एक पिढी होती ज्यांच्या मते शिक्षण पूर्ण करुन एकदा नोकरीला चिकटलात की फंड, पेन्शन घेऊनच तिथून बाहेर पडायचे. सरकारी नोकरी, बॅंकात कारकूनीपासून सुरुवात करुन अधिकारीपदापर्यंत पोहचणे; चांगल्या शाळा कॉलेजात शिक्षक म्हणून सुरुवात करुन पर्यवेक्षक, मुख्याध्यापक वगैरे होऊन निवृत्त व्हायचे ह्या त्या पिढीच्या रुळलेल्या वाटा होत्या.
दर दोन चार वर्षांनी नोकऱ्या बदलणारी पुढची पिढी त्या सगळ्या जुन्या संकल्पनांना धक्का देऊन गेली आणि मग त्याच पिढीने पुढे जाऊन 'फॉलो युअर पॅशन' म्हणत स्वत:च बदललेल्या संकल्पनांना परत एक धक्का देत ऐन चाळिशीत पुन्हा शून्यातून सुरुवात केली.
Gen Z वाल्यांनी तर मोठमोठ्या कॉर्पोरेटस कडे पाठ फिरवून स्टार्टअप्सची कास धरली.
गेल्या दोन तीन दशकात मध्यममार्गी मराठी माणूस नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून धंद्यात उतरला, तरला आणि स्थिरावला सुद्धा!
पैसे किती जोडले हा वेगळा विषय पण या सगळ्या स्थित्यंतरातून जाताना दांडगा अनुभव गाठीशी बांधला गेला. त्या त्या क्षेत्रातल्या खाचाखोचा कळल्या, चुकातून शिकलो तश्या अनेक सक्सेस स्टोरीजही घडल्या.
आपल्या मायबोलीवर जसे यातल्या प्रत्येक पिढीचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत तसेच वेगवेगळ्या नोकरी आणि व्यवसायात प्रभुत्व मिळवलेले, नावारुपाला आलेलेही अनेक जण आहेत. लोकल आहेत, ग्लोबल आहेत, तज्ञ आहेत, सूज्ञ आहेत
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपापल्या नोकरी, व्यवसायातल्या किंवा तुम्ही प्राविण्य मिळवलेल्या किंवा तुम्हास माहीत असलेल्या तांत्रिक किंवा व्यावसायिक क्षेत्राचे/ त्यातील आत्तापर्यंतच्या प्रवासाचे एक सिंहावलोकन व्हावे, त्या आढाव्याचा आलेख शब्दरुपात उमटावा, अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या सद्हेतूने हा लेखन उपक्रम घेऊन येतोय
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
नियमावली :
१) लेखन कोठेही पूर्वप्रकाशीत नसावे
२) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही
३) फक्त नोकरी, व्यवसायच असे नाही तर त्याव्यतिरिक्तही तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तांत्रिक, व्यावसायिक माहिती/अनुभव लिहण्याची पूर्ण मुभा आहे
४) धाग्याचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"शहाणे करुनि सोडावे" - (तुमच्या लेखाचे शीर्षक) {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
५) प्रत्येक धाग्याला "मायबोली गणेशोत्सव २०२४" अशी शब्दखूण द्यावी
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
भरभरुन लिहा; व्यक्त व्हा
जितुके काही आपणासी ठावें। तितुकें हळुहळु सिकवावे। शहाणे करुनि सोडावे। सकल जन।।
|| गणपती बाप्पा मोरया ||
शहाणा होण्यास उत्सुक. वाचणार.
शहाणा होण्यास उत्सुक.
वाचणार.
मस्त उपक्रम!
मस्त उपक्रम!
वा ! आवडला उपक्रम.
वा ! आवडला उपक्रम.
प्रयत्न करीन लिहिण्याचा.
नैच जमलं तर वाचक म्हणून आहेच.
-दिलीप बिरुटे
वाचनमात्र असेन.
वाचनमात्र असेन.
या वेळच्या गंमत, खेळ उपक्रमामुळे खूप छान मजा आली.