दूर आहे आज गंगा

Submitted by vilasrao on 11 February, 2025 - 12:18

गजल: दूर आहे आज गंगा

दूर आहे आज गंगा पाहून आलो
अर्घ्य माझे चंद्रभागे देवून आलो !

येत नाही आठवांना तो गंध आता
काय मी हा श्वास तेथे ठेवून आलो ?

ओलवे संदर्भ आभाळा वेदनेने
दूर ओझे मी ढगांचे वाहून आलो !

थांबले आता धुमारे या माझ्या व्यथेचे
धुमसतांना एकदा मी पेटून आलो !

थांबवावे गोंधळाला कंटाळलो मी
आज एकांतास माझ्या विनवून आलो !!

वाहली श्रद्धांजली मग माझ्या मनाला
आज आशा कोणती मी लावून आलो !

विलास खाडे

Group content visibility: 
Use group defaults