लेखन उपक्रम -३-●■●- अज्ञानी

Submitted by अni on 27 September, 2023 - 08:06

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... त्याने सर्वकाही पुन्हा चार्जिंगला लावले. गेल्यावेळेस अचानक सहल जाणे रहित झाल्याने सर्वच बेत फसले होते. म्हणून आता कुठलीच रिस्क नको होती. सर्व काही वेळेवर आणि वेळेनुसार घडणे ह्यावरच सर्वकाही अवलंबून होते. अन्यथा उद्या ह्या वेळेला त्याचं इतरांसाठी असलेले अस्तित्व शून्य होणार ह्याची त्याला खात्री होतीच. लाल निळी पिवळी सगळ्याच एकमेकात गुरफटवून शांत डोक्याने त्याने काळीला बरोबर तिच्या जागेवर अलगद आणून ठेवले आणि सर्व बॅटरी चार्ज झाल्याची खात्री पटताच टाइमबॉम्ब त्या स्कुलबस खाली फिट केला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users