गंमतखेळ

मभागौदि २०२५ - गंमतखेळ - चित्रांची भाषांतरे

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 18 February, 2025 - 02:08

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. संवाद साधणे, स्वतःचे विचार, भावना, संवेदना व्यक्त करणे हा त्याचा स्वभावआहे ; ती त्याची गरजही आहे. भाषा हे एक संवादाचे व व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भाषा ही जशी शब्दांची असते तशीच चित्रांची, संगीताची, नृत्याची, वेगवेगळ्या कलांची सुद्धा असते.

आपल्या सर्वांना जोडणारी भाषा मराठी ! मराठी लेखन व वाचन हा आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! मग ते लेखन गोष्ट असो, लेख असो, कविता असो किंवा चारोळी असो.

मभागौदि २०२५ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत एक खास खेळ, ‘चित्रांची भाषांतरे'

विषय: 

मभागौदि २०२५ - गंमतखेळ - आधुनिक म्हणी

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 14 February, 2025 - 22:32

म्हणी - कोणत्याही भाषेचा सगळ्यात सुंदर अलंकार. एकच वाक्य, पण समयोचित आणि नेमके! म्हणतात ना की, a picture is worth a thousand words; तसेच म्हणींचे आहे. एक म्हण ही एका परिच्छेदापेक्षा अधिक परिणामकारक असते. मराठी भाषेत तर कित्येक सुंदर सुंदर म्हणी आहेत.

पण अडचण अशी आहे की आजच्या या Gen Z, Gen Alpha ला जुन्या म्हणी कळत नाहीत. एक म्हण सांगितली, तर त्यातल्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या छटा, स्थळकाळाचे संदर्भ हे सगळे त्यांना माहीत असेल व कळेलच असे नाही. म्हणींचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाच असेल तर जरा आजच्या पिढीला समजतील, 'क्लिक' होतील अशा म्हणी तयार करायला काय हरकत आहे?

विषय: 

दोन वर्षाच्या मुलांसाठी पार्टी गेम्स

Submitted by मृदुला on 13 January, 2015 - 11:22

दोन वर्षाची ६ मुले व त्यांचे पालक अश्या पार्टीसाठी खेळ घ्यायचे आहेत. केवळ मुलांचे आणि मुले+पालक अश्या टीमचे असे खेळ मी शोधते आहे. आमचे कुटुंब वगळता बाकी लोक स्थानिक इंग्रज आहेत.

दोन वर्षाची मुले सूचना कितपत समजू शकतील आणि आनंदाने खेळू शकतील अशी मला थोडी शंका आहे. कोणाला या वयोगटाचा अनुभव असल्यास तेही सांगा.

Subscribe to RSS - गंमतखेळ