुलांना शेडींग छान जमते.

मस्त रेवा!
हो गवत, आगीचा लोळ आणि पांढरा धूर तिरंग्यात मस्त बसलंय!

शाब्बास रेवा !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला उपक्रम १ - चांद्रयान -  रेवा कुलकर्णी.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन रेवा Happy