प्रकाशचित्रांचा झब्बू ५ - फिटनेसचे सवंगडी

Submitted by संयोजक on 16 September, 2024 - 03:10

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

फिटनेस.... तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. याच्यासाठी कुणी डाएट करतात, कुणी व्यायाम, कुणी नियमित एखादा मैदानी खेळ खेळतात तर कुणी रोजच्या रोज ठराविक अंतर चालून येतात तर कुणी हे सगळे थोडेथोडे करतात.
फिटनेस राखायच्या या प्रयत्नात जे जे आपल्याला मदत करतात ते सगळे फिटनेसचे सवंगडी.
आठवा आता तुमच्या फिटनेसचा प्रवास आणि येऊद्या खुप सारी छायाचित्रे Happy

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा फिटनेस सवंगडी - श्री आशुचॅम्प
(यांनी २१ किलिमीटर ची हाल्फ मॅरेथॉन पूर्ण केली मी फक्त सोबत होतो)
MB Ganesh Fitness- 001.jpg

कालच्या (तब्बल ५ दिवसांनी - गणपती, महालक्ष्म्या इ. मुळे न जमलेल्या) पूर्ण केलेल्या रिंगा!

Goal11.pngGoal1.png

फिटनेस सोबती- ग्लोव्ज, इयरफोन (आवडीची गाणी न ऐकता कार्डिओ करणं बोअर होतं) डकेथलॉन शूजला झब्बू.

मला म्युझिकशिवाय व्यायाम करताच येत नाही. हा ब्लु टुथ हेडफोन. आय कॅन नॉट इमॅजिन लाईफ विदाऊट इट. व्यायाम करताच येत नाही.

कोणीतरी (म्हणजे मीच) म्हटलेले आहे २ च गोष्टी सत्य बाकी मिथ्य - प्रेम आणि संगीत. नॉट नेसेसरीली इन दॅट ऑर्डर Happy

सामो, व्यायाम करायला म्युजिक नाही नियत लागते..
मग तो कुठेही करता येतो.
फिटनेसची सवंगडी - लोकल ट्रेन.. इथे लटकून पुशअपचा मोह होतोच...

IMG_20240917_004612.jpg

बाई दवे,
हे श्रीमंती धाग्यात सुद्धा टाकू शकतो. इतकी रिकामी लोकल ट्रेन. हे फक्त राजाबाबूच जमवू शकतो Happy

boatwave.jpg

गाडी रुळावरून घसरली होती. यार्डात काम सुरू आहे. पावसाळा संपला की पुन्हा प्रभातफेर्‍या सुरू होतील.

Screenshot_2024-09-17-12-10-02-10_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
आमची मनुडी. हिला दररोज किमान एक तास चालवायचंच असतं. मग सोबत माझीही दिंडी निघते. हेच काय ते वर्काऊट. सुट्टीच्या दिवशी बाबांची ड्युटी.

लेक फारच गोड आहे चिन्मयी..
मुले फिटनेसचे सवंगडी दोन प्रकारे असतात..
एक म्हणजे असे जे आपल्याला फिरायला सोबत करतात. नाहीतर कोण उठून सकाळी सकाळी एकटेच जाणार.
दुसरे म्हणजे दिवसभर त्यांच्या मागे पळावे लागते आणि आपण फिट राहतो.
आणि डोक्याचा ताप वाढवून कॅलरीज जाळतात तो तिसरा प्रकार Proud

डोक्याचा ताप वाढवून कॅलरीज जाळतात>> असं करण्याने कलारी जळल्या असत्या तर मी फिट्टेस्ट राहिले असते. Lol
किंवा बडबड करण्याने calories जळायला हव्या होत्या

हे फोटो चालतील का?
Screenshot_20240917_200828_Gallery.jpg
प्रीवर्काऊट -रात्रभर भिजवलेला सुकामेवा

Screenshot_20240917_200844_Gallery.jpg
संध्याकाळ चा खाऊ-रोस्टेड मखाने

Pages