मभागौदि २०२५:- शशक स्पर्धा

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 14 February, 2025 - 23:45

साहित्यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे कथा! कोणत्याची भाषेच्या उत्सवाला कथेशिवाय रंगत नाही. कथास्पर्धा हा नेहमीचा लोकप्रिय प्रकार आजवरच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या उपक्रमांमध्ये कसा काय वगळला गेला ह्याचे नवल वाटत होते. चला तर मग ! आपल्या प्रतिभेला चेतविण्यास घेऊन आलो आहोत शतशब्द कथास्पर्धा.

विषय – षड्रिपुंवर आधारित कुठलीही शंभर शब्दांची कथा. काम ,क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर – हे षड्रिपु प्रत्येकालाच कमीअधिक प्रमाणात जाचत असतात. आयुष्य जगताना यातील एखाद्या शत्रूला अडखळून आपण ठेचकाळतो, पडतो, आनंदी होतो, दु:खी होतो; पण अनुभवही गाठीशी बांधत जातो. मग उचला आपल्या लेखण्या आणि शब्दबद्ध करा असाच एखादा आयुष्य शिकवून जाणारा अनुभव. किंवा कल्पनेच्या जगात घ्या भरारी आणि लिहा एक छानशी शशक.

ही स्पर्धा आहे. उपक्रम नाही.

स्पर्धेचे नियम व अटी -
१. षड्रिपुंपैकी एका / अनेक रिपुची मांडणी कथेत ठळकपणे असावी.

२.'मराठी भाषा गौरव दिन २०२५' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे.

३. धाग्याचे नाव मभागौदि २०२५ शशक- शीर्षक - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक ) अशा प्रकारे द्यावे. शब्दखुणांमध्ये उपक्रमाचे नाव "मभागौदि शशक" असे लिहावे.

४. एक सभासद एकापेक्षा अधिक प्रवेशिका देऊ शकतो.

५. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत

६. स्पर्धांचे विजेते मतदान करून निवडण्यात येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथास्पर्धा हा नेहमीचा लोकप्रिय प्रकार आजवरच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या उपक्रमांमध्ये कसा काय वगळला गेला ह्याचे नवल वाटत होते.

+786
मला देखील...
पण शशक नाही तर लघुकथा हव्या होत्या..
शब्द मर्यादा नको होती.. त्यातून ज्याला पन्नास शंभर मध्येच आपली कथा संपते असे वाटत असेल त्याला तो पर्याय होताच.

अरे वा! वाचायला मजा येते नेहमीच
सध्या कथांचा पाईप कोरडा पडलाय. कविता जरा जरा ठिबकतायत अधूनमधून Lol बघू इथे येणाऱ्या शशकने जादू झाली तर नक्की लिहेन

एकदा या गटात धागा पोस्ट केला की तिच कथा इतरत्र समाज माध्यमांवर पोस्ट करू शकतो का? ही स्पर्धा आहे म्हणून विचारतोय

>>> काम ,क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर – हे षड्रिपु
संयोजक, मला वाटतं एक रिपू दंभ हा आहे. लोभ आणि मोह सारखेच झाले नाहीत का?

ह्म्म, इन्टरेस्टिंग - मला 'षड्रिपु कामक्रोधादि मदमत्सर दंभ तो' हे आठवत होतं.
धन्यवाद. Happy
तुमच्या यादीतला मोह म्हणजे 'मोहमाये'मधला मोह दिसतो आहे - त्यालाच समर्थांनी प्रपंच म्हटलं आहे. (आणि लोभ त्यांच्या यादीत नाहीच! Happy )

https://www.youtube.com/watch?v=peBsfgbOlYM
Moh Moh Ke Dhaage Song यावरूनही अर्थ स्पष्ट होईल. क्लासिक मेलडी,
मोह मोह के धागे.
माझ्याकडे एक संकेत कोश म्हणून जुने पुराणे पुस्तक आहे. त्यातही हीच यादी आहे,
ह्या गाण्यावर कुणीतरी शशक लिहू शकेल.