अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - {तालमीच्या गोष्टी} - {कविन}
अरे ए! शुंभासारखा तिला बघत काय उभा राहिलायस? असा पुढे ये आणि समोर नजरेला नजर देऊन बोल घडाघडा.
छे! पालथ्या घडावर पाणी आहे
आज दोन महिने झाले तालीम करतोय ना आपण? प्रयोग चार दिवसांवर आलाय आणि तरी एकेकाची ही तऱ्हा. तुम्हा पोरांची नाटकं बसवणं म्हणजे माझ्याच संयमाची परिक्षा आहे.
ओरडून ओरडून माझा घसा दुखला आणि प्रॉंप्टिंग करुन या वामन्याच नरडं सुजलं तरी सुधारणा नाही.